कुसुमाग्रजांचे गौरवगान
जन्मदिनचि अजि कवी कुसुमाग्रज
वंद्य आम्हां अभिमान
मराठी भाषा दिवस आजला
गातो गौरवगान।।ध्रृ।।
वर्धापनदिन मराठी दिन हा
उत्कट साहित्यासी मान हा
उदात्त उन्नत सन्मानचि हा
गगनाहूनी महान..गातो..१..
मराठी भाषा शिलेदार तुम्ही
ज्ञानसागरा,शब्द धार तुम्ही
काव्य नगरीचे जादूगार तुम्ही
नटसम्राटा मान..गातो..२..
ज्ञानपीठ तो पुरस्कारही
प्राप्त तुम्हां सन्मान उच्चही
हजार जिव्हा दाही दिशा ही
गर्जताती गुणगान..गातो..३..
उत्तेजक प्रेरक तव वाणी
शब्दप्रभ, रत्नांच्या खाणी
दिव्य भव्य नि उदात्त करणी
साहित्य सूर्यचि शान..गातो..४..
Post Views: 112