वीरत्त्व ज्यांचे वर्णिता,
शहारून येई तीही मूर्ती,
डोळ्यासमोर येता,
उमटल्या मनी या पंक्ती!
किती यातना सोसल्या,
नाही त्यास काही सीमा!
विजय अंती येताच,
विसरती लोक तयांचा महिमा!
मातृभू ही त्यांची,
प्रिय प्राणाहुनी असेही त्यांना,
त्यांच्या पुढे उगीच करती
कोणी किती वल्गना!
शब्दांत वर्णिता न येई,
त्यांचा अमोल त्याग!
किती देह कष्ट झाले,
उरी देशभक्ती ची आग!
पण असीम त्यांची महती,
नाही तुलना कशाशी!
वंदन तुम्हास करता,
मनी नम्र होतसे खाशी!