अश्विनातली आज पौर्णिमा नभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद!शुभ्र चांदणे अवनीवरतीआनंद रजताची ही वृष्टीसागर अंतरी येई भरतीनभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद..१.. अमृतचि चांदणे औषधीदुधात घ्यावे हे मिसळोनीसर्वांनी अजि घ्या रे पिऊनीनभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद..२.. को ऽ जागर्ति को जागर्तिलक्ष्मी आली अवनीवरतीकरु प्रार्थना प्रसन्न हो तीनभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद..३.. जागा सारे करा जागरालक्ष्मी पूजन स्तवनही कराविष्णु पत्नी ती ये घरा घरा नभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद..४..
Author: Pratibha Garatkar
………..विजयादशमी…………
दुष्ट बुद्धी दुराचारविकृतीचा पुतळा तोतुंबळ युद्ध देवांशीबाण वर्षा करी तो….१ महिषासुर..त्या सामोरीमूर्त सुरांच्या तेजांचीसिद्ध सिंहावरी सवारदुर्गा अष्ट भुजांची….२ देवी दुर्गा पराक्रमीमहिषासुरा मर्दिलेदेवांचा जय देखोनीजयजयकारे नभ भरले….३ दुष्टांचे निर्दालनहीरक्षण केले सुजनांचेपराभूत वृत्ती असुरीविजय सत्त्य नी नीतीचे….४ परंपरा ही विजयाचीआजही असत्त्य अन्यायीपहा हारती सर्वत्रसत्य जिंकते ही ग्वाही….५ सीमोल्लंघन आजलानव विचारे ही प्रगतीविजयादशमी!विजयाचासत्याचा ध्वज घ्या हाती….६
सलाम….ती ला
उत्तुंग भरारी तिचीनेत्र दिपून जातातस्वावलंबी पंख तिचेआकाशी झेप घेतात।। सांभाळते घर छाननोकरीतही रमतेसंचार सर्व क्षेत्रातउच्च पदी ती दिसते।। जिद्द चिकाटी कष्टातकधीच मागे नसतेप्रेम जिव्हाळा वात्सल्यमूर्तीरुप ती असते।। कर्तृत्वाचे भान तिलात्याग माया साहस तेशांत वृत्ती नित्य तरीझाशीवाली कधी होते।। फेड नाही उपकार तेधन्य नारी जीवनहीकर्तृत्वाला सलाम हासलाम मातृत्वाला ही।।
युगपुरुष तू
युगपुरुष तू पूर्णपुरुष तू विश्ववंद्य सन्मानकृष्णजयंती गाऊ आरती तव गुण गौरवगान।।ध्रृ।। जन्मचि कारागृही पहाराकंस वादळी वासलीला गोपांसवे गोकुळीरक्षणार्थ गोधनाससखे सोबती सर्वांसाठीकार्य तुझे वरदानतव गुण गौरव गान।।१।। वृत्ती राक्षसी वैरी ते तेनिर्दालन केलेगरीब गांजली प्रजाही सज्जनहित रक्षण झालेदीनानाथ तू भगवंता रे तूचि आशास्थान…..तव गुण गौरवगान।।२।। सत्त्यवादी तू न्याय नीतीचापक्ष पांडवांचाकौरव पांडव युद्ध प्रसंगीसारथी पार्थाचाअवतारी या कार्य आदर्शचि हाचि तव सन्मान……तव गुण गौरवगान।।३।। कर्म भक्ती नि ज्ञान मार्ग तेपार्था बोधियलेजन्म मृत्यूचे तत्व अगम्यचिसावध त्यां केलेपार्थ मनीचा किंत सारुनी दे युद्धा आव्हान……तव गुण गौरवगान।।४।। कार्य करोनी भगवंता तेप्रेमे अर्पूनीहीकर्म दोष ना त्या भक्तातेअनन्यभक्ती हीभगवत् गीता त्याग तत्व ते कृष्णा, कार्य महान…….तव गुण गौरवगान।।५।।
स्मरण क्रांंतीवीरांचे
