पार्टीचं ठरलं तसा आकाश सर्वांना म्हणाला“अरे मिल्याला कळवून देवूया पार्टीचं.म्हणजे तो दुसरी कामं सोडून येईल.नाहीतर त्याचं चालतं मला हे काम आहे, ते काम आहे”“ए हा मिल्या आजकाल घरात फार लक्ष द्यायला लागलाय.त्याला एकदा समजवा रे. लग्न झाल्यावर करायचीच आहेत म्हणा घरातली कामं “पुजा ओरडली.” हो ना यार.थांब मीच त्याला फोन लावतो”समीर म्हणाला आणि त्याने मिलींदला फोन लावला.“ए स्पीकर आँन कर”आकाश समीरवर ओरडला तसा समीरने स्पीकर आँन केला” हँलो मिल्या अरे या रविवारी आपण पार्टी ठेवलीये.येतोस का जरा इकडे.हाँटेलचं ठरवू या”” साँरी यार समीर .मी आता ठरवलंय,वडिलांच्या पैशाने पार्टी करायची नाही”मिलिंद म्हणाला“आता हे नवीन काय शोधून काढलंस?”“नवीन नाही. आपण इंजीनियर झालो तेव्हाच मी ठरवलं होतं की जास्तीतजास्त सहा महिने वडिलांच्या पैशावर मजा करायची कारण एक मुलगा म्हणून वडिलांवर आपला तो हक्क आहे.पण सहा महिने होऊन गेलेत आपल्याला नोकरी नाही. आता वडिलांच्या पैशाने काहिच करायचं नाही. मी बाईकही वापरणं सोडलंय.सध्या सायकलवरुनच फिरत असतो आणि तेही काम असेल तरच.रिकामं फिरणं टोटली बंद.हा मोबाईलही नोकरी नाही मिळाली तर या महिन्याच्या शेवटी बंद होणार आहे”” अरे मिल्या तुला वेड तर लागलं नाही ना?”आकाश त्रासून म्हणाला ” घरात काही भांडण झालंय का?काका काही बोललेत का?”“नाही रे!पण तुला माहित नसेल त्यांनी फार कष्टात दिवस काढलेत.कधी एक वेळ जेवून तर कधी उपाशी राहून.आज ते क्लास वन आँफिसर आहेत पण अजुनही त्यांची रहाणी किती साधी आहे हे तुम्हीही पाहिलं असेलच”“मिल्या आमच्या सगळ्यांच्या वडिलांपेक्षा तुझ्या वडिलांना जास्त पगार मिळतो.पैशांची कसलीच कमतरता नाही. मग कशाला यार ही कंजूसी?बरं तुझ्याकडे नसतील तर आम्ही भरतो तुझे पैसे.पण तू ये यार”नयना चिडून म्हणाली“नयना आणि माझ्या मित्रांनो माझी तुम्हांला विनंती आहे की तुम्हीही वडिलांच्या पैशावर ऐश करणं सोडून द्या.माझ्या वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून कामाला सुरुवात केली आपण बावीसाव्या वर्षी करायला काय हरकत आहे?आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं,मोठं केलं,कमावण्यालायक केलं.आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्यावर ओझं न बनता स्वकमाईवर जगलं पाहिजे”” अरे पण कुणी नोकरी दिली तर आपणही करु.आपण कुठं नाही म्हणतोय?नोकरीच मिळत नाही तर आपण काय करणार?”“इंजीनियरची नोकरी नसेल मिळत तर दुसरे जाँब करायला काय हरकत आहे?मी तर बघायला सुरुवातही केली आहे”“ए बाबा तुला यायचं नसेल तर नको येऊ पण बोर नको करु यार.मी फोन बंद करतोय”समीर वैतागून म्हणाला आणि त्याने फोन बंद केला“यार हा मिल्या वेडा झालाय.हे आदर्शवादी विचार याच्या डोक्यात कुठून घुसले काय माहीत?”आकाश निराशेने मान हलवत म्हणाला “बरं मग पार्टी करायची की नाही?महिना झाला आपण बोर झालोय.मिल्या नाही आला तरी करु.काय म्हणताय?”“ए पण आकाश मिल्याशिवाय कशीतरीच वाटेल रे पार्टी.मिल्या म्हणजे जाँली माणूस.नुसती धमाल आणतो पार्टीत”नयना म्हणाली“बोडख्याचा जाँली.बघितलंस ना किती सिरीयसली बोलत होता.म्हणे वडिलांच्या पैशाने काहीच करणार नाही”पुजा करवादलीमग त्या सातही मित्रांचा बराच खल झाला आणि हो नाही करता करता शेवटी हायवेवरच्या”हाँटेल प्राईड” मध्ये पार्टी करायचं नक्की झालं. हाँटेल प्राईड चांगलंच महागडं हाँटेल होतं.पण तिथे कुठेही मिळणार नाहीत असे चवदार पदार्थ मिळायचे शिवाय निसर्गरम्य वातावरणात छान ग्रुपमध्ये जेवता यायचं.ठरल्यानुसार आकाश,समीर,सुशांत अगोदरच पोहचले त्यांनी टेबल्स व्यवस्थित लावून घेतले मग नयना,पुजा,रश्मी,तनुजा पोहचल्या.” यार मिल्या आला असता तर मजा आली असती”सगळे टेबलभोवती बसल्यावर आकाश म्हणाला” मिल्याशिवाय ही आपली पहिलीच पार्टी असेल.तो नाही तर कसंतरीच वाटतंय” पुजा म्हणाली.तेवढ्यात एक सुटाबुटातला कँप्टन तिथे आला.त्याने तीन चार मेनूकार्ड टेबलवर ठेवली आणि अदबीने उभा राहिला.सगळ्यांच्या गप्पा सुरुच होत्या.“एस्क्युज मी सर.काही स्टार्टर, कोल्ड्रिंक्स हवीत का सर?”तो आवाज ऐकून समीरच्या डोक्याला झिणझिण्या आल्या त्याने चमकून त्या माणसाकडे पाहिलं आणि जोरात ओरडला” मिल्या तू….?”सगळा ग्रुप दचकून त्या माणसाकडे पाहू लागला“अरे मिल्या तू इकडे काय करतोहेस?तुला कसं कळलं आम्ही इकडे येणार आहे?बसबस ती चेअर घे”आकाशचं आश्चर्य अजुनही कमी होतं नव्हतं“साँरी सर मी तुमच्यासोबत बसू शकत नाही. आपण माझे आदरणीय कस्टमर आहात”मिलींद गंभीरपणे म्हणाला“मिल्या ये जोक हमको बहुत अच्छा लगा.बसबस आता जास्त भाव नको खाऊस.तुला सरप्राईज द्यायचं होतं ना आम्हांला?”तनुजा हसत म्हणाली“नाही मँडम.मला तुम्हांला सरप्राईज नव्हतं द्यायचं.मी इथला नोकर आहे.तुमची आँर्डर घ्यायला आलोय.काही स्टार्टर आणू का?आमच्या इथलं व्हेज प्लँटर खुप छान आहे मँडम.हराभरा कबाबही मस्तच आहेत”सगळे अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागले.एक आय.टी. इंजीनियर हाँटेलमध्ये काम करतोय हे त्यांच्या पचनी पडत नव्हतं.“मिल्या तू खरंच इथे नोकरी करतोहेस की तू हे हाँटेल विकत घेतलंय की तू आमची गंमत करतोहेस? “सुशांतने अस्वस्थ होऊन विचारलं” नाही मी खरंच नोकरी करतोय.पाचच दिवस झालेत मला लागून”“तुझ्या घरी हे माहित आहे?”नयनाने विचारलं” हो तर.त्यांना आवडला माझा निर्णय.तुम्हांला माहितेय वेस्टर्न कंट्रीजमध्ये विद्यार्थ्यांनी वेटरचं काम करणं काँमन असतं.आणि बघा ना मी चांगला सुटाबुटात आहे.फक्त आपल्या पदार्थांची माहिती द्यायची आणि कस्टमरच्या आँर्डर्स घ्यायच्या एवढंच माझं काम.क्वचित प्रसंगी वेटरचंही काम करावं लागतं पण मला त्याची लाज नाही. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे मी वडिलांकडून शिकलोय.शिवाय सुटेबल नोकरी मिळाली की ही नोकरी सोडता येईल.तोपर्यंत आपण आपल्या स्वकमाईचं खातोय याचं समाधान तर असेल”सगळे कधी त्याच्याकडे तर कधी एकमेकांकडे बघत होते.मिलींदचे विचार त्यांना पटत होते पण असं धाडस आपल्याकडून कधीतरी होईल का?याची खात्री वाटत नव्हती.आँर्डर्स दिल्या गेल्या.मिलींद त्यांची आँर्डर घेऊन दुसऱ्या टेबलवर गेला.स्टार्टर आलं मग जेवणही आलं पण आता कुणाचंही खाण्यात मन लागत नव्हतं.गप्पा तर बंदच होत्या जणू सगळ्यांच्या तोंडाला कुलुपं लागली होती.” सर अजून काही मागवू.चहाकाँफी,आईसक्रीम, एनी डेझर्ट?”त्यांचं जेवण संपत आलेलं पाहून मिलींदने विचारलं“मिल्या अरे दोन घास आमच्याबरोबर खा रे.तेवढंच आम्हांला बरं वाटेल.घासातला घास खाणारे आपण मित्र.तू वाढतोहेस आणि आम्ही खातोय कसं वाटतं ते”बोलताबोलता पुजाचे डोळे भरुन आले.मिलींद खाली वाकला डिशमधल्या पापडाचे त्याने दोन तुकडे खाल्ले.मग वेटरला हाक मारुन हाँट वाँटर बाँऊल्स आणायला सांगितले.“फ्रेडस् कसं वाटलं जेवण?परत येणार ना आमच्या हाँटेलमध्ये?”त्याने विचारलं“तू इथे असेपर्यंत कधीच नाही”असं म्हणण्याचं सगळ्यांच्या ओठावर आलं होतं पण कुणाच्याच तोंडातून निघालं नाही.सगळे बाहेर येऊन आपापल्या गाड्यांजवळ आले” यार हा मिलिंद आपल्यातला सगळ्यात श्रीमंत मुलगा.पाँश वस्तीत आलिशान बंगला,चकाचक फोर व्हिलर.भावाचं आँटोमोबाईलचं दुकान. काय नाहिये त्यांच्याकडे ?आणि ही काय दुर्बूध्दी सुचावी त्याला.नक्कीच त्याच्या घरी भांडणं झाली असणार.त्याचा भाऊ किंवा वहिनी काहीतरी बोलली असणार.नाहीतर एक आय.टी.इंजीनियर कशाला हाँटेलमध्ये वेटरचं काम करील?”समीर म्हणाला“तसं काहीच नाहिये” नयना म्हणाली “त्याचे भाऊ,वहिनी खुप चांगले आहेत.मी चांगली ओळखते त्यांना.शिवाय वडिल अजून नोकरी करतात आणि तो बंगलाही त्यांनीच बांधलाय.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बी.ई.होऊन आताशी आपल्याला सहा महिने झालेत.आपले आईवडील अजून आपल्याकडून नोकरीची अपेक्षा करत नाहीत. मिल्याचे आईवडीलही करत नसतील.हाच वेडा आहे.”” हो खरंय.मलाही तेच वाटतं.आपण काँलेजमध्ये असतांनाही ह्याच्या डोक्यात समाजसेवेचं खुळ शिरलं होतं.ब्लड डोनेशन कँप अँरेंज कर,कधी पुरग्रस्तांसाठी कपडे पाठव,कधी बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिराला मुलांना घेऊन जा.असे रिकामटेकडे उद्योग हा करायचा.नुसता वेडा पोरगा आहे”आकाश म्हणाला तशा सगळ्यांनी संमतीने माना डोलावल्या.रात्र झाल्यामुळे हळूहळू सगळे पांगले. घरी पोहचल्यावर ग्रुपमधल्या कुणीही मिलिंद बद्दल चकार शब्दही काढला नाही. कदाचित आईवडील आपल्यालाही असाच जाँब करायला लावतील अशी भिती सगळ्यांना वाटत होती.मात्र एक झालं की त्या दिवसानंतर सगळेजण कसून नोकरी शोधायला लागले.अनेक ठिकाणी अर्ज करण्यात आले.पण दोन…
Author: Deepak Tamboli
अल्लड
हर्षा बाहेरुन आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या. ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली.“काय गं मुलींनो काय खेळताय?”“बदाम सात”एकजण उत्तरली.“मी खेळू तुमच्यासोबत?”एक मोठी बाई लहान मुलींसोबत खेळणार या विचाराने त्या मुली एकमेकींकडे पाहून खुदखुदू हसल्या. पण नाही कसं म्हणायचं या विचाराने त्यातलीच एक म्हणाली“हो. खेळा ना”बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळायला मिळताहेत याचा हर्षाला खुप आनंद झाला. ती मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली.आपल्या पाच वर्षाच्या मुलीला, केतकीलाही तिने जवळ बसवलं. छोट्या मिहिरला मांडीवर घेतलं. “द्या मी पत्ते पिसते” मुलींकडचे पत्ते घेऊन तिने ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात एक तास कसा निघून गेला तिला कळलंच नाही. मध्येच एका मुलीने पत्ते टाकतांना बदमाशी केलेली हर्षाच्या लक्षात आली तेव्हा ती रागावून म्हणाली.“ए असं नाही चालायचं हं. असा रडीचा डाव नाही खेळायचा”तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली.“अगंबाई, हर्षू तू इथे बसलीयेस? मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस. आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीयेस?”आईच्या हाकेने ती भानावर आली.” हो आई. येतेच. बस फक्त एक डाव” “अगं तू भाजी करणार होतीस ना? की मी करु? बारा वाजून गेलेत. मुलांना भुका लागल्या असतील”” हो आई मला भुक लागलीये”केतकी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेने ती पत्ते खाली ठेवून उठली” मुलींनो संध्याकाळी आपण परत खेळू बरं का”मुलींनी माना डोलावल्या.हर्षा मुलांना घेऊन घरात गेली.” हर्षू लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का? अगं दोन मुलांची आई ना तू?”निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना. मग किचनमध्ये वळतावळता म्हणाली“अगं बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले. आणि काय बिघडलं गं लहान मुलींसोबत खेळले तर?” निर्मलाबाई आपल्या त्या तीस वर्षाच्या निरागस चेहऱ्याच्या मुलीकडे पाहून हसल्या. “खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाहिये अजून “त्यांच्या मनात आलं.