स्वगृहाते बैसुनी,
तुम्ही दाविली पंढरी,
किती मानू उपकार,
घडे अमृताची वारी….
चंद्रभागेतटी आहे,
उभा कैवल्याचा गाभा ,
घनभरल्या आभाळी,
दिसे त्याची दिव्य प्रभा…..
दर्शनाची लागे आस,
मनीध्यानी त्याचा ध्यास,
करी पूर्ण मनोरथ,
राऊळीचा तो कळस……
A place to post your valuable content.
स्वगृहाते बैसुनी,
तुम्ही दाविली पंढरी,
किती मानू उपकार,
घडे अमृताची वारी….
चंद्रभागेतटी आहे,
उभा कैवल्याचा गाभा ,
घनभरल्या आभाळी,
दिसे त्याची दिव्य प्रभा…..
दर्शनाची लागे आस,
मनीध्यानी त्याचा ध्यास,
करी पूर्ण मनोरथ,
राऊळीचा तो कळस……