आपल्या बापाचं बोट धरूनच त्याने आयुष्यतलं पहिलं पाऊल टाकलं होतं.
अजूनपर्यंत आईविना लेकराला वाढवताना बापाची होणारी दमछाक त्याने जवळून बघितली होती.
कुठल्याही परिस्थितीत बापाला अंतर द्यायचं नाही ह्या निश्चयाने त्याने त्याच्या अर्धांगिनीला माप ओलांडून घरात आणलं.
नव्या नवलाईचे नऊ दिवस संपताच त्या बापासाठी अचानकपणे वृद्धाश्रमाचा दरवाजा उघडला गेला आणि …
डोंगरच अवेळी म्हातारा झाला.