एका पेशंटच्या दाढेची ट्रिटमेंट झाल्यावर सुबोधने दुसऱ्या पेशंटला खुर्चीत बसायला सांगितलं.त्याच्या दाढांचं तो निरीक्षण करीत असतांनाच रिसेप्शनिस्ट काचेचा दरवाजा ढकलून आत आली. “सर ते मनोहर पाटील नावाचे पेशंट आहेत ना, ते म्हणताहेत की आता त्यांच्याकडे फक्त एक हजार आहेत. बाकीचे दोन हजार पुढच्या आठवड्यात आणून देणार म्हणताहेत”सुबोधला याच गोष्टीची चिड होती. कपड्यांवरुन तर पेशंट चांगला सधन दिसत होता. शिवाय तो नेहमी कारने येतो हेही त्यानं पाहिलं होतं. बरं त्यांना अगोदरच तीन हजार खर्च येणार असल्याची कल्पना दिली होती. तरी सुध्दा त्यांनी पैसे आणू नयेत याचा त्याला संताप आला. प्राँब्लेम हा होता की तिथं जमलेल्या पेशंटच्या गर्दीसमोर असं त्यांना संतापून बोलणंही त्याच्याबद्दल पेशंटच्या मनात असणाऱ्या प्रतिमेला छेद देणारं होतं. त्याने नरमाईने घ्यायचं ठरवलं. “ठिक आहे. त्यांचा मोबाईल नंबर लिहून घे आणि त्यांना सांग पुढच्या आठवड्यात नक्की आणून द्या” रिसेप्शनिस्ट गेली. तो आपल्या कामाला लागला पण मनातली ती खदखद काही कमी होईना. खरं पहाता तो शहरातला सगळ्यात यशस्वी दंतवैद्य होता.गरीबीची जाण असल्यामुळे त्याने आपली फी माफक ठेवली होती. कामात तर तो निष्णात होताच. वर मिठास बोलणं.त्यामुळे तो सर्वांना डाँक्टरपेक्षा आपला मित्रच वाटायचा. अर्थातच त्याचा दवाखाना कायम पेशंटने तुडूंब भरलेला असायचा. सकाळी नऊ पासून ते रात्री दहापर्यंत त्याचं काम चालायचं. महिन्याला दहा लाखाच्या आसपास त्याची कमाई होती.लोकांनी त्याची उधारी बुडवली नसती तर हीच कमाई अकरा बारा लाखापर्यंत गेली असती. दुपारी दोन वाजता त्याने काम थांबवलं. त्याला आणि स्टाफलाही भुक लागली होती. पंधरा मिनिटात त्याने जेवण संपवलं कारण बाहेर पेशंट ताटकळत बसले होते. बेसिनमध्ये हात धुत असतांनाच मोबाईल वाजला. हात कोरडे करुन त्याने तो घेतला. “हँलो सुबोध मी चंदन बोलतोय. फ्री आहेस ना? जरा बोलायचं होतं” पलीकडून आवाज आला“आताच जेवून हात पुसतोय बघ. बोल काय म्हणतोस?” “अरे जरा घराचं काम सुरु केलंय. दोनतीन लाखाची मदत केलीस तर बरं होईल”“चंदन यार, मी तुझ्या पाया पडतो. तू दुसरं काहीही माग. माझ्या घरी सहकुटुंब रहायला ये. खाणंपिणं सगळं मी करीन. पण प्लीज यार मला पैसे मागू नकोस. तुला सांगतो ज्यांनीज्यांनी माझ्याकडून उधार पैसे नेलेत त्यांनी ते मला कधीच परत केले नाहीत. तीसचाळीस लाख माझे लोकांकडे अडकलेत. पैसे द्यायचं कुणी नावच काढत नाही “सुबोध उसळून म्हणाला“अरे पण मी तुझा मित्र आहे. तुझे पैसे बुडवेन असं तुला वाटलंच कसं?” ” मित्र?अरे बाबा मित्र तर मित्र माझे भाऊ,बहिणी,मेव्हणे,काका,मामा ,सासरे सगळ्यांना पैसे देऊन बसलोय.एक रुपया मला परत मिळाला नाही. मिळालं ते फक्त टेंशन,मनस्ताप आणि शिव्या.पैसे मागितले तर म्हणतात ‘ तुम्हांला काय कमी आहे ,पैसा धो धो वाहतोय.पैसे देणारच आहोत ,बुडवणार थोडीच आहे! ‘. तुला जर वाटत असेल की आपली मैत्री कायम रहावी तर प्लीज मला पैसे मागू नकोस.हा पैसा सगळे संबंध खराब करतो बघ” समोरुन फोन कट झाला. तो रागानेच कट केला असणार हे त्याच्या लक्षात आलं. त्याने परत आपलं काम सुरु केलं पण त्याच्या मनातून तो विषय जाईना. उधारीचे पैसे परत का मिळत नाही हे विचारायला मागे तो एका ज्योतिष्याकडे गेला होता. ज्योतिषाने त्यांची कुंडली पहाताच त्याला सांगितलं. “दुसरं काही सांगण्याच्या आत एक गोष्ट सांगतो.तुम्ही कुणालाही उधार पैसे देऊ नका.उधारीचे पैसे तुम्हांला कधीही परत मिळणार नाहीत. तुमचे भाऊबहिण, साले,मेव्हणे,जवळचे नातेवाईक, मित्र सगळेच तुमचे पैसे बुडवतील. तसंच कुणालाही जामीन राहू नका त्यातही तुम्हीच फसाल. तुमच्या कुंडलीतले योगच तसे आहेत” “याला काही उपाय?”त्याने विचारलं होतं. ज्योतिषाने नकारार्थी मान हलवली.“उपायापेक्षा बचाव केव्हाही चांगला. कोणी कितीही कळकळीने पैसे मागितले तरी द्यायचे नाहीत. संबंध खराब झाले तरी चालतील कारण पैसे देऊनही संबंध खराबच होणार आहेत किंवा मग पैसे द्यायचे आणि ते दिले आहेत हेच विसरुन जायचं म्हणजे टेंशनचं कामच नाही. तुमच्या नशिबात पैसा भरपूर आहे. तेव्हा पैसा बुडाल्यामुळे तुम्हांला फारसं जाणवणार नाही.” ही गोष्ट खरी होती.त्याच्याकडे पैसा येतांना दिसत होता म्हणून तर लोक मागत होते आणि तो बुडवल्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही म्हणून निर्लज्जपणे बुडवत होते. तेव्हापासून त्याने पैसे उधार देणं बंद केलं होतं. पण दवाखान्यातली उधारी त्याला काही बंद करता आली नाही. रविवार उजाडला. खरं तर रविवारीही त्याचा दवाखाना बंद नसायचा. असिस्टंट डाँक्टर्स काम करत असायचे. सुबोधही एखाद दुसरी चक्कर टाकायचा. आज मात्र त्याला साठ किलोमीटरवरच्या एका खेड्यातल्या लग्नाला जायचं होतं म्हणून तो दवाखान्यात जाणार नव्हता. खेड्यातली लग्नं विशेष म्हणजे त्यातलं जमीनीवर बसून केलेलं जेवण त्याला फार आवडायचं. लहानपणीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या व्हायच्या. देशविदेशात अनेक महागड्या हाँटेल्समध्ये तो जेवला होता पण या जेवणातली त्रुप्ती त्याला कधीही तिथं मिळाली नव्हती. लग्न आणि लग्नातलं जेवण आटोपून तो आपल्या आलिशान कारमधून घरी परतायला निघाला. त्याच्या शहरापासून साधारण पंचवीस किमी.