देवपूजेला आणलेली फुलं अचानकपणे तिच्या देहावर मालकी हक्क गाजवणाऱ्या त्या नराधमाच्या कलेवरावर टाकायला लागली. इतकी वर्ष तिच्या मनाचीच काय पण देहाचीही फुलबाग कधीच उमलून फुललीच नव्हती. कायम कुस्करलेली आणि सुकलेली. कदाचित त्या मुळेच की काय… ती नेहमीच स्वतःची तुलना त्या निर्माल्यागत अवस्थेतल्या फुलांशी करायची…
संधी मिळताच त्या नराधमाला आयुष्यातूनच मोकळं करून समाजाच्या विखारी नजरेतून कायमची मुक्त होण्यासाठी ती … आज स्वतःच नदीच्या विशाल आणि रौद्र पात्रात निर्माल्यागत वाहत होती…