पहिली माळ सजे, केशरी रंगाने,
सजवी देवीला, झेंडूच्या हाराने! ..१
पांढऱ्या रंगाची, माळ दुसरी,
पावित्र्य घेऊन, आली साजरी!…२
तिसरी माळ रंग, लाल घेऊन आली,
जास्वंदीची लाली येई, देवीच्या गाली!..३
चवथ्या माळेला, निळे स्वच्छ आभाळ,
कुमकुमार्चनाने फुलले, देवीचे भाळ!…४
शेवंतीची फुले वाहू, पाचव्या माळेला,
पिवळ्या रंगाचा शालू, शोभे देवीला!..५
सहाव्या माळेला, हिरव्याची किमया,
देवीला भरु या, बांगड्या हिरव्या!..६
सातव्या माळेला, रंग येईल करडा,
देवीला देऊया, मानाचा विडा.!..७
आठवी माळ करी, गुलाबी उधळण,
देवीच्या खेळा मिळे, मंदिर अंगण!..८
नववी माळ सजे, जांभळ्या रंगाने,
देवी सौख्य देई, जांभळ्या साजाने!..९
नवरंगाची पखरण, होई नऊ दिवस,
दसऱ्यास सज्ज, देवी सिम्मोलंघनास!.१०