उज्वला सहस्रबुद्धे, पुणे
हे अघटित आहे खास,
थंडीत आकाश ढगाळ !
मनास करते उदास,
अन् थेंबात उगवे सकाळ!….१
उबदार थंडीची शाल,
हेमंत ऋतु पांघरतो!
घेऊनी ढगाची झूल ,
नकळत दिवस उगवतो….२
गेलास ऋतुरंग बदलून ,
लपलास कुठे घननिळा?
प्रश्न पडला मम मनाला, पावसाळा की हिवसाळा!…३
शांत, स्तब्ध निसर्गाला,
निश्चल केले कोणी ?
चैतन्य कधी त्या येईल,
वाट पाहते मी मनी !….४