अमावस्येचा अंधार संपुन उगवली चैत्र शुद्ध प्रतिपदा
जाऊदे सरुन सारे दु:ख, त्रास दैन्य अन आपदा..
नव्या पालवीपरी फुटु दे आशांचे धुमारे
गगनावरी जाऊदे मनीच्या स्वप्नांचे मनोरे..
नववर्षदिनी आज घेऊ संकल्प आगळा
सत्कर्माने उजळूदे आयुष्य सोहळा..
यशकिर्तीची गुढी उंच उंच चढु दे
सुखसमाधान सदा घरीदारी नांदु दे…
हीच प्रार्थना आमची चरणी ईश्वराच्या
गुढीपाडवा देऊन जावो तुम्हाला आठवणी सुखाच्या..