सूर्य उगवतीचा घेऊन येईल,
आशा आकांक्षाची नवी पहाट!
नवीन संकल्प, नवीन आशा,
दाखवतील आम्हा सोनेरी वाट !
आशेच्या हिंदोळ्यावरती ,
आकांक्षांचे रावे झुलती !
साथ देऊनी त्यांना आपण,
करु कालक्रमणा त्यांचे संगती!
नववर्षाची सोनपावले,
उमटतील अवनीवरती!
नाविन्याचे क्षण उमलता,
आनंद दाटला अवतीभवती!
कालचक्रा ना आदी अंत रे,
बिंदू मात्र हो आम्ही पामरे!
जुने जाऊ द्या काळामागे ,
विसरुन अवघे भरु या मोदे!