अंतरावर असतांना त्याला दुरुनच एक माणूस येणाऱ्या वाहनांना थांबवण्यासाठी हात देतांना दिसला. पण वाहनं न थांबता त्याला वळसा घालून जात होती. जसा सुबोध त्याच्याजवळ आला त्याला दिसलं की रस्त्यावर त्या माणसाशेजारीच एक बाईक आणि माणूसही पडला आहे. सुबोधला रहावलं नाही त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली. “काय झालं?” खिडकीची काच खाली करुन त्याने विचारलं“दादा अँक्सीडंट झालाय. पोराला दवाखान्यात न्यावं लागीन”वयाची सत्तरी उलटलेला तो म्हातारा सांगू लागला“एक मिनीट थांबा” त्याने गाडी साईडला घेतली“अहो कशाला या भानगडीत पडता. एक तर रविवार मिळतो तर घरी चलून आराम करा ना” बायको त्राग्याने म्हणाली. तिच्याकडे दुर्लक्ष करुन तो खाली उतरला आणि म्हाताऱ्याकडे गेला.“कसं आणि केव्हा झालं हे?”“दादा म्या आणि पोरगा गावाकडे जात होतो. ट्रकवाल्याने मागून धडक मारली आणि पळून गेला. म्या झाडीत फेकल्या गेलो म्हुन मले काही झालं नाई पण पोराच्या अंगावरुन ट्रक गेला” म्हातारा आता रडू लागला. सुबोधने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाकडे नजर टाकली. बापरे! प्रकरण गंभीर दिसत होतं. तो पटकन खाली वाकला. आणि त्याची नाडी तपासली.नाडी सुरु होती. पटकन अँक्शन घेतली तर वाचूही शकला असता. त्याने उठून म्हाताऱ्याकडे पाहिलं. तो हात जोडून उभा होता.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. “दादा अर्ध्या तासापासून गाड्यांना हात देऊ लागलो. कुणीच थांबत नाही. पोराला दवाखान्यात घेऊन चला दादा तुमचे लई उपकार होतीन” सुबोधने क्षणभर विचार केला. मग त्याने झटकन चेंदामेंदा झालेल्या खटारा बाईकला रस्त्याच्या बाजुला टाकलं. मग म्हाताऱ्याच्या मदतीने त्याने त्याच्या पोराला गाडीच्या मागच्या सीटवर टाकलं. त्याच्या शेजारीच म्हाताऱ्याला बसवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने गाडी सुसाट सोडली. गाडी चालवतच त्याने मोबाईल काढला. शहरात अँक्सीडंट हाँस्पिटल असलेल्या डाँक्टर मित्राला त्याने फोन लावला. “शेखर सुबोध बोलतोय. इमर्जन्सी केस आहे. दवाखान्याबाहेर स्ट्रेचर तयार ठेव. ओ.टी. तयार ठेव. मी ब्लडबँकेला रक्त तयार ठेवायला सांगतो. पंधरावीस बाटल्या रक्त लागणार आहे. मी वीस पंचवीस मिनिटात पेशंटला घेऊन पोहोचतोय”“सुबोध अरे आज रविवार आहे आणि अँक्सिडंटची केस असेल तर पोलिसांना…”“मी करतो सगळं मँनेज. तू फक्त तयार रहा. आणि तुझ्यासारखाच माझाही रविवार आहे. सो प्लीज बी फास्ट. माझ्या जवळच्या नातेवाईकाची केस आहे असं समज” याच शेखरला सुबोधने हाँस्पिटलच्या उभारणीसाठी पाच लाख उधार दिले होते. शेखरने त्याला फक्त दोन लाख परत केले होते.पण या उधारीवर…
Author: Deepak Tamboli
मुलगी
कुठेतरी वीज कडाडली. त्या आवाजाने शहारुन अंजलीने खिडकीतून बाहेर पाहिलं. पावसाचा जोर वाढला होता. सकाळपासूनच तो वेड्यासारखा कोसळत होता. सकाळी रितेश आँफिसला जायला निघाला तेव्हाही तो कोसळतच होता पण आतासारखं त्याचं स्वरुप रौद्र नव्हतं म्हणून तर रितेशला तिने अडवलं नव्हतं. सात वाजले होते. थोड्याच वेळात रितेश येणार होता. रेनकोट घालून गेला असला तरी तो थोडाफार ओला होणारच होता. अंजलीचा स्वयंपाक झाला पण रोज सात वाजेपर्यंत घरी येणाऱ्या रितेशचा पत्ता नव्हता.पावसामुळे त्याला उशीर होईल हे तिने ग्रुहित धरलंच होतं.पण सव्वाआठ झाले होते.प्रियाला भुक लागली असणार म्हणून तिने त्याला फोन लावला.बराच वेळ टूकटूक वाजत राहिलं .शेवटी फोन न लागताच बंद झाला.तिने लागोपाठ तीन चार वेळा फोन लावला पण प्रत्येक वेळी बराच वेळ टूक टूक वाजून फोन बंद होत होता.शेवटी कंटाळून तिने प्रियाला हाक मारली. “प्रियू.ये आतमध्ये आणि जेवून घे”प्रिया आत आली आणि म्हणाली“मी बाबा आले की जेवणार आहे”“अगं वेडी आहेस का?बाहेर पाऊस सुरु आहे.त्यांना किती वेळ लागेल माहित नाही. तू जेवून घे आणि झोप”” नाही. मी बाबांसोबतच बसेन”ती जणू हट्टालाच पेटली होती. “बरं ठिक आहे. नऊपर्यंत वाट पाहू या. मग मात्र जेवून घ्यायचं हं मुकाट्याने” प्रियाने मान डोलावली. दोघीही हाँलमध्ये येऊन बसल्या.अंजलीने टिव्ही लावला.सिरीयलमध्ये नेमका एका पात्राचा अपघाती म्रुत्यु दाखवल्या जात होता.तो पाहून अंजलीला अस्वस्थ वाटू लागलं. तिने चँनल बदललं पण मनाची अस्वस्थता काही कमी झाली नाही. “आई बाबांना खुप ऊशीर झाला ना?फोन कर ना त्यांना”प्रिया म्हणाली .तिच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर चांगलीच व्याकुळता दिसत होती.अंजलीने मोबाईल घेऊन रितेशचा नंबर डायल केला पण मघासारखाच त्याचा फोन लागला नाही. काय करावं याचा विचार करत असतांनाच तिला एक कल्पना सुचली. रितेशचा मित्र, प्रकाशचा नंबर तिच्याकडे होता. तिने प्रकाशला फोन लावला “भाऊजी हे अजून घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाहिये. काही आँफिसचं महत्वाचं काम होतं का?” प्रकाशने फोन उचलल्यावर तिने विचारलं “नाही तसं तर काही काम नव्हतं आणि रितेश तर साडेसहालाच आँफिसमधून बाहेर पडला. आतापर्यंत घरी पोहचायला हवा होता. मीसुद्धा आताच घरी आलोय. वाटेत खुप पाणी साचलंय. पण तुम्ही काळजी करु नका वहिनी. येईल तो.