” ल य आणि ता ल म्हणजे लता ”
शांत भक्तिगीते जिची ऐकून, सकाळ जागी होते ती … लता
आश्वासक आवाजाने जिच्या दिवस उजाडू लागतो ती … लता
मनमोहक सुरांनी जिच्या संध्या धुंद होते ती … लता
हळुवार स्वरांनी थकवा दूर करणारी अंगाई गाते ती … लता
बागेतल्या मंद हवेत जिची भावगीते ऐकावीत ती … लता
दूर डोंगरांवर जेव्हा ढग उतरतात तेंव्हा झाकोळून टाकते ती … लता
झरझर झरणाऱ्या निर्मल पाण्यासारखी खळखळते ती … लता
नदीच्या शांततेचं आणि समुद्राच्या अथांगतेचं दर्शन घडवते ती … लता
ग्रीष्मात तळपते श्रावणधारेसारखी बरसते भिजवून टाकते ती … लता
थंडगार हवेत मस्त गाण्यातून पश्मीना शालीची उब देते ती … लता
कृष्णाला आर्त साद घालून राधेचं प्रेम सादर करणारी ती … लता
मीरेचं भजन, ज्ञानोबाचं पसायदान गाणारी ती … लता
आईची ममता, बहिणीची माया, मुलीचे आर्जव जागवते ती … लता
उषेची लाली पसवुन आशेला दिशा दाखवते ती … लता
आकाशाची निळाई मीनेवर चढवून हृदयनाथवर सावली धरते ती … लता
कुणीही गायलं तरी तिनं कसं गायलं असतं हे आठवून देणारी ती … लता
ती सदा गातच रहावी, अशी कामना खुद्द गानदेवताच करेल ती … लता
स्वरसूर, ल य, ता ल, मेलडीची अनिभिषिक्त सम्राज्ञी लता अशी लुप्त होणार नाही
भारतरत्नांच्या मांदियाळीतील हा ल खलखता ध्रुव ता रा लता कायमच चमकत राहील
भावपूर्ण श्रद्धांजली