काल माघी गणेश जयंती. या सोनी याच्या दिवशी मला आठवतो आहे तो एक जानेवारी २०२१ चा दिवस.
ऑनलाईन अँप्लिकेशन, नंतर इंटरव्ह्यू आणि मग डाॅक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अशी कांचन गंगेसारखी शिखरे सेवानिवृत्तीनंतर पार करून वि जयश्री मिळवत वाढीव धनश्री मिळवण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये मी त्या दिवशी पाऊल ठेवले. घरून निघताना विशेष पूजा अर्चना करून निघालो होतो. कारण त्या दिवशी माझी सेकंड इनिंग सुरू होणार होती. या सेकंड इनिंगसाठी प्रेरणा मिळाली होती ती अर्थातच गृहलक्ष्मीकडून.
ऑफिसमध्ये आल्यावर पहिले दोन दिवस ट्रेनिंगचे होते. त्यावेळेस प्रत्येक सिनियरच्या चेहर्यावर झळकत होतं ते सोनलस्मित. त्यामुळेच या वयातही नवीन काही शिकण्यास प्रोत्साहनच मिळाले. स्वागत झाले ते भागीरथी मावशींनी दिलेल्या अमृततुल्य चहाने.
अजूनही त्या गोरा चहा असला की मला आवर्जून आणून देतात.
प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावर असं लक्षात आलं की आपल्या सगळ्याच विद्या भ्यासाचा कस लागणार आहे इथे. त्यामुळे रेणुका मातेचं नाव घेऊन माझ्या प्रिय अंका ला सुरूवात केली. असो. आजच्या तिळगुळ समारंभासाठी वर उल्लेख केलेल्या [ व नवीन SMO Soja madam ] समस्त स्त्री शक्ती ला माझा सलाम.
अप्रतीम.
Khup surekh aani full on energetic ❤❤Thank you sir
खूपच छान 😀👍