रस्त्यात कुठंतरी अडकला असेल”“तुम्ही फोन करुन बघता का त्यांना?” “हो करतो ना!आणि लगेच तुम्हांला अपडेट्स कळवतो” “ओके.थँक्स” तिने फोन ठेवला दहा मिनिट्स झाले पंधरा झाले तरी प्रकाशचा फोन आला नाही. शेवटी अंजलीने त्याला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला तेवढ्यात त्याचाच फोन आला. “वहिनी तीनचार वेळा त्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नाहिये. मला काय वाटतं आपण अकरापर्यंत थांबावं. मग नंतर मी कुणालातरी घेऊन त्याला पहायला जातो” “भाऊजी पोलीस कंम्प्लेंट केली तर?” “त्यासाठी आपल्याला सीटी पोलिस स्टेशनला जावं लागेल.एकतर सध्या जोरदार पाऊस सुरु आहे शिवाय ठिकठिकाणी झाडं कोसळून पडली आहेत. त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाणंच मुश्कील. दुसरं म्हणजे मला नक्की नियम माहित नाही पण पोलिसही किमान चोवीस तास वाट बघायला सांगतात मगच तक्रार स्विकारतात. आपण असं करु उद्या सकाळी पोलिस स्टेशनला जाऊ तोपर्यंत वाट बघूया रितेशची” “चालेल भाऊजी मी अकरा वाजता फोन करते तुम्हांला” तिने फोन ठेवला तशी प्रिया एकदम येऊन तिला बिलगली“आई बाबा येतील ना गं?” तिच्या डोळ्यात आसवं जमा होत होती. “हो गं बेटा.येतील.तू चल बरं जेवून घे आणि झोप.उद्या सकाळी शाळेत जायचंय ना?” प्रियाने मान डोलावली “पण मला भुक नाहिये.बाबा आल्यावर आपण एकत्रच जेवूया ना”“नको. त्यांना उशीर झाला तर तू झोपून जाशील. आणि मग जेवणार नाहिस” तिला ते पटलं असावं. म्हणून मग ती आईच्या मागे किचन मध्ये गेली. अंजलीने तिला वाढलं “आई तू पण जेव ना!”“नाही बेटा मी बाबांसोबतच जेवते तुला माहितेय ना?” “हो” प्रियाने जेवायला सुरुवात केली पण चतकोर पोळी खाऊन होत नाही तर ती म्हणाली “आई बस झालं मला भुक नाहिये”“अगं असं काय करतेस? तेवढी पोळी संपव तरी!”“नको ना आई प्लीज. मला खरंच भुक नाहिये”“बरं चल. हात धू आणि झोप” तिला बेडरुममध्ये झोपवून ती बाहेर हाँलमध्ये आली. परत तिने रितेशला फोन लावला पण तोच प्रकार पुन्हा घडला. मग तिने टिव्ही लावला. तिची आवडती सिरीयल सुरु होती पण ती बघण्यातही तिचं मन लागेना. नवरा करतो तशी चँनल वारंवार बदलून ती सर्फिंग करु लागली पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. जरासा गाडीचा आवाज आला की तिचे कान टवकारायचे. टिव्ही म्युटवर करुन ती फाटक उघडण्याचा आवाज ऐकायचा प्रयत्न करायची. दोनतीनदा तर तिने दरवाजा उघडून बाहेरही बघितलं होतं. पाऊस सुरुच होता. खरंतर पाऊस तिला खुप आवडायचा. रिमझिम पावसात तिला भिजायला खुप आवडायचं. पण आताचा पाऊस जीवन देणारा नसून जीवन हिरावून घेणारा होता. या पावसाने आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार कोसळणार होते. उभ्या पिकांना झोपवून टाकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची स्वप्नं भंग पावणार होती. अर्थातच एरवी रोमँटिक वाटणाऱ्या या पावसाला आता मात्र ती मनातल्या मनात शिव्याच देत होती. दहा वाजले. आता बेडरुममध्ये जाऊन पडावं असं वाटून ती उठायला लागली तोच प्रिया बाहेर आली“आई बाबा अजून आलेच नाही का गं?” तिने रडक्या आवाजात विचारलं“नाही बेटा. पण येतील.तू जाऊन झोप”“त्यांचा फोन आला होता?”“नाही. पण मला वाटतंय ते लवकरच येतील” आपल्या स्वतःच्या बोलण्यावर तिला विश्वास नव्हता पण तीच्या समाधानाकरता ती बोलली. प्रिया एकदम जोरजोरात रडायला लागली“आई मला बाबांची खुप आठवण येतेय गं!”अंजलीने तिला जवळ घेतलं“अगं वेडाबाई इतकं रडायला काय झालं? अगं येतील बाबा”“आई त्या आर्यांच्या बाबांसारखे माझे बाबा देवाघरी तर नाही ना गेले?”अंजलीला एकदम धक्का बसला.लेकीच्या मनातली खळबळ तिच्या लक्षात येऊन तीही अस्वस्थ झाली“चल काही काय बोलतेस.असं काही होणार नाही. आणि असं वाईट बोलायचं नसतं बेटा. चल तू झोप बरं”“नाही. मला झोप येत नाहिये. मला माझे बाबा पाहिजेत” ती अजुनच जोरात रडायला लागली “हो पण तू रडल्यामुळे तुझे बाबा परत येतील का?चल आपण दोघीही झोपू”तिला तसंच उचलून अंजली बेडरुममध्ये आली. तिला झोपवून थोपटू लागली. प्रिया अजून रडतच होती. थोड्या वेळाने तिचा आवाज कमीकमी होत गेला आणि शेवटी ती झोपली. ती झोपल्याचं पाहून अंजलीने स्वतः झोपायचा प्रयत्न केला. पण नाना शंका कुशंकांनी भरलेलं मन तिला झोपू देत नव्हतं. ती उठून हाँलकडे आली. वाटेत देवघर दिसलं आणि ती थबकली. देवासमोर उभं राहून तिने हात जोडले. “देवा काही चुकलं असेल तर माफ कर पण माझ्या नवऱ्याला सुरक्षित घरी येऊ देरे बाबा” तिने प्रार्थना केली. संकटाच्या वेळी तिची आई गणपती पाण्यात ठेवायची याची तिला आठवण आली.”आपणही ठेवावा का तसा?” तिला प्रश्न पडला.”नको. अजून तितकी वाईट वेळ आली नाहिये” तिने स्वतःच त्याचं उत्तर दिलं आणि ती हाँलमध्ये येऊन सोफ्यावर बसून राहिली. हाँलमधला लाईटही लावायची तिला इच्छा झाली नाही. बसल्याबसल्या रितेशचा हसरा तिच्या नजरेसमोर उभा राहिला. त्याच्यासोबत घालवलेल्या गेल्या सहासात वर्षातले अनेक बरेवाईट प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. रितेश तसा चांगलाच होता. हसतमुख होता, समजदार होता. पण आईवडिलांबाबतीत नको तेव्हढा संवेदनशील होता. त्यांच्यातले दाखवलेले दोष त्याला आवडायचे नाहीत. याचं कारणही तसंच होतं. रितेशला त्याच्या आईवडिलांनी अतिशय विपरीत परिस्थितीत वाढवलं होतं. त्याची जाण रितेशला…
