सुतकातल्या दिवसात त्या बंगल्यात तिघा भावंडांची इस्टेटीच्या वाटणी बद्दल वकीलांशी बोलणी सुरु होती.
एकंदरीत प्रकरण हातघाईवर येऊ पहाताच त्यांनी मालकाचे मृत्युपत्र वाचून दाखवले आणि त्या भावंडांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
शांतपणे वकिलाने त्या घरच्या प्रामाणिक, विश्वासू आणि एकनिष्ठ नोकराला हाक मारली.
मातेसमान मानलेल्या मालकीण बाईंना स्वतःच्या घरी नेऊन त्या नोकराने त्याच्या मालकाला दिलेले वचन पूर्ण केले आणि …
आज तो सगळ्यात श्रीमंत सनाथ म्हणून अभिमानाने मिरवू लागला होता …