“काही बिघडत नाही. पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील?”” म्हणू दे काय म्हणायचं ते”हर्षा थोडी चिडूनच म्हणाली. मग तिने भाजी करायला घेतली. पंधरावीस मिनिटात भाजी करुन तिने सर्वांना वाढून घेतलं.” व्वा छान केलीयेस गं भाजी” भाजीची चव घेतल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या. हर्षाने स्मित केलं पण मघाशी आई जे बोलली त्याने तिचं मन नाराज झालं होतं. तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या. “अगं हर्षू हा बालिशपणा सोड आता. तू आता दोन मुलांची आई झालीयेस” दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरुनचे त्यांचे टोमणे बंद झाले. आणि आज आईने त्यावरुन तिचे कान उपटले होते. “आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला? त्यांना काय करायचं खायला?” अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं“शिरा आणि भजी करेन मी. तू बस त्यांच्या सोबत गप्पा मारत”ती रागावलीये हे निर्मलाबाईंनी ओळखलं. पण तिचं रागावणंसुध्दा तिच्या निरागस चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या.जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भराभरा आवरुन हर्षा बेडरुममध्ये गेली. तिची मुलं हाँलमध्ये कार्टून सिरीयल बघत बसली.बेडवर पडल्यापडल्या हर्षाच्या मनात विचार आला. ‘खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं, मस्त्या करायला आवडतं. खेळायला आवडतं. फुलं, फुलपाखरं, रंगबिरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो. जगात सर्वत्र आनंदच भरलाय असं आपल्याला वाटत रहातं. आपण सहसा कुणावर रागवत नाही. रागावलो तरी पटकन विसरतो. म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो?’तिला आपले काँलेजचे दिवस आठवले. फुलपाखरासारखी ती बागडायची. सगळ्यांशी ती हसून बोलायची. सगळ्यांशी तिची मैत्री होती.मुलांशी तर जास्तच. तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत “हर्षू मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत नको जाऊ. ते तुझ्या हसण्याचा वेगळा अर्थ काढतात”पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस, बालिश चेहरा आणि त्यावरच खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे. तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे. पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची. त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस रहात नसे. बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे. काँलेजच्या गँदरींगमध्येही तिला “बेबी”नावाने बरेच फिशपाँंड पडायचे. पण तिला त्याचा कधी राग आला नाही. “आई गं मी भातुकली खेळू?”केतकीच्या प्रश्नाने ती भानावर आली“का गं टिव्ही बघून कंटाळा आला वाटतं?”” हो. खेळू का?”“खेळ.पण तुझ्याकडे सगळं सामान कुठंय?”” ती शेजारची उत्तरा आलीये सामान घेऊन”“मग ठिक आहे. जा खेळा”“आई तू येतेस मांडून द्यायला?”ते ऐकून हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला. प्रफुल्लित चेहऱ्याने ती म्हणाली.” हो. चल चल. आपण हाँलमध्येच बसू”मग हाँलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली. तीन वर्षाचा मिहिरही तिथे लुडबुड करायला लागला. हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला. चार वाजले आणि हाँलचा दरवाजा उघडला. तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या. हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही.“अगंबाई, हर्षू अजून तू भातुकली खेळतेस?”एक मैत्रीण म्हणाली तशा सगळ्याच जोरात हसल्या.“नाही गं, या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते”हर्षाने सारवासारव केली खरी पण मैत्रीणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं“अगं आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसलीयेस?”एका मैत्रिणीने परत आगाऊपणा केलाच.ते ऐकून केतकीला काय वाटलं कुणास ठाऊक ती उत्तराला म्हणाली“उत्तरा आपण उद्या खेळू हं”उत्तरालाही ते पटलं. तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली. हर्षा आत जाऊन मेत्रिणींसाठी पाणी घेऊन आली. “ए काही म्हणा आपली हर्षू अजून काहीsss बदलली नाही. अजूनही तशीच बालीश वाटतेय बघा” एक मैत्रिण म्हणाली” हो खरंच. अगदी अकरावी बारावीतली अवखळ मुलगी वाटतेय”“तिची फिगर तर बघ. अगदी चवळीची शेंग वाटतेय. नाहीतर आपण पहा. सगळ्याजणी भोपळे झालोत”सगळ्याजणी फिदीफिदी हसल्या.“हो पण वयानुसार थोडं मँच्युअर्ड दिसायलाच पाहिजे ना! नाहीतर ही हर्षू.वाटते का दोन मुलांची आई आहे म्हणून? आठवतं?आपल्या काँलेजची मुलं तिला बेबी म्हणायची. ती बेबी अजून बेबीच दिसतेय”परत एकदा सर्वजणी हसल्याहर्षाला खुप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करताहेत की टोमणे मारताहेत हे तिच्या लक्षात आलं नाही.गप्पा सुरु झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पुर्णपणे संसारी झाल्याहेत. सासू, सासरे, नणंदा, नवरा आणि मुलं याव्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकत नव्हते. दोन वर्षांपूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या. मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिने स्वतः नोकरी सोडली आणि तीही पुर्णवेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयावर गुंतत रहायचं. तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती. तिला संगीत आवडायचं. विशेषतः सध्याच्या तरुण पीढिचं संगीत तिला खुपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे, टिव्हीवरच्या कार्टून सिरीयल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीने पहायची. तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं.” काय म्हणतात आमचे जिजू?” एकीने विचारलं“मजेत आहेत ” हर्षा उत्तरली ” सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी. म्हणून तर मी इकडे आले. दादा, वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेलाय. आई घरी एकटीच होती. म्हणून म्हंटलं आईलाही कंपनी आणि मुलंही बरेच दिवसात आजीला भेटली नव्हती. म्हणून मग आले इकडे” ” तुझ्या नवऱ्याला तुझा हा बालीशपणा आवडतो का गं?” दुसरीने टोचलं. हर्षाला…
जाणीव
विनायक घरी आला तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. माधवी त्याची वाटच बघत होती.“आज बराच उशीर केलात यायला “माधवीने विचारलं“हो. सध्या मंथ एंड आहे ना!त्यामुळे मिटिंगवर मिटिंगसुरु आहेत ““बरं तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी जेवायला वाढते “तो फ्रेश होऊन येईपर्यंत माधवीने टेबलवर जेवणाची तयारी घेतली. विनायक खुर्चीवर येऊन बसला. समोर दोनच ताटं पाहून त्याने आश्चर्याने विचारलं“दोनच ताटं? नयना जेवणार नाहीये का?”“अहो ती बाहेर गेलीये. तिची ती साक्षी नावाची मैत्रीण बंगलोरहून आलीये आज. तिला भेटायला गेलीये.दोघी बाहेरच पावभाजी वगैरे खाऊन येणार आहेत ““साक्षी बंगलोरला असते?जाँब लागलाय की लग्न झाल्यामुळे?”“लग्न नाही. मागच्या दिड वर्षापासून ती जाँबला तिथंच आहे ““किती पँकेज आहे?”“सध्या सहा लाखाचं आहे. पुढच्या वर्षीपासून नऊ लाख होणार आहे म्हणे “विनायकने एक सुस्कारा सोडला“एकेक करुन नयनाच्या सगळ्या मैत्रीणी जाँबला लागल्या तर?”माधवीने मान डोलावली“आणि आपली बया बसलीये पाच वर्षांपासून घरी. किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. कंप्युटर इंजीनियर झाल्याझाल्या तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, चारचौघात अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करतेय. तिला एवढं पँकेज आहे. पण नाही, एकही अपेक्षा पोरीने पुर्ण केली नाही “विनायक उद्विग्न होऊन म्हणाला“जाऊ द्या. अशीही आपल्याला काही तिच्या पैशांची गरज नाहीये”“पैशाचा इश्यूच नाहीये माधवी. इतकं चांगलं शिक्षण घेऊनही तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीये तर त्या शिक्षणाचा फायदाच काय? मग साधं बी.ए., बी.कॉम केलं असतं तरी चाललं असतं. कशाला तिच्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला असता? “विनायक चिडून म्हणाला“जाऊ द्या तुम्ही चिडू नका. शांततेने जेवून घ्या. आणि तिलाही काही बोलू नका. उगीच तुमचा बीपी वाढून जाईल”“वाईट वाटतं गं! लोक विचारतात तेव्हा सांगायलाही लाज वाटते की माझी मुलगी घरीच बसलीये ““मी परवाच तिला नोकरीबद्दल बोलले तर ती माझ्यावरच खवळली.’ तुम्हांला मी जड झाले असेन तर करुन टाका माझं लग्न ‘असं म्हणायला लागली”” दुसरा पर्यायच काय ठेवलाय तिने आपल्यासमोर?खरंच यावर्षी करुनच टाकतो तिचं लग्न” विनायक उद्वेगाने म्हणाला” नाहीतर काय!घरात बसूनही काय करते ती?सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. सदोदित तो मोबाईल घेऊन बसलेली असते.काय करते कुणास ठाऊक!बरं तिला म्हणावं की काही छंद तरी जोपास पण तेही करायला तयार होत नाही.आपण काही बोललो तर रुसून बसते.चारचार दिवस बोलत नाही”“उद्यापासूनच तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करुया.आताच ती सव्वीस वर्षाची आहे.जास्त उशीर केला तर नंतर लग्न जमणंही कठीण होऊन बसेल.खरंतर आपण अगोदरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं होतं.उगीच तिला नोकरी लागण्याचीवाट बघत बसलो ““तिच तर म्हणत होती की ‘नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून ‘आजकालची मुलं म्हणे नोकरी करणारी मुलगीच पसंत करतात’असं तिचंच म्हणणं होतं ““आता तिचं काहिही ऐकायचं नाही. चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं “विनायक ठामपणे म्हणाला दुसऱ्या दिवसापासून त्याने वेगवेगळ्या शहरातल्या विवाह संस्था, मंडळात नयनाचं नाव नोंदवायला सुरुवात केली.आपल्या नातेवाईक, मित्रांना फोन केले.’मुलीचं यंदा कर्तव्य आहे तेव्हा तुमच्या माहितीतलं चांगलं स्थळ सुचवा “अशी त्यांना विनंती केली.काही दिवसांनी एक चांगलं स्थळ चालून आलं.मुलगा हैदराबादला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता.नऊलाखाचं पँकेज होतं.फोटोवरुन तरी चांगला दिसत होता.विनायकने त्याची माहिती आणि फोटो नयना आणि माधवीच्या मोबाईलवर पाठवले.पण दोघींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोन दिवसांनी त्यानेच माधवीला विचारलं.“मी ते स्थळ पाठवलं होतं ते तुम्ही दोघींनी बघितलं नाही का?”” बघितलं.नयना नाही म्हणतेय “” का?सगळं तर चांगलं आहे “” तिचं नेहमीचंच कारण.नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणे”” बोलव तिला “विनायक संतापून म्हणालामाधवीने नयनाला तीनचार हाका मारल्या पण तिने प्रतिसाद दिला नाही. शेवटी माधवी उठून तिच्या खोलीकडे गेली आणि तीला घेऊन आली.“काय बाबा?”“काय करत होतीस?तुझ्या आईने इतक्या हाका मारल्या.ऐकू नाही आल्या?”विनायकने रागाने विचारलं“काही नाही. गाणी ऐकत होते.कानात ईअर फोन होते म्हणून ऐकू आलं नाही “” बरं.मी ते स्थळ पाठवलं होतं,त्याला तू नाही म्हणतेय म्हणे “” हो.मी मागेही तुम्हांला सांगितलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्नच करायचं नाही म्हणून ““मला एक सांग.तू इथे नोकरी करुन काय उपयोग ?मुलगा जर दुसऱ्या शहरात असेल तर तुला इथली नोकरी सोडावीच लागणार ना?”” हो बरोबर.पण आजकालच्या मुलांनाच नोकरी करणारी मुलगी हवी असते.नोकरी करणाऱ्या मुली स्मार्ट,हुशार आणि जगासोबत चालणाऱ्या असतात असं त्यांना वाटतं.अशा मुलींना जास्त पँकेजेसची मुलं मिळतात ““पण या मुलाची तर मुलगी नोकरी करणारीच हवी अशी काही अट नाहिये “” मग त्याला पँकेजही कमीच आहे ““नऊ लाखाचं पँकेज कमी आहे?”विनायकने आश्चर्याने विचारलं “तुला माहित नसेल की मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मला फक्त तेराशे रुपये पगार होता.हातात फक्त नऊशे-साडेनऊशे रुपये पडायचे.आमचं लग्न झालं तेव्हाही मला फक्त साडेतीन हजार पगार होता.तुझी आई श्रीमंत घरातली होती तरीसुद्धा तिच्या वडिलांनी फक्त माझी सरकारी नोकरी आणि आमचं घराणं पाहून आमचं लग्न लावून दिलं.आणि नंतरही आम्हांला कधी पैशांची चणचण भासली नाही.आज तीस वर्षाच्या नोकरीनंतरही माझं पँकेज सोळाच लाख आहे.त्यामानाने या मुलाचं पँकेज एकदम छान आहे.आणि ते पुढेही वाढू शकतं”” तुमचा काळ वेगळा होता बाबा.आता महिन्याला एक लाखही पुरत नाहीत ““तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला तर महिन्याला पाच लाखही पुरणार नाहीत.व्यवस्थित मँनेज केलं तर तीसचाळीस हजारातही महिना पार पडतो.तुझ्या दिलीपकाकाचंच उदाहरण घे.फक्त चाळीस हजारात व्यवस्थित घर चालंलय.मुलं महागड्या काँलेजमध्ये शिकताहेत.खाऊनपिऊन सुखी आहेत.कधी पैसा पुरत नसल्याची तक्रार नसते.बरं जाऊ दे तुला जर नोकरीच करायची होती तर तू आतापर्यत काय केलंस?पाच वर्षं झालीत तुला इंजीनियर होऊन.तुझ्या सगळ्या मैत्रिणी नोकरीला लागल्यात म्हणे.मग तुलाच का नोकरी लागत नाहिये?”नयनाचा चेहरा पडला.हळू आवाजात ती म्हणाली” करतेय मी प्रयत्न पण कुठे जागाच निघत नाहीयेत.आणि बाबा मी दोनदा केलीये नोकरी.अगदीच काही घरात बसून नव्हते.”“बरोबर.पण ती किती महिने केलीस?त्या सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये तीन महिने आणि सायबर सोल्यूशन्समध्ये दोन महिने.तीही व्यवस्थित नाही. महिन्याला पाचसहा दांड्या असायच्याच तुझ्या.खरं ना?”” मग काय करणार?तिथं एक तर पगार कमी आणि हँरँसमेंटच इतकी होती की एकेक दिवस काढणं मला मुश्कील झालं होतं “” बेटा नोकरी म्हंटलं की तिथं थोडीफार हँरँसमेंट असणारच.माझंच बघ.सरकारी नोकरी असूनही माझी आँफिसमधून यायची वेळ नक्की नसते.बारा बारा तेरातेरा तास ड्युटी होऊन जाते.कधीकधी रविवारी, सुटीच्या दिवशीही आँफिसला जावं लागतं.सततच्या मिटिंग्स्,काँन्फरन्सने जीव वैतागून जातो.वरुन सिनीयर्सच्या शिव्या खाव्या लागतात.सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असंच असतं कारण सगळ्यांवरच प्रेशर असतं.मलाही बऱ्याच वेळा वाटतं की सोडून द्यावी नोकरी. मस्त आराम करावा पण मी तसं करु शकत नाही” विनायक तिला समजावत म्हणाला” तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा.तुम्ही कुटुंब प्रमुख आहात.तुम्हांला नोकरी सोडून कसं चालेल?आणि माझं चालू आहे नोकरी बघणं.नोकरी लागली की बघा मला मोठमोठ्या पँकेजेसच्या मुलांची स्थळ चालून येतील”” फक्त पँकेजच महत्वाचं असतं का बेटा?मुलाचं घराणं,त्यातली माणसं,मुलावरचे संस्कार हे तुला महत्वाचे वाटत नाही का?आणि फार श्रीमंत घर कधीच नको.तिथे बऱ्याचदा बायकांना बरोबरीने वागवलं जात नाही.त्यांच्या कर्तृत्वाला शुन्य किंमत असतेच पण त्यांच्या मतालाही किंमत दिली जात नाही “” असेलही तसं.पण आजकालच्या मुलींना हँडसम आणि श्रीमंत मुलगाच नवरा म्हणून हवा असतो “” चुकीचं आहे ते.बरं जाऊ दे.मला तुझ्याशी वाद घालायचा नाहिये.महिनाभर आम्ही थांबतो.तोपर्यंत तुझ्या नोकरीचं जमलं तर ठिक नाहीतर चांगलं स्थळ…
नाते
“हेsssमी जिंकले ,मी जिंकले” दोन्ही हात हवेत उडवत सुमी थोडा वेळ नाचत बसली.बुध्दीबळाचा पहिला डाव जिंकल्यावर मी जाणून बुजून दोन डाव हरलो होतो हे तिच्या लक्षात आलं नव्हतं.मी डब्यात सोंगट्या भरता भरता तिला विचारलं.“मग जिंकल्याबद्दल तुला काय हवं?चाँकलेट की आईस्क्रीम?”“आईस्क्रीम!”तिच्या त्या निरागस चेहऱ्यावर मोठं हसू फुललं.“चल मग जाऊ या”मी गाडी काढली.सुमी माझ्या मागे बसली.तिच्या त्या दोन कोवळ्या हातांनी माझ्या कमरेला मिठी मारली.आमचं आईस्क्रीम खाऊन झाल्यावर मी पैसे द्यायला निघालो तशी सुमी म्हणाली“सुहासकाका उषा दिदी आणि मनिषा दिदीला पण घ्यायचं का आईस्क्रीम?”मला त्या छोट्या जिवाचं कौतुक वाटलं.किती प्रेम होतं तिला मोठ्या बहिणींबद्दल!मी हसलो.तिच्या बहिणींसाठीच नाही तर आईवडिलांसाठीसुध्दा मी आईस्क्रीम घेतलं.झोपडपट्टी आली तसं तिच्या घराजवळ मी तिला उतरवलं.चेहऱ्यावर एक मोठं हसू आणून तिने हात हलवून मला बाय केलं. तिचं खरं नांव होतं सुमित्रा पण सगळे तिला सुमीच म्हणायचे.गोरीपान,चमकदार बोलके डोळे,उजव्या गालावर खळी आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी सुमी तिच्या आईबरोबर एकदा धुणीभांडी करायला माझ्या घरी आली होती.गोड आवाजातील तिची बडबड ऐकून मी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ती दिसली.पाहताक्षणीच ती मला आवडली.मी तिला घरात बोलवलं.तिला चाँकलेट दिलं.ती खुष झाली.तेव्हा पासून ती माझ्या घरी यायची.मी तिला बुध्दीबळ शिकवलं.कँरम शिकवला.तिच्या वयाच्या मानाने दोन्ही खेळ ती खुप छान खेळायची.खरं तर दोन मुलींवर मुलगा हवा असतांना मुलगीच झाली म्हणून तिच्या आईने तिला पंधरा दिवस दुध पाजलं नव्हतं.बापाने तर तिला वर्षभर तिला जवळ घेतलं नव्हतं.बरं तरी पैसे नसल्यामुळे त्यांनी सोनोग्राफी केली नव्हती नाहीतर गर्भातच तिचा जीव घेतला गेला असता.थोडक्यात ती नकोशी होती.पण जसजशी ती मोठी होत गेली आणि अगोदरच्या दोन मुलींपेक्षा गोड आणि सुंदर दिसायला लागली,गोड बोलायला लागली तसं आईवडील तिच्याकडे लक्ष द्यायला लागले.सुमी तिच्या आईवर गेली होती.तिची आईही गोरी आणि सुंदर होती.घरच्या गरीबीमुळे तिला सुमीच्या बापाशी लग्न करावं लागलं होतं.सुमीचा बाप बांधकाम मजूर होता.आमच्या बंगल्याला लागूनच असलेल्या सरकारी जागेवरच्या झोपडपट्टीत ते रहायचे. सुरवातीला सुमी माझ्या घरी यायची तेव्हा झोपडपट्टीतल्या अशुध्द आणि उग्र भाषेत बोलायची.मी तिच्या भाषेत आणि बोलण्यात बदल घडवले.ती आता नगरपालिकेच्या शाळेत तिसऱ्या इयत्तेत होती आणि मी इंजीनियरींगच्या शेवटच्या वर्षाला.आमच्या दोघांमध्ये बारा वर्षांचं अंतर होतं पण आमचं ट्युनिंग जबरदस्त होतं.शाळेतून आली की एकदा तरी ती माझ्या घरी यायची.कधीतरी मागून येऊन माझ्या गळ्याला मिठी मारायची.आम्ही दोघं मग गप्पा मारायचो,कधी काहीतरी खेळायचो.कधीकधी तिचा बाप दारु पिऊन तिच्या आईला आणि बहिणींना मारहाण करायचा.अशावेळी सुमी घाबरुन माझ्या घरी यायची.मी तिला जवळ घेऊन शांत करायचो.माझ्या घरातील पुस्तकं तिला फार आवडायची.त्यातली चित्रं पाहून अनेक प्रश्नं विचारुन मला ती भंडावून सोडायची. सुमी चवथी पास झाली आणि मी इंजीनियरींग पुर्ण केलं.शहरात गरीब मुलांसाठी एक नवीनच इंग्लिश मिडीयमची शाळा सुरु झाली.माझ्या मित्राचे वडिल तिथे ट्रस्टी होते.त्यांना भेटून मी सुमीची अँडमिशन तिथे केली.सगळा खर्च शाळाच करणार असल्याने तिच्या आईवडिलांनीही हरकत घेतली नाही.झोपडपट्टीतली,गरीब कुटूंबातली सुमी कडक युनिफाँर्म,टाय,बुट घालून बसने शाळेत जावू लागली.एकदा रविवारी सकाळी मी पुजा करत असतांना ती आली.माझी आरती झाल्यावर मी तिला प्रसादाची साखर देत असतांना ती मला म्हणाली “सुहासकाका किती छान वाटतं ना पुजा झाली की!पण आमच्या घरी कुणी पुजाच करत नाही.नुसते भांडत असतात.मला तू महालक्ष्मीचा फोटो आणून देशील?मी रोज तिची पुजा करेन”मला हसू आलं.मी म्हणालो.“अगं पण लक्ष्मीच का?बाकीचे देव का नको?”“अरे लक्ष्मीची पुजा केली की ती आम्हांला खुप पैसे देईल.मग आमच्या घरातली भांडणं बंद होतील” मग देवांकडे नजर टाकून म्हणाली.“सुहासकाका आज तू फुलं नाही वाहीलीस?”“अगं आज झाडावर फार कमी फुलं होती”“राहू दे उद्यापासून मी तुला खुप फुलं आणून देत जाईन”तिने तिचा शब्द पाळला.रोज सकाळी लवकर उठून ती मला खुप फुलं आणून द्यायची.मीही तिला महालक्ष्मीचा फोटो आणून दिला.ती रोज पुजा करु लागली. मला एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली.संध्याकाळी यायला उशीर व्हायचा.त्यामुळे सुमीची भेट रवीवारीच व्हायची.एकदा आईबाबा सात दिवसासाठी बंगलोरला माझ्या बहिणीकडे गेले.सुमीला ते कळलं.ती माझ्याकडे आली.“सुहासकाका तू जेवणाची काही काळजी करु नको.मी देत जाईन तुला डबा करुन”सुमी आताशी आठवीत होती.म्हणजे साधारण १३-१४ वर्षांची असेल.तिचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं.“तुला स्वयंपाक येतो?”“हो मग!आजींनीच(माझ्या आईने)शिकवलाय.काही माझ्या उषा दिदीने शिकवला”“नको राहू दे.सकाळी कंपनीत जेवण मिळतं.संध्याकाळी हाँटेलमध्ये….”“अजिबात नाही.मी येत जाईन करायला”तिच्या हट्टापुढे मला बोलता आलं नाही.ती संध्याकाळी यायची.स्वयंपाक करुन मला जेवायला वाढायची.अगदी आईच्या हाताची चव होती तिच्या स्वयंपाकाला.जेवून मी अगदी त्रुप्त व्हायचो.मी तिलाही जेवायचा आग्रह करायचो.पण आई रागवेल असं म्हणून ती नकार द्यायची.माझं जेवण झालं की ती सगळी भांडी घासून धूवून ठेवायची.आई परत आल्यावर मी आईला हे सगळं सांगितलं. ती खुष झाली.पण म्हणाली.“आपण तीला याचे पैसे देऊन टाकूया.तिच्या आईला बरं वाटेल.हे लोक पैशाचे भुकेले असतात रे”ती आल्यावर आईने तिच्या हातात पाचशेची नोट ठेवली.तिचा चेहरा पडला.ती नोट तिने तशीच आईला परत केली आणि माझ्याकडे पहात म्हणाली.”सुहासकाका पैशासाठी केलं का मी ते?”“अगं मोबदला म्हणून नाही.बक्षीस म्हणून देतेय.सुहासची तू गैरसोय होऊ दिली नाही त्याबद्दल”तिच्या डोळ्यात पाणी आलं.काही न बोलता ती निघून गेली.तिला आपण ओळखू शकलो नाही याचं मलाही वाईट वाटलं.अशातच माझं लग्न ठरलं.आँफिसमधून येतांना सुमी शाळेच्या बसमधून खाली उतरतांना दिसली.मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो.“सुमी घरी ये.एक आनंदाची बातमी आहे.”मला वाटलं मागच्या त्या प्रसंगामुळे ती रागात असेल पण नेहमीसारखी गोड हसून तिने मान हलवली.