प्रेम असतं ईश्वराचं देणं
खरच,प्रेम निसर्गाचं देणं
विश्वाचं गाणं ही प्रेमच असतं
प्रेमच जगण्याचं कारणं असतं.
प्रेम एक गूढ भावना
का जडावं कोणावरती
कळत नाही कुणा.
प्रेम वाटणं व्यक्त करणं
स्वीकारणं ही असतं
परस्परांचा प्रतिसाद
प्रेम बहरणं असतं.
प्रेम बालवयातलं
निष्पाप झरा जसा
आयुष्यभर मनावर
उमटून जातो ठसा.
किशोरवयीन प्रेम
चोरट्या नजरेत बरसतं
तारुण्यातील प्रेम मात्र
झोकून देत असतं.
शारीरिक प्रेमापरीस
भावनिक सरस असतं
निष्ठा त्याग नि.स्वार्थी ते
जिवापाड असतं.
प्रेम कुणीही करो
प्रेम प्रेमच असतं
प्रेम जीवनाधार
आनंद घन असतं.
प्रेमाविना जीवन
क्षण क्षण मरण असतं
प्रेमाविना जीवन
जिवंत मरण असतं….
जिवंत मरण असतं।।