आला वळीव वळीव,
विझवी होळीच्या ज्वाळा!
धरती ही थंडावली,
पिऊन पाऊस धारा !
मृदगंध हा सुटला,
वारा साथीने फिरला!
सृष्टीच्या अंतरीचा,
स्वर आनंदे घुमला!
गेली सूर्याची किरणे,
झाकोळून या नभाला !
आज शांतवन केले,
माणसाच्या अंतराला!
तप्त झालेले ते मन,
अंतर्यामी तृप्त तृप्त !
सूर्या, दाहकता नको,
मना करी शांत शांत !