“अगं माझं लग्न ठरलं” ती घरी आल्यावर मी तिला सांगितलं.“अरे वा!फोटो दाखव ना मला काकूचा”मी फोटो दाखवला.“अरे वा!छान आहे रे दिसायला” मग थोडंसं उदास होत म्हणाली.“सुहासकाका लग्नानंतर आम्हाला विसरणार नाही ना तू?आई म्हणते लग्न झाल्यावर सगळी मुलं आईवडिलांना विसरतात.मी तर काय झोपडपट्टीतली मुलगी!”“नाही गं.असा कसा विसरेन मी तुला?तू तर माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना?”ती खुशीत हसली.लग्नाच्या सात दिवस अगोदरपासून आईने नातेवाईक येऊ लागले तसं सुमीला कामाला बोलावून घेतलं.मी आईला सांगून सुमीसाठी एक चांगला महागडा पंजाबी ड्रेस आणि तिच्या आईसाठी साडी घ्यायला लावली.लग्नात सुमी उत्साहाने सगळी कामं करत होती.माझ्या मिरवणूकीतही ती नाचली.लग्नानंतर मी हनिमूनला जाऊन आल्यावर एक दिवस संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र बसलो असतांना सुमीची मोठी बहिण मनीषा घरी आली.माझ्याकडे पाहून म्हणाली.“काका सुमीने सात दिवसाच्या कामाचे पैसे मागितलेत”“काय्यsss सुमीने पैसे मागितलेत?”मलाच काय आईलाही जबरदस्त धक्का बसला.क्षणभर काय बोलावं ते सुचेना.शेवटी आईनेच तिला विचारलं.“किती पैसे मागितलेत तिने?”“सातशे रुपये”मी मुकाट्याने सातशे रुपये काढून तिला दिले.ती गेल्यावर आई मला म्हणाली.“बघ किती जीव लावतो तू त्या पोरीला!अगदी आपल्या घरातली समजतोस तिला.काय नाही केलं तू त्या पोरीसाठी?लहानपणापासून लाड करतोय तिचे.आताही लग्नात तिला दोन हजाराचा ड्रेस घेऊन दिला.तिच्या आईलाही साडी घ्यायला लावली.बघ काय परतफेड केली तिने!ती समजते का तुला आपलं?नाही ना?शेवटी तीही झोपडपट्टीच्याच विचारांची निघाली ना?”मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो.माझी बायको आदिती तिथंच बसली होती.ती म्हणाली.“या लोकांशी तेवढ्यास तेवढंच वागावं लागतं.त्यांच्यावर कितीही उपकार करा.आपले पैसे ते कधीही सोडत नाहीत.फार स्वार्थी असतात”सुमीच्या वागण्याचा आता मलाही राग येऊ लागला होता.मी ठरवलं आता सुमीशी संबंध तोडून टाकायचा.एकदोनदा ती रस्त्यात दिसली पण मी ओळख दाखवली नाही.दोन दिवसांनी संध्याकाळी आम्ही सगळे गप्पा मारत बसलो असतांना सुमी आली.तिचा चेहरा उतरलेला होता.तिला पहाताच माझा राग उचंबळून आला पण मी…
पीळ
डाँक्टरांनी श्यामलाबाईंच्या छातीवर स्टेथास्कोप ठेवून थोडा वेळ तपासणी केली. मग वैभवकडे पहात ते म्हणाले” साँरी शी इज नो मोअर “ते ऐकताच वैभवने “आईsss” असा जोरात हंबरडा फोडत आईच्या पार्थिवाला मिठी मारली आणि तो हमसून हमसून रडू लागला.जरा सावरल्यावर त्याने बाजूला पाहिलं. त्याचे वडील-जयंतराव खुर्चीवर बसून रडत होते. गेली पाचसहा वर्ष श्यामलाबाईंच्या आजारपणामुळे जे हाल बापलेकांचे झाले होते त्यांचं स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं दिसत होतं. पाचसहा वर्षं प्रचंड प्रयत्न करुन आणि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही हाती शुन्य लागलं होतं. एकुलत्या एक मुलाचं लग्न बघायची श्यामलाबाईंची खुप इच्छा होती पण तीही अपूर्ण राहिली होती. त्याच्या खांद्यावर हात पडला तसं वैभवने वळून पाहिलं. शेजारपाजारचे बरेच जण जमा झाले होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या पाटील काकांनी त्याला नजरेने इशारा केला तसा तो उठून त्यांच्यासोबत बाहेर आला.” वैभव कुणाला फोन करुन कळवायचं असेल तर मला नंबर दे मी फोन करतो “” मामा, मावशीला सोडून सगळ्यांना कळवून टाक वैभव ” अचानक जयंतराव मागून येत म्हणाले” असं कसं म्हणता बाबा? त्यांची सख्खी बहिण होती आई “ ” असू दे.मला नकोत ती दोघं इथं “” कमाल करता जयंतदादा तुम्ही! अहो तुमची काहिही भांडणं असोत. सख्ख्या भाऊबहिणीला कळवणं आवश्यकच आहे “पाटील काका आश्चर्य वाटून म्हणाले” बरोबर म्हणताय पाटील काका तुम्ही. अहो भाऊबहिण आले नाही तर बाईंच्या पिंडाला कावळा तरी शिवेल का? काही काय सांगताय जयंतदादा?” घोळक्यात बसलेली एक म्हातारी रागावून म्हणाली तसे जयंतराव चुप बसले. वैभवने त्यांच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत मोबाईल काढला आणि पहिला फोन संजूमामाला लावला.” मामा अरे आई गेली “रडतरडत वैभव बोलला“काय्य्यsss?कधी आणि कशी?” मामा ओरडला आणि रडू लागला.” आताच गेली. आणि तुला तर माहितीच आहे की ती पाचसहा वर्षापासून आजारीच होती. तिला काय झालंय हे डाँक्टरांना शेवटपर्यंत कळलं नाही. मागच्या आठवड्यात तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या म्हणून आयसीयूत अँडमीट केलं होतं. काल डाँक्टरांनी ट्रिटमेंटचा काही उपयोग होत नाहिये हे पाहून तीला घरी घेऊन जायला सांगितलं होतं. म्हणून काल घरी घेऊन आलो होतो. कालपासून ती मला मामाला बोलव असं म्हणत होती “ “अरे मग कळवलं का नाही मला? मी ताबडतोब आलो असतो “वैभव बाहेर अंगणात आला. आसपास जयंतराव नाहीत हे पाहून हळूच म्हणाला” बाबांनी मला तुला कळवायला मनाई केली होती”एक क्षण शांतता पसरली मग मामा जोरात ओरडून म्हणाला“हलकट आहे तुझा बाप. मरतांना सुद्धा त्याने माझ्या बहिणीची इच्छा पुर्ण केली नाही “आता मामा जोरजोरात रडू लागला.ते ऐकून वैभवही रडू लागला. थोड्या वेळाने भावना ओसरल्यावर मामा म्हणाला“मी निघतो लगेच. विद्या मावशीला तू कळवलंय का?”“नाही. बाबांनी मना केलं होतं “” खरंच एक नंबरचा नीच माणूस आहे. पण आता त्याच्यावर बोलण्याची ही वेळ नाही. मी कळवतो विद्याला आणि मी लगेच निघतो. तरी मला तीन तास तरी लागतील पोहचायला.तोपर्यंत थांबवून ठेव तुझ्या बापाला. नाहितर आमची शेवटची सुध्दा भेट होऊ नये म्हणून मुद्दाम घाई करायचा “ ” नाही मामा. मावशी आणि तू आल्याशिवाय मी बाबांना निघू देणार नाही. खुप झाली त्यांची नाटकं. आता मी त्यांचं ऐकून घेणार नाही “” गुड. बरं तुला पैशांची मदत हवीये का?”वैभवला गहिवरून आलं. बाबा मामाशी किती वाईट वागले पण मामाने आपला चांगूलपणा सोडला नव्हता.“नको. सध्यातरी आहेत. अडचण आलीच तर तसं तुला सांगतो “” बरं.ठेवतो फोन “ मामाने फोन ठेवला आणि वैभवला मागच्या गोष्टी आठवू लागल्या. संजूमामा आणि जयंतराव यांचं भांडण अगदी जयंतरावांच्या लग्नापासून होतं आणि त्यात चूक जयंतरावांच्या वडिलांचीच होती. लग्नाला “आमची फक्त पन्नास माणसं असतील” असं अगोदर सांगून जयंतरावांचे वडील दोनशे माणसं घेऊन गेले होते. बरं वाढलेल्या माणसांची आगावू कल्पनाही त्यांनी मुलीकडच्या लोकांना दिली नाही. अचानक दिडशे माणसं जास्त आल्यामुळे संजूमामा गांगरला. त्यावेळी कँटरर्सना जेवणाचे काँट्रॅक्ट देण्याची पध्दत नव्हती. अर्थातच ऐनवेळी किराणा आणून जेवण तयार करण्यात साहजिकच उशीर झाला. जेवण्याच्या पंगतीला उशीर झाला, वराकडच्या मंडळींना ताटकळत बसावं लागलं म्हणून जयंतरावांच्या वडिलांनी आरडाओरड केली. आतापर्यंत शांततेने सगळं निभावून नेणाऱ्या संजूमामाचा संयम सुटला आणि त्याने सगळ्या लोकांसमोर जयंतरावांच्या वडिलांची चांगलीच कान उघाडणी केली. नवरामुलगा म्हणून जयंतराव त्यावेळी काही बोलले नाहीत पण वडिलांचा अपमान केला म्हणून त्यांनी संजूमामाशी कायमचा अबोला धरला. मात्र संधी मिळाली की ते चारचौघात संजूमामाचा पाण उतारा करत. त्याला वाटेल ते बोलत.इतर नातेवाईंकांमध्येही त्याची बदनामी करत. पण आपल्या बहिणीचा संसार व्यवस्थित रहावा म्हणून संजू सगळं सहन करत होता. सात आठ वर्षांपूर्वी संजूचा जुना वडिलोपार्जित वाडा विकल्या गेला. त्यावेळी वैभवच्या आईने जयंतरावांना न सांगताच एक रुपयाही हिस्सा न घेता हक्कसोड पत्रावर सह्या केल्या होत्या. तिचंही साहजिकच होतं. ज्या माणसाने आयुष्यभर आपल्या भावाचा अपमान केला त्याला आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीतला एक रुपयाही द्यायची त्या माऊलीची इच्छा नव्हती. एक वर्षाच्या आतच जयंतरावांना ही गोष्ट कुठूनतरी कळली आणि त्यांनी एकच आकांडतांडव केलं. श्यामलाबाईंना आणि संजूला खुप शिव्या दिल्या. संजूशी आधीच संबंध खराब होते ते आता कायमचेच तोडून टाकले. तीन महिने ते श्यामला बाईंशी बोलले नाहीत. त्या दिवसांनंतर त्यांनी आपल्या सासरी पाऊलही टाकलं नाही. संजूने मात्र आपलं कर्तव्य सोडलं नाही. दर दिवाळीला तो आपल्या बहिण, मेव्हण्याला न चुकता निमंत्रण द्यायचा पण जयंतराव त्याच्याशी बोलायचे नाहीत शिवाय श्यामला बाईंनाही माहेरी पाठवायचे नाहीत. श्यामलाबाईंच्या शेवटच्या दिवसात त्यांची भावाला भेटायची इच्छाही त्यांनी पुर्ण होऊ दिली नव्हती. बरोबर तीन तासांनी संजू आला. आल्याआल्या आपल्या मेव्हण्याला भेटायला गेला. आपल्यापरीने त्याने जयंतरावांना सांत्वन करायचा प्रयत्न केला. पण जयंतराव त्याच्याशी एक शब्दानेही बोलले नाहीत. सुंभ जळाला पण पीळ मात्र तसाच होता. थोड्या वेळाने विद्या आली. तिने मात्र काळवेळ न बघता बहिणीच्या तब्येतीबद्दल काहीही न कळविल्याबद्दल जयंतरावांची चांगलीच खरडपट्टी काढली. तिच्याशीही जयंतराव एक शब्दानेही बोलले नाहीत. अंत्यविधी पार पडला. सगळे घरी परतले. जयंतराव वैभवला घेऊन मागच्या खोलीत आले.“वैभव कार्य पार पडलं. मामा मावशीला घरी जायला सांग “वैभव एक क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिला. मग संतापून म्हणाला.” कमाल करता बाबा तुम्ही! आईला जाऊन आताशी पाचसहा तासच झालेत आणि तिच्या सख्ख्या भावाबहिणीला मी घरी जायला सांगू?”” मला ते डोळ्यासमोर सुध्दा नको आहेत “आता मात्र वैभवची नस तडकली. वेळ कोणती आहे आणि हा माणूस आपलं जुनं वैर कुरवाळत बसला होता. तो जवळजवळ ओरडतच म्हणाला” मी नाही सांगणार. तुम्हांला सांगायचं असेल तर तुम्हीच सांगा. अशीही या दु:खाच्या प्रसंगी मला मामा मावशीची खुप गरज आहे” तो तिथून निघून बाहेर आला. बाहेरच्या खोलीत विद्या मावशी संजू मामाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. तिला तसं रडतांना पाहून वैभवला ही भडभडून आलं आणि तो मावशीला मिठी मारुन रडू लागला. मामा त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला” वैभव काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत ना!तुझ्या वडिलांमुळे आम्हांला मनात असुनही तुम्हांला मदत करता आली नाही. पण तू मात्र बिनधास्त आमच्याशी बोलत रहा. काही गरज लागली तर नि:संकोचपण सांग “कित्येक वर्षात असं कुणी वैभवशी प्रेमाने बोललंच नव्हतं. ” खरंच आईच्या आजारपणात मामाचा आधार असता तर किती बरं वाटलं असतं. काय सांगावं…
एप्रिल फुल
