मऱ्हाटमोळ्या संस्कृतीचे बाळकडू घेऊन आलेले पस्तिशी – अडतिशीतले उच्च विद्याविभूषित जोडपे.
समाजातल्या हाय स्टेटस असलेल्या आर्थिक पुजाऱ्यांबरोबर रोज उठबस असलेले ते दोघे.
आपले सोसायटीतले स्थान टिकवण्यासाठी अजून चालू असलेली त्यांची धडपड आणि त्या बरोबरच काहीतरी चुकत आणि दुरावत असल्याची खंत.
कारण…अर्थार्जनाचा पेटवलेला यज्ञ शेवटच्या श्वासापर्यंत न शांतणारा आहे ह्याची जाणीव उराशी बाळगूनच आता जगायचंय हे सत्य त्यांच्याकडून स्वीकारले गेले होते.