सागराची गाज मज
गारुड घालते आहे..
तव स्मृतीच्या तालावर
बेभान नाचते आहे ..
पदस्पर्शी मुलायम वाळू
नाहक चुरते आहे ..
सहवासाचा उत्फुल्ल गुलाब
मी इथेच पुरते आहे ..
ना फिरून आता येणे
नक्कीच ठरवते आहे ..
ते घाव अनुल्लेखाचे
जहरी पचवते आहे ..
पूस अस्तिस्वास माझ्या
तुलाही सुचविते आहे ..