आली हस्ता ची सर,
हत्तीच्या सोंडेपरी !
मना घालीत भीती,
हस्त धुमाकूळ घाली!
मेघ केव्हाचे दाटले,
नभी दिसले काहूर !
काळ्या काळ्या हत्तींचे,
झुंड माजले दूरवर !
हस्ताचा पाऊस ,
कधी करतो उन्माद!
कधी खेळतो हदगा,
मनी घेऊन आनंद!
साऱ्या नक्षत्रात आहे,
हस्ताचा मोठा तोरा !
वनी येऊन खुशीत ,
थाट दाखवितो मोरा!
हस्ताचे पाणी भिजवी,
रान आणि अंगण !
मग येई कोजागिरी,
फुलवे स्नेहाचे चांदणं!