निर्णय
“शुभा,ए शुभा,उठ लवकर.अगं किती वेळ झोपून रहाणार आहेस?”संगीता आपल्या लेकीला ओरडून म्हणाली. “झोपू दे ना आई.रात्री दोनपर्यंत मी झोपले नव्हते” “हो! माहीतेय मला दोनपर्यंत तू काय केलं असशील ते! फेसबुक नाहीतर व्हाँटस्अप वर चँटींग या व्यतिरीक्त काय केलं असणार? अभ्यास तर केलाच नसशील. चल उठ लवकर. नऊ वाजलेत” “तू ना बाई अशीच आहे. माहीतेय माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात.” “चांगल्या मुलींशी तर तू मैत्रीच नको करु. आपल्या कामवालीची मुलगी बघ. सगळं आवरुन सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते” “ए बाई नको लेक्चर देऊस सकाळी सकाळी. उठते मी” शुभा धुसफूस करतच उठली. बेड न आवरता, चादरी तशाच बेडवर फेकून ती ब्रश करायला गेली. संगीताने हताशपणे तिचं बेड आवरलं. हा प्रसंग आता रोजचाच झाला होता. ग्रँजुएशन आटोपल्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी शुभा घरीच होती. म्हणायला ती क्लासेसला जायची पण तिचं अभ्यासात लक्षच नव्हतं. सदोदित मोबाईल घेऊन व्हाँटस्अप नाहीतर फेसबुकवर तिचं चँटींग सुरु असायचं. त्याचा कंटाळा आला की टिव्हीवरच्या सिरीयल्स बघणं हेच तिचं जीवन बनलं होतं. एकुलती एक मुलगी म्हणून तिला रवी आणि संगीताने मोठ्या लाडाने वाढवलं होतं. तिचा प्रत्येक हट्ट पुरवला होता. त्यावेळची परीस्थितीही उत्तम होती. रवी एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता. संगीता एम.एड असूनही तिला त्याने नोकरी करु दिली नव्हती. तशी गरजही नव्हती. पण सुखाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही. रवीच्या कंपनीत दोन राजकीय पक्षांच्या युनियन स्थापन झाल्या आणि संघर्षाला सुरुवात झाली. काम कमी आणि भानगडीच जास्त होऊ लागल्या. प्राँडक्शन ठप्प झालं. पोलिस केसेस जास्त होऊ लागल्या. शेवटी कटकटींना कंटाळून मँनेजमेंटने कंपनीच बंद केली. हजारो कामगार बेकार झाले. रवीसारखे इमानदार अधिकारीही त्यात भरडले गेले. युनियन लिडर्सनी कामगारांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले आणि कोर्टात केसेस दाखल केल्या. पण कोर्टातील प्रकरणं गोगलगाईच्या गतीने पुढे सरकत असतात. कंपनी बंद होऊन दहा वर्षं होऊन गेली तरी कोणताच निकाल लागला नव्हता. रवीला घरी बसावं लागलं तशी संगीताने एका शाळेत नोकरी धरली. ‘काही महिने मोफत काम करा मग पगार सुरु करु’ असं तिला सांगण्यात आलं. कधीतरी पगार सुरु होईल या आशेवर संगीता शाळेत शिकवत राहीली. रवीनेही खटपट करुन एका सुपर शाँपीमध्ये मँनेजरची नोकरी मिळवली पण पगार अगदीच कमी होता. पाच वर्षानंतर एका संचालकाच्या ओळखीने संगीताला महिना पाच हजार पगार सुरु झाला. त्यालाही आता पाच वर्षं होऊन गेली होती अजूनही ती परमनंट नव्हती. रवी नोकरीत असतांना त्यांनी कर्ज घेऊन घर बांधलं होतं. त्याचे हप्ते अजून सुरु होते. दोघांच्या तुटपुंज्या पगारात संसार कसातरी सुरु होता. पण शुभाला त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नव्हती. ती अकरावीत असतांनाच तिला त्यांनी मोबाईल आणि लँपटाँप घेऊन दिले होते. आपली मुलगी माँडर्न टेक्नॉलॉजीत मागे पडायला नको आणि तिच्या मित्रमैत्रिणीत तिचं हसं व्हायला नको हा त्यामागचा हेतू होता. पण सोशल मिडीयात वावरण्याव्यतिरीक्त शुभाने या टेक्नॉलॉजीचा दुसरा वापरच केला नव्हता. बारावीत ती कशीबशी पास झाली होती. बी.एस्सीतही तिला चांगले मार्क्स नव्हते. आता एमपीएससी करायचं खुळ तिच्या डोक्यात कुणीतरी भरवलं होतं पण अभ्यास करण्याऐवजी दिवसरात्र ती मोबाईल घेऊन पडलेली असायची. संगीताला ती कोणत्याच घरातल्या कामात मदत करायची तर नाहीच उलट संगीतालाच ती आपल्या तालावर नाचवायची. त्यामुळे परवडत नसतांनाही संगीताला धुण्याभांड्यासाठी बाई लावावी लागली होती. शुभाचं वागणंही अतिशय उर्मटपणाचं होतं. त्याबद्दल आईवडीलांनी तिला अनेकदा समजावून सांगितलं होतं पण तिच्या डोक्यात काहीएक फरक पडला नव्हता. या एप्रिलमध्ये संगीताच्या शाळेतले दोन शिक्षक निव्रुत्त होणार होते. त्यांच्या जागी संगीताची वर्णी लागण्याची शक्यता होती. कारण टेंपररी शिक्षकात तीच सिनियर होती. अपेक्षेप्रमाणे एक दिवस तिच्या ओळखीच्या संचालकांनी तिला बोलावून घेतलं. “मँडम अभिनंदन. कालच संचालक मंडळाची मिटींग झाली आणि तुम्हाला परमनंट करण्याचा निर्णय घेण्यात आलाये ” संचालक प्रफुल्लित चेहऱ्याने तिला सांगत होते. संगीताच्या आनंदाला पारावार उरला नाही. दहा वर्षाच्या मेहनतीचं फळ आज मिळणार होतं. “धन्यवाद सर” “पण तुम्हांला माहीत आहे आजकाल फुकट काही मिळत नाही. मँनेजमेंटने अकरा लाखाची डिमांड केली आहे” संगीताचं उडणारं विमान एकदम जमीनीवर कोसळलं. “काय्य…..