चांदणी चौकातला तो
पूल आता तू विसरून जा…
पुलावरुन मुळशीला जाताना
घेतलेला थांबा, आता तू विसरून जा
गार्डन कोर्ट, पिकॉक बे च्या रस्त्यावर असता
पाहिलेली मित्रांची वाट यापुढे विसरून जा
बंजारा हिल्स, अप अन् अबोव्ह राहतील कदाचित
पोचताना तिथे लागलेली वाट, तू आता विसरून जा
कट्ट्यावरचे रम्य क्षण सोबत प्रियेच्या तिथे
घेतलेल्या आणाभाका तिथे.. त्याही तू विसरून जा
वाहतूक बहुधा सुधारावी आता
ट्रॅफिक जॅ्म्स ते तू विसरून जा
चांदणी चौकातला पूल पडला, नाव ते नक्कीच राहील
पूल दिसला नाही जरी आता, चांदणी चमकत राहील
पुसून जातील आठवणी , हरवतील काही खुणा
टोमणे – थट्टा साऱ्या, त्याही तू आता विसरून जा