भेटीस तुझ्या मीसखये आतुर झालोबेभान धुंद मीजलद होऊनी आलो।।१।। अबाहूत अशी येनको दुरावा आतामम प्रिये न सहवेदुःख तुझे विरहार्ता।।२।।हा विरहाग्नी गेनित्य जाळितो तुजलादारूण उसासेक्षीण तनु धरणीला।।३।।साजिरे गोजिरेहसरे ते तव वदनसखी हाय लोपले दिसे उदासही म्लान।।४।।होऊन मेघ मीमृगातला आसुसलाप्रिय धरणी आलोतृप्त कराया तुजला।।५।।
Author: Pratibha Garatkar
त्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज
प्रिय प्राणाहुनी जन्मभूमी हीमहाराष्ट्र माझात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुजजय जय जय गर्जा!।।उभा पाठिशी कणखर खंबीरबंधू सह्याद्रीसुखे लाभते भाव भक्तीचीनित्य तया तंद्रीआनंदवन भुवन येथेचिप्रतापी शिव राजात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज।१।सुपीक खडकाळी ही भूमीसुजला सुफला हीकृष्णा गोदा भीमा पावनपवित्र जलवाहीराष्ट्रभक्तीचे वंश नांदतीधन्य देश माझात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज।२।टिळकांची स्वातंत्र्यवीरांचीसावरकर यांचीदेशभक्तीची ज्योत तेवतेआजही तेजाचीसीमेवरती सज्ज सैन्य हेविजयी या फौजात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज ।३।संतांच्या पदस्पर्शे पावनवीरप्रसू मातीटाळ मृदुंगासवे तळपतीतलवारी पातीउच्च संस्कृती न्याय नीती तीआदर्श येथ प्रजात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुजजय जय जय गर्जा।४।
…जागतिक कविता दिवस..
……..कविता…….. या कवितेने वेड लाविलेतिचा मनाला लळाओठामधुनी शब्द उमटतीस्नेह असो वा झळा।। भाव भावना मनी कल्पनाउत्कट अनुभूतीभिडे काळजा क्षण हळवे तेशब्दचि कविता ती।। शब्द मोजके बाण उरी तेमहान अर्थ मलाभेदूनी ह्रदया परिणामातेकरिती तव ही कला।। लय तालांची सुरम्य जादूशब्द सार्थ रचनाप्रतिभेचा जणु साज ही कविताकरीते मुग्ध मना।। जखमा उरीच्या मर्म गूज हेमन का उकलावे?दु.ख मोद ना कोणा,कविते!फक्त तुज वदावे।। दिनरात्रींचे सुख दु.खांचेशिशिर वसंत ऋतूकळा कधी कधि मळेचि फुलतीजवळी कविते तू!!
पंढरीच्या वाटे
पंढरीच्या वाटेफुले पायघडीपालखी ही दिंडीतुकोबांची!! पंढरीच्या वाटेसडा ही रांगोळीनाचे मांदियाळी वैष्णवांची!! पंढरीच्या वाटेअबीर गुलालझाले लालेलालआभाळ ही !! पंढरीच्या. वाटेस्वप्नी देखियेलीबंद बंद झालीपंढरी ही !! पंढरीच्या वाटेकरोना करोनाबंद वारी दैनापांडुरंगा !! पंढरीच्या वाटेये रे बा विठ्ठलातूच ये भेटीलाभक्तांसाठी !!!
…..जीवनाचे सदर…..
जीवनाचे सदर वाचायला नजर असावी लागते। मजकुरांच्या जंजाळातून सफर करावी लागते जीवनाचे सदर..।। भरगच्च पृष्ठांच्या लाटा अंगांगावर झेलत क्षर अक्षरांची ही नित्य कदर करावी लागते जीवनाचे सदर….।! छोट्या मोठ्या वार्ता त्या वारेमाप वादळवाटा तोटे खोटे खरे काय खबर असावी लागते जीवनाचे सदर….।। जळीत बळी कानपिळी उपासमारी कथांच्या व्यथा साफ पचवताना भावभावनांची नजर मरावी लागते जीवनाचे सदर वाचायला नजर असावी लागते.
