हिमाच्छादित शिखर शुभंकर…बम बम तेथे डमरू वाजतो !तिथेच राहूनी भोळाशंकर…सृजन-विलय समतोल साधतो !! तो असा कृपाळू त्रिनेत्रधारी..प्रार्थिता देतसे जो इच्छित वर !नमन तयाच्या शुभचरणांवरी…असो मस्तकी त्याचा वरदकर !!
Author: Mahesh Bhope
पृथ्वीतलावरील विसर्जनानंतर श्री गणेश आपल्या घरी पोहोचलेत
आलास तु परतूनी बाळा…जाऊनिया दूर मानव देशी !वारूनी दुःखे, सुखवायां सकळा..लाडक्या,नित्य किती कष्टशी !! तुझ्या दर्शने गणेशा, होती..यातना जनांच्या बोलक्या !महिमा तव कृपेचा रे किती..वेदना साऱ्या होती हलक्या !! ते भक्त तिथे हर्षिती किती..जाणूनी..आम्ही, विरह तुझा साहतो !काळाची थबकली वाटे गती…आणूनी नेत्री प्राण,वाट तुझी पाहतो !