मोबाईलची रिंग वाजली तसा मी फोन उचलला “सर मी आदेश बोलतोय “पलीकडून आवाज आला ” सर तुम्ही चारठाण्याला जाणार होतात ना या महिन्यात?” “हो आदेश. या रविवारी म्हणजे एक एप्रिलला आपण जातोय. तू येतोयेस का?” मी चारठाण्याला जाणाऱ्यांची लिस्ट डोळ्या समोर ठेवत त्याला विचारलं. “हो सर माझी खुप दिवसांची इच्छा आहे जंगलात फिरायची. पण सर हे एप्रिल फुल तर नाही ना?” मी जोरात हसलो “नाही नाही. अरे आपण फाँरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेतलीय. गाड्या बुक केल्याहेत. चारठाण्यात जेवणाची आँर्डर देऊन ठेवलीये. एवढं सगळं एप्रिल फुल कसं असेल?” “साँरी सर सहजच विचारलं” “इट्स ओके आदेश. काही चेंजेस झाले तर तुला कळवतो” “ओके सर ” मी फोन ठेवला. लिस्टमध्ये आदेशचं नांव लिहीलं. बारावीच्या परीक्षा नुकत्याच आटोपल्या होत्या. काँलेजच्या मुलांची मागणी होती कुठंतरी घेऊन चला म्हणून. एक दिवसात जंगल सफारी होणारं चारठाणा मी ठरवलं. जंगल सफारीसोबत वनभोजन होणार म्हणून मुलंही खुप खुष होती. एका पर्यावरणावरील कार्यक्रमात माझी आणि आदेशची भेट झाली होती. मी निसर्गसहली आयोजित करतो हे ऐकून तो मला सहलीबाबत सारखी विचारणा करत होता. आज त्याचं समाधान झाल्यासारखं वाटलं. ३१ मार्चला मी सगळ्या पुर्वतयारीचा अंदाज घेत असतांना मला तीन जणांचे फोन आले. त्यांनाही सहलीला यायचं होतं. पण गाडीत जागा नव्हती. मी आदेशला फोन लावला. “आदेश तू येतो आहेस ना नक्की? कारण बरेच जण इच्छुक आहेत आणि गाडीत जागा नाहीये” “हो सर मी नक्की येतोय. वाटल्यास सहलीचे पुर्ण पैसे मी घेऊन येतो तुमच्याकडे” “नको नको. उद्या दिलेस तरी चालतील. ठिक आहे मी त्यांना नाही सांगतो. सकाळी शार्प सहाला ये स्टाँपवर” “हो सर येतो” असं म्हणून त्याने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी ठरलेल्या ठिकाणी साडेपाचलाच बस घेऊन उभा राहिलो.बहुतेक सगळी मुलं आली होती.ती सगळी पटापट गाडीत बसली.मी आदेशची वाट पाहू लागलो. सहा वाजले, सव्वा सहा झाले. साडेसहा झाले तरी आदेशचा पत्ता नव्हता. मी अस्वस्थ झालो. शेवटी मी मोबाईल काढला आणि त्याला फोन केला. फोन स्विच आँफ होता. माझ्या अस्वस्थेतेची जागा आता संतापाने घेतली. पण हा अनुभव मला नेहमीचा होता.कितीही कडक ताकीद द्या, स्वतःच्या फुरसतीने डुलतडालत येणारे मी अनेक लोक बघितले होते. अशा लोकांना दुसऱ्याच्या गैरसोयीशी काही देणंघेणं नसतं. मी अजून १५ मिनिटं वाट बघायचं ठरवलं. पंधराची तीस मिनिटं होऊन गेली ना आदेश आला ना त्याचा फोन आला. बसमधली मुलं कंटाळून बाहेर आली आणि “काय झालं?”असं विचारु लागली. त्यांना काय उत्तर द्यावं मला कळेना. मी मोबाईल काढून आदेशला फोन लावला. परत मोबाईल स्वीच आँफ! आता मात्र माझी नस तडकली. आता थांबणं शक्यच नव्हतं. मी निर्णय घेतला. “बसा रे मुलांनो. खुप झालं वाट बघणं. चला निघुया” मुलं पटापट जाऊन बसली. मीही बसमध्ये चढणार तेवढ्यात मोबाईल वाजला. अनोळखी नंबर दिसत होता. “हँलो, कोण बोलतंय?”मी विचारलं. “चौधरी सर बोलताहेत ना?” “हो चौधरीच बोलतोय” “सर मी आदेशचा भाऊ जितू बोलतोय. सर आदेश सहलीला नाही येऊ शकणार” “अरे कमाल आहे त्याची! आता सांगतोय हे? मी साडेपाच पासून त्याची वाट पहातोय. आणि माहितेय? तो येणार म्हणून तीन जणांना मी नाही सागितलंय. आता हे नुकसान कोण भरुन देणार?” मी संतापाने अक्षरशः ओरडलो. “साँरी सर पण ऐका ना सर.. सर..तो येऊ शकणार नाही कारण. कारण त्याचा अँक्सीडंट झालाय आणि तो आँन दि स्पाँट गेला सर ” ” काय्य्य……”मी इतक्या जोरात ओरडलो की बसमधली मुलं बाहेर आली. “कसं, कसं झालं हे?” मी आता थरथर कापत होतो. माझ्या डोळ्यात आता पाणी जमा होऊ लागलं होतं. ” सर तो सकाळीच सहलीला जायचं म्हणून घरातून बाईकने बाहेर पडला. हायवेवर आला तर एका भरधाव डंपरने त्याला उडवलं. त्याच्या डोक्यावरुन डंपरचं चाक गेलं. तो तिथंच गेला. योगायोगाने एक अँम्ब्युलन्स तिथून जात होती त्यांनी त्याला उचलून सिव्हिल हाँस्पिटलला नेलं. पण डाँक्टरांनी त्याला म्रुत घोषित केलं. आम्हाला त्यानंतरच कळलं. आम्ही आता सिव्हिललाच आहोत” फोनवर आता जोरजोराने रडणं ऐकू येत होतं. माझ्या तर हातापायातले त्राणच गेले. मी मटकन खाली बसलो. एका मुलाने पाण्याची बाटली आणून दिली. मी पाणी प्यायलो. थोडी हुशारी वाटू लागली. “सर काय झालं?”त्याने विचारलं मी थोडक्यात सर्व सागितलं. पोरं हळहळली. “सर मग ट्रिप कँन्सल करायची का?” मी भानावर आलो. ट्रिप कँन्सल केली तर माझं नुकसान तर होणार होतंच पण मुलांचे मुड गेले असते. ते आदेशला ओळखतही नव्हते. खरं तर माझीही आदेशशी नुकतीच ओळख झाली होती. मी स्वतःला सावरलं. मुलांना बसमध्ये बसायला सांगितलं. मीही जाऊन बसलो. बस चारठाण्याकडे निघाली. जंगलात फिरतांना माझा मुड वाईटच होता.कशातच मन लागत नव्हतं.फाँरेस्ट गार्डला माहीती सांगायला सांगून मी रेस्ट हाऊसला येऊन बसलो. संध्याकाळी आम्ही लवकरच परतीच्या प्रवासाला लागलो.तरीही येतायेता नऊ वाजलेच.जेवण करुन मी विचार करत बसलो.उद्या आदेशच्या आईवडिलांना भेटून यावं असं ठरवलं.मग टिव्ही लावून आदेशची बातमी दिसतेय का ते बघू लागलो.पण तशी बातमी काही टिव्हीवर झळकली नाही. दहा वाजता मोबाईल वाजला. स्क्रीनवर आदेशचं नांव वाचून मी हादरलो. भीतभीतच मी फोन कानाला लावला. “सर मी आदेश बोलतोय .कशी झाली सर ट्रिप?” मी इतका जोरात दचकलो की माझ्या हातातून मोबाईल निसटून खाली पडला. थरथरत्या हाताने उचलून मी तो कानाला लावला. “कोण…को..ण बो..ल..तं..य?” “सर मी आदेश बोलतोय. सर आवाज नाही ओळखला का? आणि माझा नंबर तर सेव्ह असेलच ना?” “कोण आदेश? आदेश..अरे..अरे तू जिवंत आहेस? काहीतरी गडबड आहे. अरे आज सकाळी फोन आला होता की.. की तुझा अँक्सीडंट होऊन तू आँन दी स्पाँट गेलास” बोलताबोलता माझ्या घशाला कोरड पडली. फोनमधून जोरजोरात हसण्याचा आवाज आला. माझ्या अंगावर काटा आला. बापरे! मी एखाद्या भुताशी तर बोलत नव्हतो ना? “सर तुम्ही प्यायला तर नाहीत ना? अहो सर मी एकदम धडधाकट आहे. मला काही झालेलं नाही. आणि तुम्ही प्यायला नसाल तर नक्कीच कोणीतरी तुम्हांला एप्रिल फुल केलं असावं” बापरे! हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसत होतं “अरे पण मग तू आला का नाहीस? बरं. येणार नसल्याचा साधा फोनसुध्दा केला नाहीस तू! किती वाट बघितली तुझी” “सर गडबड अशी झाली की रात्री दहा वाजता मोबाईल खाली पडून फुटला. आईबाबांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सिम त्यांच्या मोबाईलमध्ये बसेना. सकाळी मी साडेपाचला निघालो. हायवेला लागलो आणि माझ्या गाडीचं चाक पंक्चर झालं. सकाळ आणि त्यात रविवार एकही दुकान उघडं नव्हतं. शेवटी एकाला विनंती करुन पंक्चर जोडलं. पण या सगळ्या भानगडीत पावणेसात वाजले.मी स्पाँटवर पोहोचलो तेव्हा बस निघून गेली होती. घरी येऊन मोबाईल दुरुस्त करुन तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण फोन लागला नाही. कदाचित जंगलात रेंज नसावी” मला एकदम आठवलं. त्याच्या भावानेच तर फोन करुन ती बातमी दिली होती. माय गाँड चक्क भावानेच हा खोटारडेपणा करावा? “आदेश चक्क तुझ्या भावानेच फोन करुन मला ती वाईट बातमी दिली. काय नांव बरं त्याचं…हं जितू! हो जितूच. तो तुझाच भाऊ ना?” “काय जितूने तुम्हांला फोन करुन सांगितलं? सर कसं शक्य आहे?” “का? का शक्य नाही?” “सर..”तो चाचरत बोलत होता “सर मी…
बक्षीस
सकाळची वेळ. शिल्पाने भाजीबाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सागितलं आणि गाडीतून उतरुन ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली. तिला असं सकाळी सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं. कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फारच कमी मिळायचा तरीसुद्धा जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची.कलेक्टर असुनही एखाद्या सामान्य ग्रुहिणीसारखा भाजीबाजार करण्यात तिला कधीही लाज वाटली नाही. भाजीच्या गाडीवर एक नऊ-दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती.भाजी घेऊन शिल्पाने तिला पर्समधून पैसे दिले. तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली. बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं. चमकून तिने मागे वळून पाहीलं तर भाजीवाली मुलगी उभी होती. “काय झालं?पैसे तर दिलेना मी तुला?” ती थोडी रागानेच बोलली. त्यामुलीने काही न बोलता पर्स पुढे केली. “तुमची पर्स. गाडीवर राहीली होती.” शिल्पाने ती पर्स हातात घेऊन पाहीली. पैसे, क्रेडिट कार्ड्स, बँकेची कार्ड्स जागच्या जागी होती. तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं. “थँक्स बेटा.काय नाव तुझं?” “सोनाली” तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली. त्या मुलीने दुर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली. संध्याकाळी आँफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भुतकाळ आठवला.होय असंच तर घडलं होतं तिच्याबाबतीत! आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती.सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरुन सरकू लागला. अठरा वर्षांपुर्वीची ती गोष्ट.शिल्पा तेव्हा पाचवीत होती.दुपारची वेळ.शाळा आटोपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती.चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडाल्याचं जाणवलं.पुढे जाऊन पहाते तर एक पाकिट पडलेलं दिसलं.उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहीलं.नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट.तिचं ह्रदय धडधडू लागलं.आजच शाळेत बाई सांगत होत्या.ईमानदारीचं फळ गोड असतं म्हणून!ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं.काय करावं काय नाही या संभ्रमात तिनं आजुबाजुला पाहीलं.एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता.नक्कीच!नक्की त्याचंच असावं हे पाकिट.शिल्पा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली.त्याच्या हाताला स्पर्श करुन तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं. “काय आहे?” बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं. “हे पाकिट तुमचं आहे?” शिल्पाने पाकिट पुढे करत विचारलं.पाकिट पाहून तो चमकला.झटकन त्याचा हात पँटच्या मागच्या खिशाकडे गेला. “हो माझंच आहे ते.कुठं सापडलं?” “त्या तिथे पडलं होतं” शिल्पा पाकिट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली. त्याने पाकिट उघडून पाहीलं.सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दिर्घ निश्वास सोडला.तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हाँर्न वाजला.त्या माणसाने पटकन पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली.शिल्पाही आपल्या रस्त्याने पुढे निघाली.घरी पोहोचतांना शिल्पा खुप आनंदात होतीआपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता.घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं. ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती.तिचं ते झोपडीवजा घर धुराने भरलं होतं.