अकरा लाख? सर मी इतके पैसे कुठून आणू? आणि सर तुम्हांला माहीत आहे मी पाच वर्षे अगदी फुकट शिकवलंय. नंतरची पाच वर्षही मी अक्षरशः पाच हजारात काम केलंय” “मँडम तो विचार करुनच मी मँनेजमेंटला पैसे कमी करायला सांगितले. ते तर सोळा लाख मागत होते. आणि तुम्हाला कल्पना नसेल सोळा लाख देणारेही आहेत आपल्या स्टाफमध्ये.देणारे आहेत म्हणून तर मँनेजमेंटचं फावतंय. तेव्हा ही संधी चुकवू नका. पुढे परमनंट व्हायला तुम्हाला किती वर्ष लागतील सांगता येत नाही” ” सर थोडे थोडे करुन दिले तर चालतील?” “साँरी मँडम.त्याकरता तुम्हांला चेअरमनसाहेबांना भेटावं लागेल.त्यांना चालत असेल तर आम्हांला काही प्राँब्लेम नाही “ चेअरमनचं नांव ऐकताच संगीता शहारली. चेअरमन एक नंबरचा स्त्रीलंपट माणूस होता. त्याची नजर अतिशय घाणेरडी होती. तिने त्याच्या लंपटपणाचे अनेक किस्से ऐकले तर होतेच पण त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तिच्यासह इतर शिक्षिकांसोबत त्याने केलेली घाणेरडी लगट ती विसरली नव्हती. डोळ्यात आलेले अश्रू तिने कसेबसे आवरले. “सर मी तुम्हांला तीनचार दिवसात कळवते” “लवकरात लवकर कळवा म्हणजे आम्हांला तसा निर्णय घेता येईल” तिने मान डोलावली. घरी येऊन तिने रवीशी चर्चा केली. पण दोघांना कोणताच मार्ग दिसत नव्हता. आधीच घराचं कर्ज होतं. त्यामुळे नवीन कर्ज मिळणं कठीण होतं. इतके पैसे एकदम देऊ शकतील असे नातेवाईकही नव्हते.आणि असते तरी कुणाच्या उत्कर्षावर जळणारे पैसे थोडीच देतात! एक मंगळसूत्र सोडलं तर संगीताचे सगळे दागिने घराच्या बांधकामासाठी खर्ची पडले होते. त्यात दोघांनाही असं लाच देऊन काम करुन घेणं पसंत नव्हतं. काहीच निर्णय न झाल्याने सात दिवस संगीताने संचालकांना काहीच कळवलं नाही. शेवटी पुढच्या आठवड्यात नको ती बातमी आली. प्रत्येकी सोळा लाख घेऊन मँनेजमेंटने तिच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर असलेल्या शिक्षकांना परमनंट केलं होतं. संताप, अपमान आणि दुःख यांची धगधग मनात घेऊन संगीता घरी परतली. घराचं दार सताड उघडं होतं. सोफ्यावर एक कुत्रं झोपलं होतं. सगळीकडे पसाराच पसारा होता. तिने कुत्र्याला हाकललं. शुभाला हाक मारली. कुठलाच प्रतिसाद आला नाही. ती शुभाच्या खोलीत आली. शुभा कानाला हेडफोन लावून मोबाईल बघत होती. संगीताने तिला दोनतीन हाका मारल्या पण तिने उत्तर दिलं नाही. संतापून संगीता तिच्याजवळ गेली. तिच्या कानावरचे हेडफोन तिने खेचून काढले. हातातला मोबाईल हिसकावला आणि जमीनीवर जोराने आपटला. त्याचे तुकडे तुकडे झाले. मग तिने शुभाला हाताला धरुन उठवलं आणि तिला बेफाम होऊन मारु लागली. शुभाला आई एवढी का संतापलीय ते कळेना. मारता मारता संगीताच्या तोंडाचा पट्टा सुरुच होता “नालायक. जेव्हा पहावं तेव्हा हातात मोबाईल. जेव्हा. हातात मोबाईल. आईला काय त्रास होतोय, बापाला काय त्रास होतोय काहीच समजत नाही ना तुला! अभ्यास करायचा सोडून ही थेरं सुचताहेत तुला नाही का?” शुभा जोरजोरात रडायला लागली आणि संगीताच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच संगीता मारायची थांबली. तिची नजर खाली पार्ट न पार्ट वेगळ्या झालेल्या मोबाईलवर पडली. संतापून तिने पायाने तो अजूनच चिरडून टाकला आणि मग रडत रडत ती स्वतःच्या बेडरूममध्ये गेली. बेडवर पडून ती…
मोबदला
शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली” अहो जरा अण्णांना बघता का? खुप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत”“हो.फ्रेश झालो की लगेच बघतो”बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं” काय झालं अण्णा? काय होतंय?” स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला“काय म्हणालात कळलं नाही. परत एकदा सांगा”“म….ला…..दे……वा……क…..डे……जा….य…चं….य” परत हात वर करुन ते म्हणालेशिरीषच्या डोळ्यात पाणी आलं.तरी स्वतःला सावरत तो म्हणाला“मी कोण तुम्हांला देवाकडे नेणारा. त्याला न्यायचं तेव्हा नेईल. आणि अजून तुम्हांला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले.“बरं बरं तुम्ही पडा.काही दुखतंय का तुमचं?”त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरुन, पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला.का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला गहिवरुन आलं. पण असं रडून चालणार नव्हतं. स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं“डाँक्टरला बोलावू?”त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला.“बरं बरं.मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला”अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला“काय झालं? काय होतंय त्यांना? “नेहाने विचारलं” काही होत नाहिये. त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत. कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच” शिरीष गहिवरुन म्हणाला. शिरीष योग्यच म्हणतोय हे नेहाच्या लक्षात आलं. गेली सात वर्ष अण्णा पँरँलिसीस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे. पण ते तेवढंच.खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं. सुरवातीचं एक वर्ष बरं गेलं.एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही मोठे भाऊ निर्मल आणि गुणवंत तसंच त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची.अण्णांची छोटीशी मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिने मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत, घरी आलो की चहापाणी, स्वयंपाक करुन वाढणं, नंतर सगळं आवरणं केलं पाहिजे असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता. घरात कामावरुन कटकटी वाढल्या आणि बायकांची भांडणं होऊ लागली तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही जावांच्या अरेरावीला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसतांना त्याला वेगळं व्हावं लागलं. अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले.शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करुन टाकलं. नेहा आणि शिरीष असतांना त्यांची खुप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवण,औषधं असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुध्दा कुणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही. त्याचा परीणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पँरँलिसीसचा अटँक आला. आता तर निर्मल,गुणवंतची चांगलीच पंचाईत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्या तरी घेऊन किती घेणार? घरात परत एकदा भांडणं होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं.शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं.दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्विकारली.एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची अंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा.नेहा त्यांना जेवू घालणं,त्यांना औषधं देणं, त्याच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची.शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती.त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा.अतिशय कामात असतांना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा.त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा.रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पुर्ण शहरातून फिरवून आणायचा.तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली.मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमीकमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते. झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला” आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत.रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत” मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला” अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत.रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला”अण्णांनी मान डोलावली. रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं. पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमित सुरु होता.सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे बघितलं. ते फ्रेश वाटत होते. त्याला हायसं वाटलं” कसं वाटतंय?”त्याने विचारलं. त्यांनी हाताने ठिक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.“अण्णा मी येतो अंघोळ करुन.मग तुमचा चहा झाला की तुम्हाला अंघोळ घालेन”अण्णांनी मान डोलावली. शिरीष रुमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली.शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिलाही हायसं वाटलं.शिरीष अंघोळ करुन बाथरुमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली“अहो अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही”शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाही. त्यांच्या रुममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला“डाँक्टरांना पटकन फोन लाव.अण्णा….”पुढे त्याला काही बोलता येईना.डाँक्टर आले. अण्णा गेल्याचं निदान करुन गेले. शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला. घरात शेजारपाजाऱ्यांची गर्दी जमली तसा शिरीष भानावर आला. सगळ्यांना कळवणं भाग होतं. त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला-निर्मलला फोन लावला.” दादा अण्णा गेले”“काय?असे कसे गेले? मागच्या आठवड्यात तर चांगले होते.तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना?”“सकाळपर्यंत चांगले होते. अचानक काय झालं माहीत नाही. बरं तू लवकर ये मग सांगेन तुला सविस्तर”“अरे बापरे,शिरीष,आम्हांला आज ट्रिपला जायचं होतं रे.आता निघणारच होतो. आता कँन्सल करावं लागणार”तेवढ्यात शोभा वहिनीने फोन घेतला” शिरीष भाऊजी,अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हांला रात्रीच कळवायचं ना! आता आम्ही ट्रीपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये.तिचे पैसे आता कोण देणार?”शिरीषला संताप आला पण तो शांत राहिला.वाद घालायची ही वेळ नव्हती.त्याने फोन बंद करुन मधला भाऊ-गुणवंतला फोन लावला.अण्णांची बातमी सांगितली“ओ माय गाँड! शिरीष मी आता जालन्यात आहे. मला यायला…
