समजत होते…रिस्क आहे..तरीही मी गुंतवला जीव.. तीच्यात..त्यांच्यावर
रिस्क शिवाय का मोठा फायदा होतो..हे मार्केटचे ब्रीदवाक्य सोबतीला…बुडवायला !
दिवस जातील तसे माझी गुंतवणूक वाढली…पण त्या प्रमाणात रिटर्न ?…राहू दे…गुंतवणूकीची दखलही नाही घेतली
मार्केटच्या नियमांना धुळीस मिळवणारी…मला बेदखल करणारी ही कंपनी…आयुष्यभराची कंपनी/सोबत ठरावी या आशेवर राहिलो !
शाॕर्ट टर्मवरुन लाँग टर्मवर उतरलो…सहनशील व्हायचे ठरवले…संयम वाढवला
आत्त्तापर्यंतच्या कोणत्याही गुंतवणूकीनं इतका वेळ नाही घेतला …रिटर्न द्यायला !
मग पुढे इतर ठिकाणीही मन गुंतवलं…इकडे नाहीतर तिकडे…कुठेतरी प्रतिसाद मिळेल अशी आस होती !
वर्षांवर वर्षे गेली..सरकारे बदलली…गुंतवणूकीचे नियम पहिल्या इतके सोपे नव्हते आता…मुक्त व्यापार..सौदे वाढले !
आता या गुंतवणूक बाजारावर विश्वास नाही राहिला…परतावा वाढलाय पण विश्वासार्ह कंपन्याच राहिल्या नाहीत !