जगायचे कसे
जगायचे कसे? शिकविलेस तू वागायचे कसे आदर्श आई तू! सुख द्यावे घ्यावे गोड हवी वाणी रंगुनीया जावे आनंदाची गाणी! दीन दु.खी कोणी धाऊनिया जावे पूस डोळे त्यांचे साह्य सदा व्हावे! मानवता धर्म सार्थक जन्माचे जाणून घे बाई, कसे जगायचे?
दीप मनीचा तेवता
दीप मनीचा तेवता तोझाकुनी ठेवू नकोजे दिल्याने वाढते तेराखुनी ठेवू नकोदीप मनीचा…१… पेटले जे भोवती तेफक्त तू पाहू नकोधाव घेई शांतवायामागे कधी राहू नकोदीप मनीचा…२… दु.खितांना हात दे तूकष्टता लाजू नकोअंतरीचा तो उमाळामारुनी राहू नकोदीप मनीचा…३… वरद हस्ते लाभले तेएकला भोगू नकोलक्ष हस्ते दे समाजाथोरवी सांगू नकोबा मना विसरु नको
….प्रेम….
प्रेम असतं ईश्वराचं देणंखरच,प्रेम निसर्गाचं देणंविश्वाचं गाणं ही प्रेमच असतंप्रेमच जगण्याचं कारणं असतं. प्रेम एक गूढ भावनाका जडावं कोणावरतीकळत नाही कुणा.प्रेम वाटणं व्यक्त करणंस्वीकारणं ही असतं परस्परांचा प्रतिसादप्रेम बहरणं असतं.प्रेम बालवयातलंनिष्पाप झरा जसाआयुष्यभर मनावरउमटून जातो ठसा. किशोरवयीन प्रेमचोरट्या नजरेत बरसतंतारुण्यातील प्रेम मात्रझोकून देत असतं. शारीरिक प्रेमापरीसभावनिक सरस असतंनिष्ठा त्याग नि.स्वार्थी तेजिवापाड असतं. प्रेम कुणीही करोप्रेम प्रेमच असतंप्रेम जीवनाधारआनंद घन असतं. प्रेमाविना जीवनक्षण क्षण मरण असतंप्रेमाविना जीवनजिवंत मरण असतं….जिवंत मरण असतं।।
नव वर्षा तव सहर्ष स्वागत !
नव वर्षा तव सहर्ष स्वागत !अभिमान ही तो गर्व नकोनवागताचे होते स्वागतहुरळूनी तू कधी जाऊ नको ll १ll जुने जाऊनी नवीन यावेनियमचि आहे निसर्ग हादुःख सरोनी सुख दिन यावेरात्री मागुनी दिवसचि हा ll २ll जुने ही असते भले चांगलेउत्त्तम जे जे ते घ्यावेदुःख उगळुनी तेच तेच तेकशास कोणा हिणवावे ll ३ ll जर्जर जनता गतवर्षीचाआठव सुद्धा नको नकोनिसर्ग खेळ हा ईश्वरी सत्तादोष कुणाही नको नको ll ४ ll चूक आमुची विसरुनी गेलोत्यांना गर्वाने फुगलोनिमित्त केवळ गतवर्षा तूरोग रौरवी सापडलो ll ५ ll गत वर्षा तू संकटातहीदिलीस शिकवण भली भलीआयोग्य सेवा माणुसकी हीसर्व सुखांची गुरु किल्ली ll ६ ll झाले गेले विसरुनी जाऊगत वर्षा ! तुज निरोप हानव वर्षा तव आगमनाचीउत्सुकता मनी, सूर्य नवा ll ७ ll ये नव वर्षा ! सुख शांती धनआरोग्य घेऊनी चैतन्यगौरवू तुजला सन्मानही करुजीवन व्हावे तव धन्य ! ll ८ ll