इंद्रधनुच्या रंगी झुलणारा..
नवविवाहितांच्या स्वप्नांना फुलविणारा..
नवयौवनांना स्वप्नात झुलविणारा…
तुझी ओढच लागे जीवा फार..
श्रावणा रे! तू हिरवा गार…
श्रावणा रे! व्रतवैकल्य सणांचा तू झालास भ्रतार,
सुगंधित फुलांनी सृष्टी बहरली
नवथर तारुण्याची काया मोहरली..
रूप तुझे हे असे सदाबहार..
श्रावणा रे! तू हिरवा गार…
जीव रंगले, मन दंगले..
तुझे रुप याच डोळी पाहिले,
मन मयूर नृत्य करू लागले,
लावण्य तव हे असेच राहो अपरंपार…
श्रावणा रे! तू हिरवा गार…
हिरव्या श्रावणाची हिरवाई,
धरे ने पांघरली पाचु ची
दुलई…
उबदार दुलईतुनी कोवळे डीर
डोलती..
नव स्वप्नांचा घेऊन झोका…
आकाशा चुंबु पाहती…
खेळ तव चाले होऊनी मेघा स्वार…
श्रावणा रे! तू हिरवा गार….