राहुल लाळे शब्दाशब्दात आहे राम, वचनांचे सारे सार राम Iभावभक्तीत आहे राम, भावविश्वच सारे आहे राम II साऱ्या विश्वाचे निर्माते राम, सकलांचे पालनकर्ता राम Iयुगायुगांचे तारक राम, मर्यादा पुरुषोत्तम राजाराम II सद्गुणसंपन्न अवतारी राम, विशालहृदयी जय श्रीराम Iमनोमनी आज एकच नाम, रघुपति राघव राजाराम IIरघुपति राघव राजाराम II
Author: prerana666
तिळगुळ घ्या गोड बोला
राहुल लाळे तिळगुळ घेऊन गोड बोलुनीजिंकून घ्यावे मन साऱ्यांचेसंक्रांत केवळ निमित्त असावेव्रत असू द्यावे हे आयुष्यभराचे कुणास टोचू नये काटेहलव्यासारखे हसत रहावेकोणी टोचले जरी काटेआपण हास्यच फुलवत रहावे हलवा- तिळगुळ देऊन कधीकटुता मनातली जात नसतेबोल प्रेमाचे द्यावे घ्यावेआनंदाचे वाण लुटावे नुसते हाच खरा तिळगुळ समजावागोड बोलणं सोडू नकाकाहीही झालं तरी यापुढेघेतला वसा टाकू नका
अघटित…..
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे हे अघटित आहे खास,थंडीत आकाश ढगाळ !मनास करते उदास,अन् थेंबात उगवे सकाळ!….१ उबदार थंडीची शाल,हेमंत ऋतु पांघरतो!घेऊनी ढगाची झूल ,नकळत दिवस उगवतो….२ गेलास ऋतुरंग बदलून ,लपलास कुठे घननिळा?प्रश्न पडला मम मनाला, पावसाळा की हिवसाळा!…३ शांत, स्तब्ध निसर्गाला,निश्चल केले कोणी ?चैतन्य कधी त्या येईल,वाट पाहते मी मनी !….४
ओढाळ मन
उज्वला सहस्रबुद्धे मन आभाळ आभाळ,कधी सान, कधी विशाल!कधी पाण्याचा डोह,कधी सागर नितळ! कधी असे ते पाखरू,तेजापाशी झेपावलेलेकधी असे ते निश्चल,कूर्मापरी स्थिरावलेले! कधी अतीच चपळ,निमिषातच दूर धावे!कधी असते निश्चल,वज्रासारखे एक जागे! मना तुझा ठाव,घेता येईना जीवाला!फिरते मीही तुझ्या संगे,गिरकी सोसेना ती मला!
World Men’s Day जागतिक पुरुष दिन
स्त्रीदिन का पुरुष दिन राहुल लाळे मीही छान थोपवतोमनातली वादळे…शांतपणे सांभाळतोवेदनांची काहुरे डोळ्यांतलं पाणी, आणिश्वासातला हुंदकादाखवतेस तूअन् लपवतो मी वाटेतील संकटंअपार काळज्या….बऱ्याच तुलाही,अन अनेक मलाही अस्वस्थ मनदडवतो मीअंतरीच्या व्यथाउच्चारतेस तू व्यक्ततेची भावना तुझीशिकायचीय मलातीच लपवायची जागा माझी,शोधशील नक्कीच तूही तळपते ऊनझोडपणारा पाऊसपोळवतो मलाहीभिजवतो तुलाही मी कायम तुझ्याचसाठीतुझ्यातील तुलाधीर देण्यासाठी !तू सदा माझ्याचसाठीमाझ्यातल्या मला सावरण्यासाठी तसाच आजचा दिवस…अन् येणारा प्रत्येक दिवसहीमाझा ही….आणि तुझाही
कोने की सफाई l
घर के कोनो की सफाई करते वक़्त समझ में आया की, घर के कोने साफसुथरे हो तो किसीको नज़र नहीं आते l लेकिन अगर कोई भी कोना साफ़ न हुआ हो तो सफाई पूरी नहीं हुई ऐसा लगता है l तभी खयाल आया की मन के कोनो की सफाई भी उतनी ही जरुरी है ना l मेरे मन के कोने में भी कुछ ऐसे जज्बात हैं जो बेवजह तकलीफ देते हैं l उनकी सफाई करके l मुझे भी साफसुथरे मनसे जिंदगी का आनंद लेना चाहिए l
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!