कृष्ण प्रेम
कृष्ण नितळ
कृष्ण निर्मळ
कृष्ण निस्सीम
कृष्ण तेज
कृष्ण विराट
कृष्ण मोह
कृष्ण त्याग
कृष्ण कुतूहल
कृष्ण आदर
कृष्ण सखा
कृष्ण गुरु
कृष्ण कोडं
कृष्ण उत्तर
कृष्ण
पेंद्याचा सवंगडी
सुदामाचा गुरुबंधू
राधेचा तो सखा
गोपींचा सखाहरी
यशोदेचा कान्हा
द्रौपदीचा भ्राता
अर्जुनाचा सर्वेसर्वा
यादवांचा राजा
कृष्ण !!!
रंग सावळा
मोरपंख डोई
ओठी बासरी
राधा बावरी
गोकुळ फुलले
कृष्णरुप पाहुनी
कृष्ण !!!
कृष्ण श्वास
कृष्ण आस
कृष्ण भास
कृष्ण गीता
कृष्ण जीवनाचे सार
कृष्ण अंतरी
कृष्ण वदनी
कृष्ण चराचरी
कृष्ण कृष्ण कृष्ण
कृष्ण !!!
किती त्याची रूपं
काय त्याचा स्वभाव
काय त्याचा विचार
काय त्याचा दृष्टिकोन
काय त्याची कृती ?
कृष्ण !!!
स्पष्ट त्याची बुद्धिमत्ता
लोभस त्याची महानता
दिव्य त्याची दृष्टी
कृष्ण सर्व सृष्टी
कृष्ण !!!
नाव याचं कठीण
समजायलाही हा कठीणच
एकदा समजला हा की
समजेल मग जीवनही !!!
आता खरं तर मला अर्जुनच व्हायला हवं…
योगेश्वर कृष्णाकडून आजचं महाभारत तरुन जाण्यासाठी !!!
कृष्ण कृष्ण कृष्ण !!!