शिल्पाने दप्तर एका बाजुला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली.तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल.पण पोळ्या करणं सोडून आई उठली.शिल्पाला धरुन हातातल्या लाटण्यानेच तिला मारु लागली. “कारटे.इथे खायला काही नाहीये आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली.काय गरज होती तुला ते पाकीट परत करायची.टाकून द्यायचं होतं दप्तरात! तुझ्यावर कोणाला संशय आला असता?” बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती.शिल्पा जोरजोरात रडत होती,आईला ‘नको ना मारु आई’अशी विनवण्या करत होती.आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच शिल्पाची सुटका झाली. संध्याकाळी तिचा बाप नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आला.शिल्पाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं.शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली.शिल्पाला वाटलं बाप तरी तिला सहानभुती दाखवेल.पण त्याने तिच्याच दप्तरातील पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली.सोबतीला शिव्या होत्याच.शिल्पाला मारणं चालू असतांना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता.इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते.शिल्पाला मारुन थकल्यावर तिचा बाप दारुच्या नशेत बडबडत बसला.मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवताच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सागितली.तिच्यासारख्याच झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्या मुली.त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं.पैशाने भरलेलं पाकीट परत करायला नको होतं असं त्यांचं म्हणणं.शिल्पालाही आता अपराधाची भावना सलू लागली होती. दोन दिवसांनी संध्याकाळी शिल्पा आपल्या झोपडीत ग्रुहपाठ करत असतांना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली.तिची आई दार उघडून बाहेर गेली. “शिल्पा बाहेर ये.हे कोण आलेत बघ” धडधडत्या छातीने शिल्पा बाहेर आली.समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता.होय.तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिलं होतं.तिला पाहून तो हसला. “हीच ती मुलगी.”तो शिल्पाच्या आईला म्हणाला. ” बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंही राहून गेलं.बोल काय पाहीजे तुला?” शिल्पा भांबावली.काय बक्षीस मागावं ते तिला कळेना. ” आईस्क्रीम चालेल?” “हो आईस्क्रीम. मला आईस्क्रीम पाहीजे” शिल्पाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला.शिल्पानेही मान डोलावली. “चला तर मग.बसा गाडीत” त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले.शिल्पाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहीलं.या आईस्क्रीम ऐवजी या शेठजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमी तरी करता आली असती असं तिला वाटून गेलंं. शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ,पाणीपुरी खाऊ घातली.मग नंतर पोट भरुन आईस्क्रीम. ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता.एका मोडक्या खुर्चीवर शेठजी बसले. ” दादा तुमची मुलगी खुप इमानदार आणि हुशारही आहे.आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले.खुप छान उत्तरं दिलीत तिने.मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं” ” शेठजी आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं.आम्हाला ते कसं परवडणार?”शिल्पाचा बाप हात जोडत म्हणाला. ” तुम्ही काही काळजी करु नका.ते काम माझ्याकडे लागलं.तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन.मात्र एक गोष्ट. तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही.आपण तिला होस्टेलवर ठेवू.त्याचाही खर्च मीच करेन.” शिल्पाच्या बापाला हायसं वाटलं.खाणारं एक तोंड कमी होणार होतं.तो म्हणाला. “मग तर आम्हाला काहीच अडचण नाही.पोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख!” शेठजींनी चक्र फिरवली. नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्चभ्रूंच्या शाळेत गेली. फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोराकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बुट आले. नवीकोरी पुस्तकं, आधुनिक स्कुलबँग आली. त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून, बावचळून गेली. ती झोपडपट्टीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलंमुली तिला टोमणे मारायची, टिंगलटवाळी करायची. शिल्पा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची. कधीकधी तिला तिथून पळून जावंसही वाटायचं. हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहिली आली. त्यानंतर शिल्पाने मागे वळून पाहीलं नाही. सातवीत स्काँलरशिप मिळवून तिने शेठजींवरचा आपला भार थोडा हलका केला. दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहीली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेठजींनाही खुप आनंद झाला. एका नामांकित काँलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करुन दिला. बारावीत तर शिल्पाने कमालच केली. राज्यात ती पहीली आली. ते कळताच शेठजींनी तिला मेडिकल काँलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं. पण तिला आय.ए.एस.करायचं होतं. तिचा निर्णय ऐकून शेठजींनी तिला विरोध केला नाही. पदवी मिळवल्यावर शिल्पाने युपीएससीचा अभ्यास…
चाँकलेट काका
धावपळ करत मी मुंबई पँसेंजर पकडली. आतमध्ये नेहमीप्रमाणेच गर्दी होती तरीही मला बसायला जागा मिळाली. पँसेंजरचा प्रवास कंटाळवाणा असला तरी प्रत्येक छोट्या छोट्या स्टेशनवर थांबणारी गाडी, त्यातून उतरणारी आणि चढणारी वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं मला मोठी इंटरेस्टिंग वाटतात. विशेष म्हणजे त्यांच्या आपापसातल्या गप्पा फारच इंटरेस्टिंग असतात. त्या गप्पातून नातेवाईकांचे आपसातले संबंध, हेवेदावे, मत्सर, समाजातल्या चालीरिती आपल्याला कळत असतात. माझ्याच बेंचवर बसलेल्या लहान मुलांची आपसातील भांडणं हसूही आणत होती आणि वीटही. म्हसावद आलं. माझ्यासमोरचे दोनजण उतरुन गेले आणि त्याजागी एक साठी उलटलेला माणूस येऊन बसला. माझ्या बेंचवरच्या मुलांची खिडकीत कोण बसेल यावरुन भांडणं झाली. नंतर मारामारीही. मग दोघांनीही मोठ्याने भोकाड पसरलं. त्यांचे आई आणि बाप त्यांना समजवायला लागले तेवढ्यात… “चाँकलेट खाता कारे पोरांनो” असा दमदार आवाज घुमला. सगळे त्या आवाजाकडे बघू लागले. पोरांनीही रडणं सोडलं आणि त्या आवाजाकडे बघू लागले.“कारे खाता का चाँकलेट?” माझं लक्ष गेलं. माझ्या समोर बसलेला तो साठी उलटलेला इसम त्यांना विचारत होता. चाँकलेटला नाही म्हणणारी लहान मुलं त्यातून पँसेंजरमध्ये प्रवास करणारी गरीब किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीयांची मुलं जवळजवळ अशक्यच. दोघांनीही होकारार्थी माना हलवल्या. मग त्या माणसाने बँग उघडून तिथल्या पोरांना चाँकलेट्स दिली. पोरं खुष आणि पोरांचं रडणं थांबलं म्हणून त्यांच्या आया खुष. एक चाँकलेट माझ्याकडेही सरकवत तो माणूस म्हणाला“घ्या साहेब”“अहो नको. चाँकलेट खायला मी लहान थोडाच आहे?” मी आढेवढे घेत म्हणालो खरा पण मलाही मिळालं तर हवंच होतं चाँकलेट. “अहो चाँकलेट खायला कुठं वय लागतं का?मी आता म्हातारा झालो तरी मला चाँकलेट खायला आवडतात. घ्या लाजू नका”मी ते चाँकलेट घेतलं आणि लहान मुलांसारखं पटकन खाऊन टाकलं. एवढ्यात माझ्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तसा माझ्यासमोरचा माणूस उठला. उठताउठता त्याने बँग उघडून त्यातली चाँकलेटस् काढली तेव्हा त्याची ती बँग पुर्ण चाँकलेट्सनी भरलेली दिसली. तो त्या कंपार्टमेंटमध्ये गेला आणि मुलांच्या रडण्याचे आवाज बंद झाले. थोड्या वेळाने पाचोरा आलं आणि मी उतरुन गेलो. पण तो चाँकलट वाटणारा म्हातारा माझ्या चांगलाच लक्षात राहिला. दोनतीन दिवसांनी मी चाळीसगांवला जायला निघालो. म्हसावद आलं तसे हे चाँकलेटस् वाटणारे ग्रुहस्थ योगायोगाने माझ्यासमोरच येऊन बसले. मी त्यांना लगेच ओळखलं पण त्यांनी मला ओळखल्याचं दिसलं नाही म्हणून मी त्यांना त्यादिवशीची ओळख करुन दिली. ते हसले“हो आठवलं. रोज नवीननवीन माणसं बघतो ना म्हणून विसर पडतो. आणि आता वयही झालं. पुर्वीसारखं लक्षात रहात नाही”“काका आजही चाँकलेट्स देणार का?” “हो तर! हे तर माझं रोजचंच आवडतं काम आहे. रोज याच गाडीने इगतपुरीला जातो. तिथं चाँकलेट्सनी बँग भरुन घेतो आणि तिकडून पँसेंजरनेच परत येतो”सांगताना त्यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला.आता मात्र या माणसाबद्दल मला उत्सुकता वाटू लागली.मी आश्चर्यचकीत होऊन विचारलं“तुम्हांला त्यात आनंद मिळत असणार हे नक्की पण अजून काही विशेष कारण आहे का?”“साहेब मी निव्रुत्त शिक्षक.बायको दोन वर्षांपूर्वी वारली. एकुलता एक मुलगा खुप शिकला आणि नोकरीसाठी आँस्ट्रेलियात जाऊन बसला. म्हसावदसारख्या खेड्यात त्याला आणि त्याच्या बायकोला यायला आवडत नाही. मागच्या वर्षी त्याला मुलगा झाला.त्याला तरी तो घेऊन येईल असं वाटत होतं पण त्याने फक्त फेसबुकवर त्याचे फोटो पाठवले. कधीतरी व्हिडिओ काँलवर नातू दिसतो. त्याला घेण्याची, त्याचे लाड करण्याची खुप इच्छा होते पण काय करणार? इतक्या दुरुन ते कसं शक्य होणार?”“मग तुम्हीच का जात नाही आँस्ट्रेलियात?”“साहेब आपलं सगळं आयुष्य म्हसावदसारख्या खेड्यात गेलं. इथं शेती आहे. ती सोडून कुठे जावंस वाटत नाही. बहुतेक नातेवाईक इथंच आहेत. त्यांच्यामुळे तरी थोडा जीव रमतो. मुलाला म्हंटलंय,उन्हाळ्यात इथे येऊन मला आँस्ट्रेलियाला घेऊन जा आणि पावसाळा सुरु होण्याआधी इथे आणून सोड. हो हो म्हणतोय. बघू कधी नेतो ते? मुलगी औरंगाबादला आहे पण दुर्देवाने तिला मुलबाळ नाही. कधी होईल सांगू शकत नाही. त्यामुळे नातवांशी खेळण्याची, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची इच्छा अपुर्णच राहिली. ती या गोरगरीबांच्या मुलांना चाँकलेट वाटून मी पुर्ण करतोय. रडणारी पोरं जेव्हा चाँकलेट पाहून हसायला लागतात तेव्हा खुप बरं वाटतं” ” छान. पण तुम्हांला असं वाटत नाही की अशी चाँकलेट्स देऊन तुम्ही त्या मुलांचे दात खराब करताय?”” अहो रोजरोज चाँकलेट्स खायला ती काय श्रीमंताची पोरं आहेत? कधीतरी आईबापाने घेऊन दिलं तर खाणार बिचारी. आणि असंही मी त्यांना दोन चाँकलेट्सच्यावर देत नाही “” फक्त गाडीतच वाटता की अजून इतर कुठं…?”” कधी झोपडपट्टीत वाटतो तर कधी आदिवासी पाड्यांवर जाऊन वाटतो. आसपासच्या खेड्यातल्या शाळांमध्ये जाऊनही वाटतो” “अरे वा!” त्यांच्या या कार्याने मी चांगलाच प्रभावित झालो. मग मी पाकिट काढून पाचशेच्या दोन नोटा त्यांच्या हातात देऊन म्हंटलं ” हे तुमच्याकडे असू द्या. माझ्याकडूनही चाँकलेट्स देत चला” त्यांनी त्या नोटा मला परत केल्या “नाही साहेब. मी माझ्या समाधानाकरीता हे करतो. तुमच्या पैशांनी चाँकलेट्स दिल्याचं समाधान मला मिळणार नाही. तुम्ही असं करा ना तुम्ही एक्स्प्रेसनेही जात असता. एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातही बरीच गरीब मुलं तुम्हांला भेटतील. त्यांनाही चाँकलेट्स मिळाली तर आनंदच वाटेल” त्यांचं म्हणणंही योग्यच होतं. पण का कुणास ठाऊक असं चाँकलेट्स देणं मला माझ्या स्टेटसला न शोभणारं वाटलं.