अय्या, ईश्श झालंय टाईमबारआता, शोना-बाबू बोल ना यारअडगुलं मडगुलं ज्यांनी म्हणायचंतेच झालेत आता स्वीटू बेबी सगळंच चाललंय खुल्लमखुल्लागायब झाली स्वप्नांतली छबीयेता जाता सगळ्यांनाचप्रसादासारख्या मिठ्या नी पापे गडबडून जातात सगळेअचानक मोबाईलवर पडता छापेअबोल आणि अबोध प्रेमलुप्त झालंय का काळाच्या पोटात? कामाशिवाय पती-पत्नींनाहीप्रवेश निषिद्ध एकमेकांच्या गोटात..पुन्हा वाटतं कधीतरी द्यावाव्हाईटवाॅश वर्तमानाला लाजरं-बुजरं रंगवून टाकावंप्रत्येकाच्या मनालाहळूच उलगडत जावीअलवार नात्यांची गोडी त्यात विहरू दे पुन्हाअय्या न् ईश्श ची जोडी..
Author: Gayatri G Patwardhan
धग लागो ईश्वरांमुक्त मनपाखरांसोडुनियां संसारांतुज भेटाया यावे.. धग लागो ईश्वरांक्रियमाणपसारासप्तकोषांचा साराजाळीं स्मरणमात्रे.. धग लागो ईश्वरांत्यागुनि कणसुरांज्ञानामृताच्या धारांबरसाव्या कृपेने.. धग लागो ईश्वरांपूर्वस्मृतींच्या सारांमायेस न हो थारांभोग झणिं सरावे..
हिरव्या देठानं कितीही जरी सावरलं,तरीही वय सरतं..किती मिळालं कितीही कमवलं,तरी मन कुठे भरतं.. न भरलेल्या मनालाएका क्षणीं थांबवायला हवंथकलेल्या शरीराची जागातेव्हाच घेईल कुणी नवं येणं-जाणं, चालणं-थांबणंकालानुरूप सारं होईलअडूनच रहायचं म्हटलंतर जगण्याची मजा जाईल म्हणूनच म्हणतात जीवनपटींआपली भूमिका साकारावींहसत-हसत अचानकचरंगमंचावरून ‘एक्झिट’ घ्यावी…
अवकाशीचे ग्रहगोल
अवकाशी फिरणारे गोलजाणवून देती धरतीचे मोलजिथे नाही पाणी ते सर्व फोलम्हणती जी.. पाण्याबरोबर योग्य वायुज्यानी होई सृष्टी चिरायुमानवा लाभें दीर्घायुजयाचे नि.. पृथ्वी जरी असे माऊलीग्रह-गोलांचीही साऊलीसवे माना आपुल्या पाऊलीचालते कीं.. पंचतत्त्वाचा देह आलाज्याचा भार प्रबळ झालात्यांप्रमाणे जन्म चाललाजगती यां.. मार्ग जरी बदलावे वाटेमग अंतरीं भावना दाटेशांतवता ग्रहां वाट फुटेमोक्षाची ही..
नभीं दाटले मेघसावळ-आठवांचा ओघबरसती धारा तव सुधेच्यान् प्रीत-बिजलीची चमकली रेघ