झोपडीत राहणा-या आई वडिलांना आनंदाचा धक्का देत ती इंजिनिअर झाली. मोठ्या कंपनीत रुजू झाली. प्रमोशन मिळवत मोठ्या पदावर पोचली.
वडिलांनी जीव सोडताना सांगितलं…”तू आमची मुलगी नाहीस..तूला मी दवाखान्यातून पळवलेलं !”
हे आत्त्ता सांगून वडिलांनी पापमुक्ती साधली की बंध तोडले ?
दोन रेल्वे रुळातील समांतर अवस्था ती अनुभवत होती.