पणत्या
“माधुरी तुझी पुजा झाली की या लाईटांकडे बघ जरा.बराच वेळेपासून लागत नाहीयेत”पोळ्या लाटता लाटता अनिता पुजा करणाऱ्या माधुरीला म्हणाली.“बस आरती झाली की बघतेच तिकडे.अगं ताई हा श्री ही का रडतोय कळत नाहीये”“त्याला काहीतरी त्रास नक्कीच होतोय.बघशील जरा त्याच्याकडे”“बरं बघते”माधुरीने आरती म्हणायला सुरुवात केली.आरती झाल्यावर तिने स्टूल घेऊन फ्यूज पाहीला.तिच्या अंदाजानुसार तो उडालाच होता. नवीन फ्यूज तार बसवून तिने तो व्यवस्थित केला. पण किचनची ट्युब अजून चालूच होत नव्हती. मग तिने तिथलाही फाँल्ट शोधून काढला. स्टार्टरची निघालेली वायर तिने जोडली तशी ट्यूब सुरु झाली. माधुरी नुकतीच इलेक्ट्रिकल इंजीनियर झाली होती. टेक्नीकल गोष्टी करायला तिला फार आवडत.अनिताने भाजीला फोडणी टाकली तशी माधुरी श्री च्या खोलीत गेली. श्री जन्मतःच मतिमंद होता. त्याला बोलता येत नव्हतं. तोंडातून लाळ सारखी गळत असायची. स्वतःच्या हाताने त्याला जेवताही येत नसायचं. या दोघी बहिणीच त्याचे दात घासून देणं,अंघोळ घालून देणं,चहा पाजणं,जेवू घालणं करायच्या. दोन मुलीनंतर वंशाला दिवा पाहीजे म्हणून त्याला जन्म देण्यात आला पण जन्मतःच तो विद्रूप दिसत होता. त्याला पाहून डाँक्टर म्हंटलेही होते ‘कशाला त्याला जिवंत ठेवता’ म्हणून. पण नवस, उपास तापास करुन झालेला मुलगा मारायची कल्पनाच अनिता आणि माधुरीच्या आईला-सुनंदाबाईंना सहन झाली नव्हती. मोठा होईल तसा नाँर्मल होईल या आशेवर त्याला वाढवण्यात आलं. काय नाही केलं त्याच्यासाठी?सगळे निष्णात डाँक्टर्स, वैद्य झाले. देवधर्म झाले. पण त्याच्यात कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. आज तो सतरा वर्षाचा होता. शरीराने, उंचीने वाढला होता. पण बुध्दीने मंदच होता.माधुरी त्याच्या खोलीत गेली. तो अजूनही रडतच होता. तिने सहजच त्यांच्या अंगाला हात लावला. चांगलाच तापला होता. ती अनिताला हाक मारणार तेवढ्यात अनिताच खोलीत आली.“खुप ताप आहे ताई त्याला.डाँक्टरांकडे घेऊन जाऊ?”माधुरीने विचारलं.“माझा अजून स्वयंपाक व्हायचाय. तुलाच त्याला न्यावं लागेल. लवकर जा म्हणजे मग मला आँफिसला गाडी घेऊन जायला बरं पडेल.”अनिता नुकतीच चार्टर्ड अकाउंटंट झाली होती. प्रँक्टिसकरता एका फर्ममध्ये नोकरी करत होती. माधुरीने अँक्टिव्हावर आपल्या भावाला बसवलं.तो पडू नये अशी देवाला प्रार्थना केली. आणि दवाखान्याकडे निघाली.अनिताने स्वयंपाक झाल्यावर आपला डबा भरुन घेतला. बाकीचं सगळं व्यवस्थित टेबलवर झाकुन ठेवलं. आपली तयारी केली.आणि माधुरीची वाट बघू लागली.बराच वेळाने माधुरी परत आली.“का गं इतका वेळ?”अनिताने विचारलं“अगं श्रीला डाँक्टरांना दाखवलं आणि परत निघाले तर गाडी सुरुच होईना. जवळपास गँरेज नव्हतं. शेवटी पँनल उघडून स्पार्क प्लग साफ केला तेव्हा गाडी सुरु झाली”“बरं काय म्हणाले डाँक्टर?”“त्यांनी काही टेस्ट सागितल्या आहेत करायला.सध्या साथ आहे म्हणे टायफॉईड, मलेरियाची”“बापरे तसं काही नसावं श्री ला. आधीच काही सांगता येत नाही बिचाऱ्याला. तू असं कर जेवून घे आणि मग रिक्षाने घेऊन जा त्याला लँबमध्ये.मला लागेल गाडी.टेस्ट्सचे रिझल्ट्स कळव मला”“ओके तू निघ. मी बघते काय करायचं ते”अनिता गेल्यावर माधुरीने श्रीला झोपवलं आणि त्याला वरणभात भरवायला सुरुवात केली. पण त्याने चारपाचच घास खाऊन तोंड फिरवलं. अशा तापात त्याला काही खावंसं वाटणार नाही हे तिच्या लक्षात आलं. तिला स्वतःला अजिबात खायची इच्छा नव्हती. शेवटी तिने दरवाजाला कुलुपं लावली. चौकातून रिक्षा आणली आणि श्रीला त्यात बसवून लँबकडे निघाली.लँबमध्ये प्रचंड गर्दी होती. श्रीचा हात धरुन माधुरी आत शिरली तसे सगळे लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पहायला लागले.माधुरीला अशा नजरांची सवय झाली होती. त्यामुळे तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. नर्स ने श्रीचं रक्त घेऊन दोन तासांनी रिपोर्ट घेण्यासाठी यायला सांगितलं. माधुरी श्रीला घरी घेऊन आली. शंकाकुशंकांनी तिचं मन भरुन आलं होतं. ती आठ वर्षांची असतांना तिची आई अशीच अल्पशा आजाराचं निमित्त होऊन वारली होती. त्यावेळी श्री फक्त पाच वर्षाचा होता तर अनिता दहा वर्षाची. माधवरावांना त्यांच्या नातेवाईकांनी दुसरं लग्न करण्याचा खुप आग्रह केला पण मुलांवरच्या प्रेमामुळे अवघ्या ३५ व्या वर्षीही त्यांनी दुसऱ्या लग्नाला नकार दिला. श्रीपादसारख्या मतीमंद मुलाला सांभाळत त्यांनी दोन्ही मुलींवर उत्तम संस्कार केले.