भावाला सुट्टी नसल्याने रात्रभर खपून त्याला आवडतात म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या डबा भर करून घेऊन अति आनंदाने ती भावाकडे जायला निघाली, मुलांना आणि नवऱ्याला सांगितले जेवायच्या वेळेपर्यंत येते, लगेच राखी बांधून. असे म्हणून लगबगीने आनंद तरंगात निघाली….
लक्षात आले तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती, अर्धवट ग्लानीत, दादाs … राखी….
करंज्या…. असे म्हटले आणि परत भानावर येऊन डोळे उघडून पाहिले. तिचा नवरा व मुले अवतीभवती दिसली आणि बाजूच्या कॉटवर तिचा दादा सलाईन ड्रीप लावून झोपलेला दिसला! ती धडपडून मी इथे कशी म्हणून उठू लागली…. पण तिच्या पायात जोरात कळ आली आणि ती रडू लागली, नवऱ्याने सांगितले तुला जाताना एक्सीडेंट झाला, पाय फॅक्चर.. खूपच रक्त वाहून गेले…. रक्ताची तात्काळ गरज होती… दादानेच रक्त दिले….. त्यांना अशक्तपणा आल्यामुळे सलाईन लावली होती…. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले…. तेवढ्यात भाऊ उठून तिच्या जवळ आला, आणि डोक्यावरून हात फिरवून म्हणाला पुढच्या आठवड्यात उड्या मारायला टुणटुणीत होशील… ती हसली…. मुलीने तिच्या हातात राखी दिली आणि तिने भावाच्या मनगटाला पडल्यापडल्याच राखी बांधली., आणी म्हणाली हे माझे अमूल्य रक्षाबंधन…. भाऊराया ❤️❤️ अजून काही नको 🙏 तुझे माझे अखंड बंधन असेच राहू दे !
आनंदाश्रुच्या महापुरात सारे कुटुंब अधिक मजबूत धाग्यात बांधले गेले……