अमावस्येचा अंधार संपुन उगवली चैत्र शुद्ध प्रतिपदाजाऊदे सरुन सारे दु:ख, त्रास दैन्य अन आपदा.. नव्या पालवीपरी फुटु दे आशांचे धुमारेगगनावरी जाऊदे मनीच्या स्वप्नांचे मनोरे.. नववर्षदिनी आज घेऊ संकल्प आगळासत्कर्माने उजळूदे आयुष्य सोहळा.. यशकिर्तीची गुढी उंच उंच चढु देसुखसमाधान सदा घरीदारी नांदु दे… हीच प्रार्थना आमची चरणी ईश्वराच्यागुढीपाडवा देऊन जावो तुम्हाला आठवणी सुखाच्या..
Author: Kalika Gokhale
नको हारतुरे नको मानसन्मान,माणुस म्हणुन वागव तिला हीच फक्त तुझ्याकडुन अपेक्षाकरतेच तडजोडी ती क्षणोक्षणी,वात्सल्य मांगल्याच्या बेडीत अडकवुन नको करुस तिला शिक्षा शरीरबल कमी तरी नाही ती अबला,कणखर ती, अभेद्य ती, अमुल्य तीसंकटी सर्व चराचरा घेऊन पदराखाली करतेच ना ती रक्षामहानतेचा तिच्या जागर फक्त एक दिवस??बुद्धीचा न मिरवता कधीच तोरा, नजरेत ठेवते ती प्रत्येक लक्षाप्रेमळ ती, कोमल ती,गृहीत नको धरु दुखावते ती, संतापते ती,लावशील ठेच तिच्या आत्मसन्मानाला तर होईल ती सर्वभक्षाचाणाक्ष ती, समंजस ती बुद्धिमान तीसोडुन सगळा अहंकार रे समाजपुरुषा, घे तिच्याकडुन माणुसकीची दिक्षानको हारतुरे नको मानसन्मानमाणुस म्हणुन वागव तिला हीच फक्त तुझ्याकडुन अपेक्षा……
वागुनी शहाणपणाने मान महाराष्ट्राचा वाढवावाआठवुनी चरीत्र शिवराय, बाजीरावांचे, पराक्रम मनी जागवावाटिळक, सावरकर, आगरकर गोखले आणिक कितीतरीत्याग त्यांचा आज आठवावायावे रामराज्य पुन्हा ह्या मऱ्हाटदेशी, मनामनात वन्ही हा चेतवावाझिजले जे आत्मे या मातीस्तव, मानुनी ऋण त्यांचे, प्रत्येक मनी वंदे महाराष्ट्र शब्द उठावा
चैत्र शुद्ध प्रतिपदा उगवली, सरली रात्र अमावस्येचीशुभदिनी आज चला उभारु गुढी सायुज्यतेचीअधर्माची सोडुन वाटधरुया कास सद्धर्माची शुभदिनी आज चला उभारु गुढी प्रभुकृपेचीकोकिळ पहा देतसे चाहुल वसंतऋतु आगमनाचीशुभदिनी आज चला उभारु गुढी निसर्गप्रेमाचीहृदयमंदीरी करुन स्थापना देव देशाची शुभदिनी आज चला उभारु गुढी मांगल्याचीशुभकृत संवत्सर हे जीवनी तुमच्या येवो घेऊन पहाट सौख्याचीआरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो सकलांना हीच इच्छा मम मनीचीशुभदिनी आज चला उभारु गुढी परस्परांच्या सद्भावाची..मराठी नववर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची वेळ येताच कठोर होई जणु धार पोलादाची.. ज्ञानराये आणिली गीताई माझ्या मराठी भाषेत तुका नामया ची उजळली वाणी करता रचना भावभक्तीच्या अभंगांची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll१ll कानामात्रा अनुस्वार वेलांटी माझ्या भाषेचे वळणच आगळे सज्जनांसी वाटे मायाळु परी मान झुकविते ती गर्वाची माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll२ll कडेकपाऱ्यांतुन, अवखळ पाण्यातुन बदलते तिची हो धाटणी येता प्रवाह सारेच एकत्र वाहे खळाळत सरीता मराठीची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll३ll राजा शिवाजी चे स्वराज्य उभे या पावन मातीत अजुनही गाते मायमराठी किर्ती शिवबाच्या पराक्रमाची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll४ll पु.ल. व.पु. कुसुमाग्रज आणि कितीतरी या भाषेची लेकरे अजोड केली निर्मीती त्यांनी मराठीच्या साहित्याची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll५ll गदिमा शांता, सुरेश वसंत आणि मंगेश शब्द ज्यांचे दिवाणे गळा मराठीच्या घालती माळ तेजस्वी शब्दमोत्यांची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll६ll लता, आशा, आणि अनेक गान सम्राज्ञी तारा झंकारत्या वीणेच्या मिरवीती अभिमानाने खांद्यावरी पताका ही मराठीची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll७ll श्रेष्ठ साऱ्या जगतात माझी ही मायबोली झरती धारा अमृताच्या ही वीणा जणु माय सरस्वतीची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll८ll
थंडीची गुलाबी चादरधुक्याचा शुभ्रसा पदरआसमंती आनंदाची लहरउन्हाचा उबदार वावरकरतोय गारुड मनावरआला सण मकरसंक्रांतीकरु एकमेकांची कदरतुमच्या आमच्या नात्याला न लागो कुणाची नजरसगळ्या दु:खसंकटांनादेऊ एक जोरदार टोलातिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..
आज भी तेरे पास है मेरी तमाम खामोशिया,और तेरे साथ है मेरे यकीन की परछाई, मेरे साथ क्या है तेरा?कुछ जहन मे बसे लब्ज, और तेरे होने का एहसास, साथ है आजभी…