मग त्यांनी माझी चौकशी केली. मलाही दिड वर्षाची लहान मुलगी असल्याचं मी सांगितल्यावर त्यांना आनंद झालेला वाटला. म्हणाले “कधी या मुलीला घेऊन.मजा येईल तिच्याशी खेळायला”” हो जरुर आणेन” मी आश्वासन दिलं त्यानंतर आमच्या भेटीगाठी होत गेल्या. त्यांचं नांव काशिनाथ पाटील होतं तरी मी त्यांना चाँकलेट काकाच म्हणायचो. पँसेंजरमध्ये काका बरेच प्रसिद्ध होते. अपडाऊन करणारे आणि फेरीवाले त्यांना आता चांगलेच ओळखू लागले होते. एक दिवस चाळीसगांवला बायकोच्या नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी जायला निघालो. बाकीच्या गाड्या लेट झाल्यामुळे पँसेंजरशिवाय पर्याय नव्हता. सोबत मुलगी होतीच. मग मी चाँकलेट काकांना फोन करुन बोलावून घेतलं. म्हसावदला ते गाडीत आले.माझ्या मुलीला मांडीवर घेऊन बसले. तिच्याशी खेळतांना ते खुप आनंदी वाटत होते. तिच्या बोबड्या बोलांनी ते हरखून जात होते.चाळीसगांव येईपर्यंत मुलगी त्यांच्याकडेच होती. चाळीसगांव आलं तसं त्यांनी मुलीचा मुका घेत माझ्याकडे दिलं. “खुप गोड आहे तुमची मुलगी” तिच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले. मग खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून त्यांनी माझ्या हातात दिली.” हे कशासाठी?” मी आश्चर्यचकित होऊन विचारलं“माझ्याकडून तिला फ्राँक घेऊन घ्या”“अहो कशाला काका?”“असं कसं नातीला पहिल्यांदा बघितलं. तिला काही द्यायला नको?”बोलताबोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी माझं पाचोऱ्याचं काम संपलं आणि बऱ्हाणपूरकडचं सुरु झालं. चाँकलेट काकांशी भेट होणं मुश्कील होऊन बसलं. अधूनमधून फोन करुन मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचो. आँस्ट्रेलियातला त्यांचा मुलगा येऊन गेला का याचीही मी चौकशी केली. त्याला अजून सुटी मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. दोन महिन्यांनी बऱ्हाणपूरकडचं माझं काम संपल्यावर चाळीसगांवकडची साईट सुरु झाली. आता चाँकलेट काकांची रोजच भेट होणार याचा मला आनंद झाला. मी त्यांना फोन केला पण त्यांचा फोनच बंद होता. दुसऱ्या दिवशी मी पँसेंजरने जायला निघालो.काकांना फोन लावला. आताही फोन बंदच होता. म्हसावदला दोन माणसं माझ्यासमोरच येऊन बसली. मी त्यांना विचारलं “काहो त्या काशिनाथ पाटलांना ओळखता का?”“कोणते काशिनाथ पाटील? गावात चारपाच काशिनाथ पाटील आहेत. त्यातले नेमके कोणते?”“ते निव्रुत्त शिक्षक होते. आणि रेल्वेत नेहमी लहान मुलांना चाँकलेट्स वाटायचे”“ते…
अण्णा
लोकलने दादर स्टेशनवर मी उतरलो तेव्हा पाऊस सुरु होता.पावसाळ्याचेच दिवस ते.त्यामुळे माझ्यासोबत छत्री होतीच.एका हातात ब्रीफकेस आणि दुसऱ्या हाताने छत्री उघडून मी जिना चढलो.सकाळची अकरा साडेअकराची वेळ असल्याने दादर स्टेशनवर तुफान गर्दी होती.दादर ईस्टच्या बाजुला बस स्टँड असल्याने मी ईस्ट साईडला आलो.जीना उतरतांना लक्षात आलं की पावसामुळे आणि लोकांच्या पायाचा चिखल पायऱ्यांना लागल्यामुळे जिना फार निसरडा झालाय.दोनदा मी सटकता सटकता वाचलो पण पाचसहा पायऱ्या शिल्लक असतांना माझा पाय अखेर सटकलाच आणि मी पायरीवर धाडकन आपटलो.पडतापडता मी जिन्याचा कठडा धरला त्यामुळे फार लागलं नाही पण माझा डावा पाय चांगलाच लचकला.पँटही मागच्या बाजूने खराब झाली असावी.कसाबसा उठून मी चालायला लागलो पण पाय चांगलाच दुखावला होता.लंगडतलंगडतच मी स्टेशनबाहेर आलो.एकाला बसस्टँडबद्दल विचारलं.त्याने दहा मिनिटाच्या अंतरावर ते असल्याचं सांगितलं.दहा मिनिटांच्या अंतरासाठी रिक्षाला पैसे घालवणं बरं वाटेना म्हणून मी पायीच निघालो.पाय दुखत होताच.त्याची पर्वा न करता हळूहळू स्टँडवर आलो.चौकशी कक्षात अलिबागला जाणाऱ्या गाडीची वेळ विचारली.“ती काय बाहेर उभी आहे.निघेलच पंधरावीस मिनिटात”त्यांनी सांगितलं.स्टँडवर पाण्याची डबकी साचली होती.ती चुकवत मी बसपर्यंत पोहोचलो.बस अर्धी भरली होती.एका सीटवर खिडकीजवळ बँग ठेवलेली मी पाहिली.त्याशेजारीच मी बसलो.थोड्या वेळाने कंडक्टरने जशी बेल मारली तसा एक चाळीस पंचेचाळीसच्या आसपासचा काळासावळा ग्रुहस्थ घाईघाईत माझ्याजवळ आला. मी त्याला आत जायला जागा करुन दिली.बस निघाली.पहिल्यांदाच अलिबागला जात असल्यामुळे मला तिथली माहिती घेणं आवश्यक होतं.१९८६चा तो काळ.मोबाईलचा त्यावेळी जन्मही नव्हता झाला.त्यामुळे गुगलवर सर्च करुन माहिती घेणं हा प्रकारच अस्तित्वात नव्हता.वाचलेल्या किंवा ऐकीव माहितीवरच अवलंबून रहावं लागायचं.मी शेजारच्या माणसाला विचारलं” अलिबाग किती दुर आहे इथून?” त्याने माझ्याकडे दचकून पाहिलं.कदाचित मी त्याच्याशी बोलेन अशी त्याने अपेक्षा केली नसावी.मग तो हसून म्हणाला” साँरी मै मराठी नही बोल सकता.आय कँन अंडरस्टँड बट कान्ट स्पीक.हिंदीमे बोलेगा तो चलेगा ?”त्याच्या उच्चारावरुनच तो साऊथ इंडियन अण्णा आहे हे माझ्या लक्षात आलं.“चलेगा ना.मै हिंदी बोलभी सकता हूँ और समझभी सकता हूँ”“थँक्स.अलिबाग इधरसे हंड्रेड कीलोमीटरसे उपर होयेगा.इट विल टेक टू अँड हाफ अँन अवर्स.आप अलिबागमे किधर जायेगा?”“मुझे आर.सी.एफ.जाना है.मेरा कल वहाँ इंटरव्ह्यू है”“व्हेरी गुड.मै भी आर.सी.एफ.जायेगा.आय अँम वर्किंग देअर”मला आनंद झाला.याच्याकडून हवी असलेली माहिती काढायला हरकत नव्हती.“अच्छा अलिबाग बस स्टँडपर कोई हाँटेल या लाँज मिल जायेगा आज रात सोने के लिये?”“येस.देअर आर सम हाँटेल्स बट मेरेको जादा जानकारी नही है”मी चुप बसलो.म्हणजे आता स्वतः अलिबागला उतरल्यावर शोध घेणं आलं.“आपके पैरमे कुछ प्राँब्लेम है क्या?मैने बस स्टँडवर देखा आप चल नही पा रहे थे” त्याने विचारलं” हाँ दादर स्टेशनकी सिढियोपरसे मै फिसल गया था.पैरमे मोच आ गयी है.बहुत दर्द हो रहा है” बोलताबोलता मी पँट वर करुन पायाकडे पाहिलं.पाय चांगलाच सुजला होता.त्यानेही पायाकडे पाहिलं.पण तो काही बोलला नाही. गाडीच्या खिडकीतून आता कोकणातला निसर्ग खुप सुरेख दिसत होता.जागोजागी भात पेरणी झालेली दिसत होती.पाण्याने भरलेले हिरवे चौकोन डोळ्यांना सुखावत होते.त्यासोबत खिडकीतून येणारी थंड हवा आल्हाददायक वाटत होती.पाय दुखत नसता तर मला या सुंदर निसर्गाचा जास्त आनंद घेता आला असता.शेजारच्या माणसाने मग माझी थोडी चौकशी केली.माझा कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे?आता सध्या काय करतोय?कुठे रहातो?घरी कोण कोण असतं?मी उत्तरं देत होतो पण मला मनातून रात्रीच्या निवासाची काळजी लागली होती.स्टँडजवळ चांगलं हाँटेल मिळेल का?फार महागडं तर नसेल?जेवायचं कसं करायचं?उद्याच्या इंटरव्ह्यू पर्यंत हा पाय ठिक होईल का?फ्रँक्चर तर नसेल?नाना प्रश्न मला सतावत होते त्यामुळे त्याच्या प्रश्नांना मी थोडा तुटकपणेच उत्तरं देत होतो.थोड्यावेळानेखिडकीतून शहर आल्यासारखं दिसायला लागलं.मी त्याला विचारलं“अलिबाग आ गया क्या?”” अभी आयेगा.पहले आर.सी.एफ.आयेगा उसके बाद बस स्टँड आयेगा”” बस स्टँडसे आर.सी.एफ.के लिये रिक्षा मिल जायेगी ना?कितना किराया होता है?”तो हसला.“हाँ मिल तो जायेगी.लेकीन आप बस स्टँड क्यूँ जा रहे है?आर.सी.एफ.के स्टाँप पर उतर जाईये.”मी गोंधळलो.” क्या आर.सी.एफ.मे रहने के लिये गेस्ट हाऊस है?”मी शंका येऊन विचारलंतो अजूनच हसला“नही नही ऐसा गेस्ट हाऊस नही है.आप मेरे घर पर चलो.वहाँपर ही रुक जाना”आँफर चांगली होती.माझं सगळं टेंशन दूर करणारी होती पण अनोळखी माणसाकडे रहायला जाणं मला संकोचल्यासारखं वाटत होतं.त्याच्या कुटुंबातली माणसं कशी असतील?ती आपल्यासारख्या आगंतुक पाहुण्याशी व्यवस्थित वागतील की नाही ही शंका मनाला खाऊ लागली“नही नही.आपकी फँमिलीको डिस्टर्ब करना अच्छा नही.मै स्टँडपरही कोई हाँटेल ढुंढ लुंगा.एक रात की तो बात है.”” दँटस् व्हाँट आय अँम सेईंग.मेरा फँमिली केरलामे है.आय अँम स्टेईंग अलोन इन माय क्वार्टर. आपको रहनेमे कोई दिक्कत नही होगी.आपके पैरमे तकलीफ भी है.आप यही पर उतर जाओ.हाँटलमे रहनेकी जरुरत नही”मी अवघडलो.काय उत्तर द्यावं ते मला कळेना.बसमध्ये भेटलेल्या एका अनोळखी माणसाकडे रात्रभर रहाण्यात मग तो एकटाच का असेना मला नक्कीच संकोच वाटणार होता.शिवाय दोघांच्या भाषा वेगळ्या.तो तोडक्या मोडक्या हिंदीत बोलणार आणि मी तोडक्या मोडक्या इंग्रजीत. जमणं कठिणच.तेवढ्यात कंडक्टरने बेल मारली“आर.सी.एफ.कुणी आहे का?उतरा लवकर”तो ओरडला.माझ्या शेजारच्या माणसाने त्याची बँग हातात घेतली आणि मला म्हणाला“चलो चलो.सामान लेकर आओ मेरे साथ”अवघडलेल्या अनिश्चित स्थितीत मी माझी बँग घेऊन त्याच्यासोबत खाली उतरलो.बस निघून गेली.स्टाँपवर दोनतीन रिक्षा उभ्या होत्या.त्याने एकाला पत्ता सांगितला आणि रिक्षात शिरला.माझ्याकडे नजर टाकून मला “आओ” म्हणाला.मी अनिच्छेने आणि अवघडलेल्या मनःस्थितीत त्याच्या शेजारी जाऊन बसलो.रिक्षा आर.सी.एफ.काँलनीत फिरत फिरत एका तीन मजली अपार्टमेंट समोर येऊन उभी राहिली.खालच्या मजल्यावरच त्याचं क्वार्टर होतं.कुलुप उघडून आम्ही आत शिरलो.पंधरावीस दिवस घर बंद असावं.एक कुबट वास आत येत होता.” मै बीस दिन छुट्टीपर था.मेरे ब्रदरके लडकीका शादी था.इसलिये घरमे थोडा कचरा हो गया है.आप बैठो मै रुम साफ कर देता.”मी बसलो.त्याने कुंचा घेतला आणि घर झाडून काढलं.मग कपड्याने पुसून काढलं.घरात सामान काही जास्त दिसत नव्हतं.बाहेरच्या खोलीत एक टेबल.दोन खुर्च्या.बेडरुममध्ये एक पलंग.भिंतीवर एका अनोळखी दाक्षिणात्य देवाचा फोटो होता.किचनमध्ये थोडीफार भांडी,गँस बस इतकंच.“आप फ्रेश हो जाओ.फिर मै काँफी बनाता.साँरी मै चाय नही पिता इसलिये चाय का सामान नही है”“कोई बात नही.मुझे काँफीभी पसंद है”मी फ्रेश होऊन आलो.त्याने काँफीचा कप माझ्या हातात दिला.दाक्षिणात्य चवीची ती थोडिशी कडवट काँफी होती.पण या पावसाळी वातावरणात मस्त वाटत होती.“खाना खाया था की नही आपने?”त्याने विचारलं आणि मला एकदम भुक लागल्याची जाणीव झाली“नही.सुबह नाश्ता किया था.बादमे पैरमे मोच आगयी तो फिर हाँटेलमे गया नही” मी म्हणालो“आय अँम साँरी मै मेसमे खाना खाता और अभी मेस बंद हुआ होगा.आपके खाने के लिये मेरे पास कुछ नही है.अभी रातकोही खाना मिलेगा”“कोई बात नही.मुझे भुख नही है”मी माझी भुक लपवत म्हणालोमग त्याने एकदम आठवल्यासारखी बँग उघडून बिस्किट पुडा काढला आणि मला दिला.काँफीसोबत बिस्कीटं खाऊन मला जरा तरतरी आली.“आप थोडा रेस्ट करो” तो म्हणाला” नही.दिनमे मै सोता नही हूँ”“ठिक है सोना नही थोडा रेस्ट करना.इव्हनिंगमे मै आपके लिये मेडिसीन लेके आऊंगा”मग तो बेडरुममध्ये गेला आणि लगेच बाहेर आला“आपका बेड तयार है.शामतक पैरको रेस्ट मिला तो फायदा हो जायेगा”मी उठलो.आतमध्ये गेलो.पलंगावर एक छान स्वच्छ चादर टाकली होती.उशीचं कव्हरही बदललेलं दिसत होतं“आप कहाँ सोयेंगे?आपभी तो केरलासे आये है”“नो नो आय केम यस्टर्डे फ्राँम केरला.कुर्लामे मेरा रिलेटिव्ह है उनके यहाँ रातको स्टे किया.सुबह उनके यहाँ खाना खाके…
