चैत्र शुद्ध प्रतिपदा उगवली, सरली रात्र अमावस्येची
शुभदिनी आज चला उभारु गुढी सायुज्यतेची
अधर्माची सोडुन वाट
धरुया कास सद्धर्माची
शुभदिनी आज चला उभारु गुढी प्रभुकृपेची
कोकिळ पहा देतसे चाहुल वसंतऋतु आगमनाची
शुभदिनी आज चला उभारु गुढी निसर्गप्रेमाची
हृदयमंदीरी करुन स्थापना देव देशाची
शुभदिनी आज चला उभारु गुढी मांगल्याची
शुभकृत संवत्सर हे जीवनी तुमच्या येवो घेऊन पहाट सौख्याची
आरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो सकलांना हीच इच्छा मम मनीची
शुभदिनी आज चला उभारु गुढी परस्परांच्या सद्भावाची..
मराठी नववर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा