काही तरी हूकतंय..चूकतंय
धुंद हवेत काहीतरी सुचतंय
करुन टाकावं मदहोश स्वतःला…
राहून राहून वाटतंय !
मग मदहोशी कशाची असावी ?
जीवाला भुल कशाची पडावी ?
साज-या फुलाची..की नाच-या मोराची….
डोळे निवणारी बात घडावी !
नाच-या मोराचे कुरुप ते पाय
अंधार दिव्याखाली..असा काही न्याय
सखीची सुंदरता परी.. नाजूक.सात्विक
याहून दुसरे पाहिजे ते काय !
तीला पाहुनिया निवतात डोळे
बंध हृदयाचे होतात मोकळे
साथ तीची राहो निरंतर
चंद्र प्रीतीचा… कदापी ना ढळे
Beautiful