सीमोल्लंघन
” हं सांगा मला काय काय आणायचं ते,मी घेऊन येतो” बापुसाहेब तयार होऊन सरलाताईंना म्हणाले“अहो तुम्ही राहू द्या.वसंताला पाठवते मी”“आम्हांला तरी कोणतं काम आहे?द्या ती लिस्ट आमच्याकडे”“वसंताला घेऊन तरी जा सोबत ““नको नको.तुमच्या मदतीला राहू द्या”सरलाताईंनी थोड्या नाखुषीनेच सामानाची यादी त्यांना दिली.बापुसाहेब घराबाहेर पडले.सरलाताई त्यांच्या पाठमोऱ्या आक्रुतीकडे पहात राहिल्या.एवढा मोठा माणूस,आज भाजी आणि किराणा आणण्यासारख्या क्षुल्लक कामांसाठी बाहेर पडावा हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं.आज दसऱ्यानिमित्त ड्रायव्हरला सुटी दिली असल्याने बापुसाहेबांनी स्वतःच गाडी काढली आणि ते बाजाराकडे निघाले.आज दसऱ्याचा बाजार तुडूंब भरला होता.एका गल्लीत गाडी पार्क करुन ते बाजारात शिरले.त्यांना आपल्या तरुणपणाची आठवण झाली. दसऱ्याच्या दिवशी ते असेच भाजीबाजारात येऊन खरेदी करायचे.सोबत मुलं असली की अजुनच मजा यायची.त्यांचे प्रश्न आणि मागण्या यांचा भडीमार असायचा.“एकट्याने खरेदी करण्यात मजा नाही” ते मनाशीच पुटपुटले.मग त्यांनी भरपूर भाज्या,झेंडूची फुलं खरेदी केली.एका किराणा दुकानात जाऊन सरलाताईंनी लिहून दिलेल्या वस्तू खरेदी केल्या.स्वीट मार्टमध्ये जाऊन त्यांचे आवडीचे मोतीचुरचे लाडू आणि संध्याकाळी भेटायला येणाऱ्यांसाठी पेढे घेतले.लहान मुलांसाठी चाँकलेट्स घेऊन ते घरी आले.पिशव्या भरभरुन त्यांनी आणलेला बाजार पाहून सरलाताईंना आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं.“अहो इतक्या भाज्या?घरात आपण इनमीन दोन माणसं!कधी संपणार हे?”“असू द्या हो.आज इतक्या वर्षांनी बाजारात गेलो.इतक्या ताज्या हिरव्यागार भाज्या पाहून मोह आवरला नाही.”सरलाताईं मनाशीच हसल्या.आपल्या नवऱ्याने असं सामान्य माणसासारखं वागलेलं पाहून त्यांना समाधान वाटलं. विश्वासराव शिंदे उर्फ बापुसाहेब म्हणजे जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ.एका सहकारी बँकेचे चेअरमन.बापुसाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते.जिल्ह्यात कोणत्याही पक्षाची सत्ता येवो बँकेत मात्र विश्वासरावांचंच पँनल जिंकून यायचं.पँनलमध्ये इतर सदस्य कोण आहेत याचं बँकेच्या सभासदांना काहिही देणघेणं नसायचं.त्यात बापुसाहेब आहेत म्हणजे झालं इतकी लोकप्रियता बापुसाहेबांची होती.बापुसाहेबांचं संघटन कौशल्य वादातीत होतं.कोणत्या माणसाला कसं ताब्यात ठेवायचं हे त्यांना माहित होतं.अगोदर फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली त्यांची बँक जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात पोहोचली होती.प्रत्येक शाखा आधुनिक होती आणि जवळजवळ प्रत्येक गावात बँकेचं एटीएम होतं.या सर्वामागे बापुसाहेबांचं अफाट कर्तृत्व होतं.जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदार,खासदारापासून ते खेड्यापाड्यातल्या गरीब शेतकऱ्यापर्यत सगळ्यांशी बापुसाहेबांचे प्रेमाचे संबंध होते.कर्जवाटपात जशी बँक जिल्ह्यात अव्वल होती तशीच कर्जफेडीतही आघाडीवर होती.बँकेचा एनपीए अतिशय कमी होता.कारभार तर इतका पारदर्शी होता की रस्त्यावरच्या माणसाने जरी चौकशी केली तरी त्याला एकही चुक दिसू नये.बँकेतला भ्रष्टाचार म्हणजे फक्त चहापाणी करणं किंवा खुप झालं तर सगळ्या स्टाफला पेढे वाटणं.बापुसाहेबांची लोकप्रियता बघून त्यांना बऱ्याचदा राजकीय पक्षाकडून लोकसभा,विधानसभा निवडणूक लढायच्या आँफर्स यायच्या.पण बापुसाहेबांना बँकेला निवडणूकीचा आखाडा बनवायचं नव्हतं किंवा बँकेच्या कारभारात राजकीय पक्षांना शिरुही द्यायचं नव्हतं.ते स्वतः जन्मजात गर्भश्रीमंत होते.गावाकडे प्रचंड शेती होती.शहरात दोन थ्री स्टार हाँटेल्स होती.वडिलांच्या नावाचं एक इंजीनियरींग काँलेज होतं.मुलीचं लग्न होऊन ती जर्मनीत स्थायिक झाली होती.मुलगाही साँफ्टवेअर इंजीनियर होऊन हैदराबादला एका मल्टीनँशनल कंपनीत नोकरी करत होता.त्याची बायकोही डाँक्टर होती.बापुसाहेबांनी एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून त्यांची सर्व कर्तव्य पार पाडली होती. त्यात ते समाधानी होते.बँकेसोबतच बापुसाहेब किमान डझनभर संस्थांचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कुशल नेत्रुत्वामुळे सर्वच संस्था भरभराटीला आल्या होत्या. “मला वाटतं बापुसाहेबांनी गेली पंधरा वर्ष या बँकेचं चेअरमनपद भुषवलं आहे आणि बँकेला फार मोठ्या उंचीवर पोहोचवलं आहे.त्यांच्याबद्दल आम्हांला नितांत आदर आहे.पण जशी मागणी होतेय यावेळी त्यांनी तरुण रक्ताला संधी द्यावी.सल्लागार म्हणून त्यांचं मार्गदर्शन आम्हांला यापुढेही मिळत राहील यात शंका नाही.मी यावेळी चेअरमनपदासाठी सुधाकर देशमुखांचं नाव सुचवू इच्छितो”बाकीच्या सदस्यांनी टाळ्या वाजवून या सुचनेचं स्वागत केलं.बापुसाहेबांना धक्का बसला.चेअरमनपदातून त्यांना वगळण्यात येईल अशी त्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती.निवडणूक अधिकारीही अचंबित झाले.बापुसाहेबांव्यतिरिक्त कुणाचं नाव पुढे येईल असं त्यांनाही वाटलं नव्हतं कारण तसं कधी घडलंच नव्हतं.ते उभे राहिले.“ठिक आहे.आपण बँकेच्या नियमानुसार हात उंचावून मतदान घेऊया.मी चेअरमनपदासाठी जे उत्सुक आहेत त्यांची नावं एक एक करुन घेतो”बापुसाहेबांनाच सर्वाधिक मतदान होईल अशी त्यांना आणि बापुसाहेबांनाही अपेक्षा होतीपण अगोदरच ठरल्याप्रमाणे सगळ्यात जास्त हात सुधाकर देशमुख या नावाला वर झाले आणि बापूसाहेब हरले.सभागृहात एकच जल्लोष झाला. देशमुखांना सगळ्यांनी वर उचलून घेतलं.बापुसाहेबांचा चेहरा काळाठिक्कर पडला.सुधाकर देशमुख पुढे झाले.आपल्या भाषणांत त्यांनी सर्वांचे आभार मानले.बापुसाहेबांना संचालक मंडळात राहण्याची विनंती केली.बापुसाहेबांनी ती अर्थातच नाकारली.सर्वात विश्वासू असलेल्या सुधाकर देशमुखाने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याची त्यांना जाणीव झाली. विषण्ण मनाने ते घरी परतायला निघाले. बँकेसाठी त्यांनी केलेला त्याग,बँकेच्या प्रगतीसाठी झपाटल्यासारखी घेतलेली मेहनत,त्यामुळे कुटुंब, नातेवाईक,मित्र यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष, शेतीची झालेली हेळसांड सगळं त्यांना आठवू लागलं.आजच्या या दगाफटक्याने हे सगळं मातीमोल करुन टाकलं होतं.विचारा-विचारात घर कधी आलं तेच त्यांना कळलं नाही.”साहेब घर आलं.उतरताय ना?”ड्रायव्हरच्या बोलण्याने ते भानावर आले.कारचा दरवाजा उघडून ते आत शिरणार तोच ड्रायव्हरने त्यांना आवाज दिला.“साहेब एक मिनिट”वळून त्यांनी ड्रायव्हरकडे पाहिलं.तो पुढे आला आणि त्याने एकदम त्यांचे पाय धरले.“अरे हे काय करतोहेस?”” उद्यापासून मला नवीन चेअरमनसाहेबांच्या गाडीवर जावं लागेल.माझ्याकडून काही चुकलंबिकलं असेल तर माफ करा साहेब”आणि एकदम तो रडू लागला.“काय झालं का रडतोहेस?”बापुसाहेबांनी त्या तरुण ड्रायव्हरला जवळ घेतलं“साहेब या हरामखोरांनी तुम्हांला कट करुन बाजुला केलं.तुम्ही बँकेसाठी काय काय केलं याची कदर नाही ठेवली या नालायकांनी.साहेब आम्ही सगळे ड्रायव्हर आणि स्टाफ हे कळल्यावर खवळून गेला आहे.तुम्हांला सांगतो साहेब ,यांच्या बापाकडून ही बँक सांभाळली जाणार नाही.पहा तुम्ही पाच वर्षात यांचे काय हाल होतात ते”बापुसाहेबांना त्याच्या भावना कळत होत्या.किंबहूना त्या सर्वच सभासदांच्या भावना होत्या.त्यांनी त्याच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाले“बघुया.योग्य-अयोग्य काळ ठरवेलच “ते आत गेले.उत्सुकतेने सरलाताई बाहेर आल्या.आपल्या नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहून त्यांनी काय ओळखायचं ते ओळखलं.त्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून बापुसाहेबच म्हणाले.“आम्ही आता चेअरमन नाही राहिलो,सुधाकर देशमुख नवीन चेअरमन झाले”बापुसाहेबांचे सर्वात विश्वासू म्हणून सरलाताई सुधाकर देशमुखांना ओळखत होत्या.त्यांना झालेल्या दगाफटक्याची कल्पना आली.अशावेळी बायका उत्तेजित होतात.नको ते प्रश्न विचारुन हैराण करतात.दगाबाजी करणाऱ्याला शिव्यांची लाखोली वाहतात.पण हे सगळं करुन काहीच साध्य होणार नाही याची सरलाताईंना जाणीव होती.त्या एवढंच म्हणाल्या” जे होणार होतं ते झालं.तुम्ही फारसं मनावर घेऊ नका.फ्रेश व्हा.आपण जेवायला बसू” त्या दिवसानंतर बँकेचा विषय मनातून काढून टाकायचा बापुसाहेब प्रयत्न करु लागले.वर्तमानपत्रात येणाऱ्या बँकेच्या बातम्याही वाचणं त्यांनी सोडून दिलं होतं.बँकेव्यतिरीक्तही जीवन आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली.ते अजुनही त्यांच्या काँलेजचे अध्यक्ष होते.दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दोन हाँटेल्स फारशी चालत नव्हती.त्यांचं नुतनीकरण आवश्यक होतं.शेतीही आजकाल बेभरवंशाची झाली होती.बेरोजगारी वाढलेली असतांना कामाला मजूर मिळत नव्हते.शेतीचं उत्पन्न घटलं होतं तिकडेही लक्ष देण्याची गरज होती.बापुसाहेबांचा दिवस शेती,काँलेज,हाँटेल्स यात संपू लागला. असं म्हणतात की नियती जेव्हा एक दार बंद करते तेव्हा दुसरी दोन दारं उघडत असते.ही उघडलेली दारं फक्त आपल्या लक्षात यायला हवीत.बापुसाहेबांच्या ती लक्षात आली होती. बापुसाहेबांचं चेअरमनपद गेलं आणि त्यांच्या जीवावर चालणाऱ्या सामाजिक संस्थाही हळूहळू बंद पडू लागल्या.त्यांच्या समाजाची संस्था बापुसाहेबांनी म्रुतावस्थेतून पुनर्जीवित केली होती.संस्थेचे अनेक कार्यक्रम बँकेच्या प्रायोजकत्वावर चालायचे.बापुसाहेबांचं चेअरमनपद गेल्यावर बँकेने त्यांना प्रायोजकत्व देणं बंद केलं.संस्थेच्या संचालकांमध्ये दुसरीकडून प्रायोजकत्व मिळवण्याची धमक नव्हती.संस्थेचे कार्यक्रम बंद पडले.याचा ठपका संचालकांनी बापुसाहेबांवर ठेवला आणि त्यांना अध्यक्षपदावरुन काढून टाकलं.एक एक संस्था हातातून जात असतांना बापुसाहेब हे सगळं निर्विकार मनाने पहात होते.वाघ जखमी झाला की त्याच्या शिकारीवर जगणारे कोल्हे वाघाची किंमत ठेवत नाहीत याचा अनुभव ते घेत होते.खोट्या मोठेपणासाठी आपण ही बांडगुळं पोसली याचा…