गाऊया क्रांतीचे गुणगानक्रांतीविरांच्या पराक्रमांचेस्मरणचि हा सन्मान।।ध्रृ।। संसारी ना ध्यान तयांचेशिर तळहातावरीस्वराज्यप्राप्ती श्वास जयांचेध्यास उरी अंतरीहास्य मुखावरी फासावरी ते चढलेशूर जवानगाऊया क्रांतीचे गुणगान।।१।। मंत्र करेंगे मंत्र मरेंगेमंत्रघोष गाजलाज्योतीने चेतवीत ज्योतीक्रांती घोष गर्जलागुलामगिरी घन तिमिरी विलसेक्रांती सूर्य महानगाऊया क्रांतीचे गुणगान।।२।। स्वातंत्र्याच्या वेदीवरतीआनंदे बलिदाननाम कुणाचे अनाम कोणीसार्थ वेचिले प्राणस्वतंत्रतेच्या संग्रामातील सैनिकसर्व महानगाऊया क्रांतीचे गुणगान।।३।। अमृत उत्सव स्वातंत्र्याचाआनंद उत्सव हास्वातंत्र्यास्तव प्राण वेचिलेशहीद त्यांचा हाकृतज्ञ आम्ही कधि न विस्मरुनित्य करु सन्मानगाऊया क्रांतीचे गुणगान।।४।।
वसे देव नामातचि
सुख पाहू जाता पुढे दुःख येतेजणू वेषधारी सूख दुःख हो तेविषयी न सुख तेनाती न जगतीगुरु सद् गुरू संत हे सांगताती..१ सुख शोध घेता दिसे मार्ग एकपरमात्म प्राप्ती सुख मात्र एकभगवंत नामातचि ईश प्राप्तीगुरु सद् गुरु संत हे सांगताती..२ मुखी नाम घ्यावे दिले सद् गुरुंनीअती भक्तीभावे गुरुंना स्मरोनीआशा आकांक्षा नको वासना तीगुरु सद्गुरु संत हे सांगताती..३ नसे देव नामाहुनी वेगळा तोवसे देव नामातचि सावळा तोअसे नाम घ्या देव येईल हातीगुरु सद्गुरु संत हे सांगताती..४ जिथे नाम तेथे भगवंत भक्तभगवंत प्राप्ती जगणे तदर्थमुखी नाम भक्ती कलीमाजी मुक्तीगुरु सद्गुरु संत हे सांगताती..५
मंगळागौरीची आरती
शुभ सौभाग्याची खाण, मागते दानसदा सुखकारीओवाळुनी मंगलगौरी।। श्रावणमासी मंगळवारीएका घरी जमुनी आम्ही नारीधूपदीप पूजेचा आगळा थाटमांडिले पाट..मंगलगौरीओवाळुनी मंगलगौरी..।।१।। नाना परी सुमने पत्री याआणिल्या देवी तुज अर्पायाहे कमळ फूलं ही छानकेवडा पान..प्रिय तुज गौरीओवाळुनी मंगलगौरी।।२।। सोळापाने वरी सुपारी याहा विडा देवी तुज वाहूयानैवेद्द्याचे वाढले पानओटी सामान..आरतीचे ताट करीओवाळुनी मंगलगौरी।।३।। या जीवन क्रीडा नौकेलापैलतीरी क्रीडन न्यायालानिवडिला जोडीदारखरा आधार..प्रिय सहकारीओवाळुनी मंगलगौरी।।४।। दे उदंड आयु मम पतीलासौभाग्य दान दे देवी मलाही विनंती चरणालादेवी तुजला..मंगलगौरीओवाळुनी मंगलगौरी।।५।।
……ऋतू……
सहा ऋतूंचे येणे जाणेपरिवर्तन हे निसर्ग हाशिशिरामागुनी वसंत येतोसरे पानगळ बहर अहा!..१ कधी ओकतो आग ग्रीष्म हीशांतवी वर्षा जलधारातमामागुनी प्रकाश यावा रात्रीनंतर दिवस खरा…२ तसेच आहे मनुष्य जीवन. सुखदु:खाचा गोफ जणुयश वा अपयश मोद खेद हीसप्तरंगी हे इंद्रधनु…३ वसंत फुलतो मनी जीवनीअसो कोणता मग ही ऋतूविरही कोणी मुखी शब्द हेहवीस तू गे !..हवास तू !..४ निसर्ग सुंदर जीवन सुंदरफुलपाखरु हे मनही हवेदाता तो भगवंत विधाताकृतज्ञ आपण मात्र हवे!..५
फुटतया रडू रानातली वस्तीखोपटापुढं शाळाघंटा होते…जीवआत आत गोळा..।।१।।लहान बहिणी भाऊघरात अंध आजीटोपलंभरुन भाकरीतूच कर भाजी..।।२।।आई बा जातातरोजंदारी वरकशापायी शाळा?काम घरचं कर..।।३।।भावड्याला मात्र म्हणतातपळ शाळेकडेनापास गाडी त्याचीजात नाही पुढे..।।४।।मोती अक्षर माझंनंबर पहिला आलातरीही आई म्हणतेदे सोडून शाळा..।।५।।नको गं आई मलाशाळेतून काढूसांगताना ही मलाफुटतया रडू..।।६।।
श्रीराम
तुला हवे ते तितुके तू खावेउरे अन्न ते व्यर्थ वाया न जावेतसे ज्ञानही तू इतरांसी देईमना दासबोधीच हा बोध घेई।।श्रीराम।।