झाले आगमन आनंदाचे,
होता लक्ष्मीपूजन …
घरे-दारे सजली..
नर-नारी, बाल-वृद्ध,
भरजरी पोशाखी नटली…
ओसंडूनी आनंद वाहतसे…
तल्लीन सारी सृष्टी,
पाहुनी लखलखते सौंदर्य …
पहाटे समयी गार वारेsss
फुलत्या कळ्यांचे गंध सारेss
उबदार किरणांची,
शाल पांघरूनी…
निसर्गाने दाखविले औदार्य…
आतषबाजी फटाक्यांची,
रोषणाई दिव्यांची,
रेलचेल मिठाईची,
आनंदा उधाण आले,
लक्ष्मी सवे नारायण आले…
घरी-दारी आनंदात रममाण होताना…
सख्यांनो! लक्ष वेळा तुम्हा आठवले…
जिथे-जिथे असाल तिथे,
तेज दिव्यांचे पाठविले…
तेज अलंकार लेऊनी,
तेजोमय होऊनी साऱ्याजणी,
काव्य शलाका तळपत राहोs
दीपावली सर्वांना,
आनंददायी, यशोदायी होवो..