आठवतो स्पर्श तिचा येथील प्रत्येक ठिकाणी,
उगीचच मग स्वतः हात फिरवुनी
घेते तो अनुभवुनी….
कुठे हरवला तो स्पर्श?
ते श्वास ते मायेने पाहणारे डोळे!
साऱ्या सुखाच्या राशी,
केल्या जरी रित्या तरी,
ते प्रेम ना मिळे!
आठव आठव आठवांचा,
पिंगा घालुनी साद घालीते अंतरातुनी…
होतीस तोवरी न जाणले,
महत्व तुझ्या असण्याचे..
प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या आता,
या जिवाला सलते तुझ्या नसण्याचे…..
काय सांगावे दुःख बापुडे होऊन गेले….
माय तुझ्यासवे जगण्याचे आयुष्य राहून गेले……