वागुनी शहाणपणाने मान महाराष्ट्राचा वाढवावा
आठवुनी चरीत्र शिवराय, बाजीरावांचे, पराक्रम मनी जागवावा
टिळक, सावरकर, आगरकर गोखले आणिक कितीतरी
त्याग त्यांचा आज आठवावा
यावे रामराज्य पुन्हा ह्या मऱ्हाटदेशी, मनामनात वन्ही हा चेतवावा
झिजले जे आत्मे या मातीस्तव, मानुनी ऋण त्यांचे, प्रत्येक मनी वंदे महाराष्ट्र शब्द उठावा