आली दिवाळी दिवाळी,
सणांची माला सोबतीला !
दारी पणत्यांच्या ओळी
आनंदात सकल बाला !
गोड आवडीचे पदार्थ करतो,
खमंग चकली, चिवडा बनतो !
घरभर त्यांचा स्वाद दरवळतो,
सर्व घराला आनंद तो देतो !
दारासमोर सडा शिंपला,
सुंदर रांगोळी ती रेखली !
रंग भरूनी त्यातच सुंदर,
दिवाळी आनंदाने नटली !
नवीन कोरे कपडे खरेदी,
फटाक्यांची आतषबाजी !
दर दिवशी नवीन भेटी,
आठवणींना करते ताजी !
भाऊबीज अन् पाडवा,
भाऊ,पतीचा आठव देतो,
प्रेमाची ती भेट घेऊनी,
स्त्रियांस सणाचे मूल्य सांगतो !
दिवाळी आनंद सौख्य आणते,
सर्वांना मनास विसावा देते!
वर्षभराच्या श्रमतापातुन,
दिवाळी आपणास मनी सुखवते!