मानसिक आणि शारिरीकरीत्या कणखर बनवलं होतं. दोन्ही मुलींनी कराटेत ब्लँकबेल्ट मिळवला होता. अनिता बँडमिंटन चँपियन तर माधुरी स्विमिंग चँपियन होती. दोघींनी राष्ट्रीय स्पर्धात राज्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. स्वयंपाक आणि घरकामातही दोघी निपूण होत्या. जाणत्या झाल्या तशी भावाची जबाबदारीही त्यांनी स्विकारली होती. वेडगळ भावाची त्यांनी कधी किळस केली नव्हती की त्याला हिडीसफिडीस केली नव्हती. राखीपोर्णिमेला आणि भाऊबिजेला त्याला त्या प्रेमाने ओवाळायच्या. दोन तासांनी माधुरी रिपोर्ट घ्यायला लँबमध्ये गेली. थरथरत्या हाताने तिने ते रिपोर्ट वाचले आणि तिला प्रचंड धक्का बसला. ज्याची भिती होती तो टायफॉईड श्रीपादला झाला नव्हता तर त्याला डेंग्यूची लागण झाली होती. गेल्या २-३ महिन्यात डेंग्यूमुळे मेलेल्यांच्या बातम्या माधुरीच्या डोळ्यासमोर आल्या आणि तिचे डोळे पाणावले. तिने पटकन मोबाईल काढून डाँक्टरांना फोन केला.रिपोर्टबद्दल माहीती दिली. त्यांनी तिला श्रीपादला ताबडतोब हाँस्पिटलमध्ये अँडमीट करायला सांगितलं. मग तिने वडिलांना-माधवरावांना फोन केला ते अमरावतीला मिटींगमध्ये होते. मिटींग सोडून ते नागपूरला यायला निघाले. नंतर तिने अनिताला फोन केला. अनिता लगेच घरी यायला निघाली. एक दिड तासांतच दोघींनी श्रीला दवाखान्यात अँडमीट केलं.माधुरीच्या डोळ्यातलं पाणी पाहून अनिताने तिला जवळ घेतलं.“रडू नकोस.काही होणार नाही त्याला”“ताई मला आईची खुप आठवण येतेय गं!ती अशीच आपल्याला सोडून गेली होती.”आईच्या आठवणीने अनितालाही गहिवरुन आलं.पण तिला असं भावूक होऊन चालणार नव्हतं.तिने माधुरीच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाली“बाबा येतील लवकरच.ते सगळं व्यवस्थित सांभाळतील.मला सांग तू जेवली आहेस ना?”“नाही गं.मला भुकच नाही लागली श्री च्या काळजीने”” अगं वेडी आहेस का?जा खाली जाऊन काँफी तरी पिऊन ये.नाही तर चल मीही येते तुझ्याबरोबर!तू तशी जाणार नाहीस” चार दिवसानंतर श्रीपाद ची तब्येत जास्तच बिघडली. प्लेटलेट्स खुप कमी झाल्या. बी.पी.कमी झाला. त्याला आय.सी.यु.मध्ये हलवलं गेलं. आँक्सिजन लावण्यात आला. ब्लडबँकेतून आणून प्लेटलेट्स देण्यात आल्या. त्याने थोडासा दिलासा मिळाला. मात्र सातव्या दिवशी तो जास्तच क्रिटीकल झाला आणि दुपारी चार वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्याचं म्रुत शरीर बाहेर आणलं तशी दोन्ही मुली त्याला मिठी मारुन रडू लागल्या. माधवराव सुन्न अवस्थेत एका कोपऱ्यात बसून राहीले. त्यांच्या वंशाचा दिवा न चमकताच विझून गेला होता.श्रीपादचं शव घरी आणण्यात आलं. शेजाऱ्यापाजाऱ्यांची, नातेवाईकांची गर्दी जमा झाली. दोघी मुलींना रडतांना पाहून एक बाई म्हणाली. “जाऊ द्या मुलींनो गेला तर गेला तुमचा भाऊ. असाही कोणत्या कामाचा होता तो!” ते ऐकताच अनिता उसळून म्हणाली “असं कसं म्हणता काकू!कसाही असला तरी तो आमचा भाऊ होता आणि आमचं खुप प्रेम होतं त्याच्यावर” लग्नं ठरली त्यादिवशी माधवराव खुप आनंदात होते.पण मुलींच्या चेहऱ्यावर उदासिनता दिसत होती.“का गं मुलींनो अशा उदास का?तुम्हाला आनंद नाही झाला?”“बाबा तुम्हांला सोडून जायच्या कल्पनेनेच जीव घाबराघुबरा होतोय”अनिता म्हणाली.तिचे डोळे आसवांनी भरुन आले होते.“बेटा ही जगरहाटी आहे आणि ती योग्यसुध्दा आहे”माधवराव म्हणाले“ताई आपण असू करुया का?बाबांना तुझ्याकडे सहा महिने माझ्याकडे सहा महिने असं ठेवायचं का?”माधुरीने विचारलं. माधवराव हसले.“आपल्या सासूसासऱ्यांना आईवडील मानणारे जावई फार थोडे असतात बेटा.मात्र मुलीने आपल्या सासूसासऱ्यांना आईवडील मानलंच पाहीजे असा अट्टाहास केल्या जातो”“माधुरी आपण बाबांचं लग्न लावून द्यायचं का?”अनिता म्हणाली तसे माधवराव जोरात हसले. मग गंभीर होत म्हणाले” तुम्ही लहान असतांना मला तशी संधी चालून आली होती. पण नव्या बायकोने तुमच्याशी वाईट वागणं मला सहन झालं नसतं. आताही माझ्या लग्नानंतर…
ब्लँकेट
“साहेब मी आलो दोन मिनिटात” करंगळी दाखवत माझा ड्रायव्हर, प्रकाश गाडीच्या बाहेर पडला. मी बाहेर पाहीलं. दिवस उजाडायला सुरुवात झाली होती. गाडी कितीही आरामदायी असली तरी नागपूर ते नाशिक प्रवास चांगलंच शरीर आंबवणारा होता. मी गाडीचं दार उघडून बाहेर आलो. बापरे! काय थंडी होती. मी गाडीतून स्वेटर काढून अंगावर चढवला. सहज माझी नजर रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या लोकांवर गेली. बिचारे! होते ते कपडे अंगावर लपेटून झोपले होते. एक बाई अंगाभोवती साडी लपेटून झोपली होती तर तिच्याच शेजारी एक पुरुष पोटाशी पाय घेऊन झोपला होता. दोघंही थंडीने कुडकुडत होते. मला दया आली. मी गाडीतली शाल काढून त्या पुरुषाच्या अंगावर टाकू लागलो. थंडीमुळे तो बहुतेक जागाच असावा. त्याने डोळे उघडले. ‘बाईच्या अंगावर टाका. ‘बाईकडे बोट दाखवून तो म्हणाला. मी बाईच्या अंगावर शाल टाकली. तीही बहुधा जागीच असावी. तिनं पटकन शाल तोंडापर्यंत ओढून घेतली. मी त्या माणसासाठी काही मिळतं का ते गाडीत पाहू लागलो.तेवढ्यात प्रकाश आला. “प्रकाश तुझ्याकडे शाल आहे का?” मी विचारलं