लक्ष्मीचा वास असलेल्या त्या घरात ते दोघे बंधू जरी गुण्यागोविंदाने रहात असले तरी डाव्या- उजव्याचा फरक एकाला उघडपणे जाणवायचा. आपल्या माउलीला नेहमी तो थाळीभेदा बद्दल पुसायचा. ती माउली कावरी बावरी होऊन त्याची नजर चुकवून निघून जायची. खिन्नतेने आला दिवस ढकलून तक्रार न करता तो परिस्थितीने अजूनच पक्व होत गेला.
आपल्याच कुंकवाच्या बाहेर- ख्याली पणामुळे ह्या जगात डोळे उघडणाऱ्या त्याला, त्या माउलीने जीवनाच्या थाळीतून सकस आचार-विचारांचे घास भरवून पोसले होते.