उत्तुंग भरारी तिची
नेत्र दिपून जातात
स्वावलंबी पंख तिचे
आकाशी झेप घेतात।।
सांभाळते घर छान
नोकरीतही रमते
संचार सर्व क्षेत्रात
उच्च पदी ती दिसते।।
जिद्द चिकाटी कष्टात
कधीच मागे नसते
प्रेम जिव्हाळा वात्सल्य
मूर्तीरुप ती असते।।
कर्तृत्वाचे भान तिला
त्याग माया साहस ते
शांत वृत्ती नित्य तरी
झाशीवाली कधी होते।।
फेड नाही उपकार ते
धन्य नारी जीवनही
कर्तृत्वाला सलाम हा
सलाम मातृत्वाला ही।।