अवकाशी फिरणारे गोल
जाणवून देती धरतीचे मोल
जिथे नाही पाणी ते सर्व फोल
म्हणती जी..
पाण्याबरोबर योग्य वायु
ज्यानी होई सृष्टी चिरायु
मानवा लाभें दीर्घायु
जयाचे नि..
पृथ्वी जरी असे माऊली
ग्रह-गोलांचीही साऊली
सवे माना आपुल्या पाऊली
चालते कीं..
पंचतत्त्वाचा देह आला
ज्याचा भार प्रबळ झाला
त्यांप्रमाणे जन्म चालला
जगती यां..
मार्ग जरी बदलावे वाटे
मग अंतरीं भावना दाटे
शांतवता ग्रहां वाट फुटे
मोक्षाची ही..