मैं शायर बदनाम मैं चला, मैं चला
महफ़िल से नाकाम मैं चला, मैं चला
मृत्यू….
एक भयंकर पण अटळ सत्य. खरतरं आपण सगळे या गोष्टीला खूप घाबरतो. कोणी कितीही या गोष्टीला घाबरला, पळायचा प्रयत्न केला किंवा ही गोष्ट पचत नसली तरी, हे एक असं सत्य आहे जे सगळ्यांच्याच पदरी पडणार आहे. कोणाला लवकर तर कोणाला उशिरा पण या भयंकर अश्या सत्य गोष्टीला तोंड द्यावंच लागतं. कधी कळत तरी कधी नकळत. खरंतर नकळत वाल प्रमाण जास्त. कारण १00 पैकी ९९ टक्के लोकांना हे समजतंच नाही की आता आपला शेवट आला आहे. १ टक्के लोक असे आहेत की ज्यांना ही अनुभूती किंवा प्रचिती येते. अनुभूती च म्हणावं लागेल. कारण ९९ टक्के लोकांबरोबर ही गोष्ट नकळतच घडते. त्यांना कळत सुद्धा नाही ती वेळ, तो काळ, तो क्षण त्यांचा शेवटचा क्षण आहे. आणि म्हणूनच बहुदा लोक घाबरतात मृत्यूला. कोणी स्वतः च्या मृत्यूला घाबरतात “ की माझ्या नंतर माझ्या लोकांचं काय होईल”, तर कोणाला दुसऱ्याच्या मृत्यूची भीती असते “ की जर आपली आवडती व्यक्ती गेली तर आपलं काय होईल किंवा त्याच्या शिवाय आपण कसे जगू हे सगळे प्रश्न पडतात”. कारण कोणाचाही मृत्यू नंतर उरत ते फक्त वैराग्य, दुरावा, असंख्य प्रमाणात येणारं नैराश्य आणि दुःख. कुणासाठी कायमच तर कुणा साठी काही काळाकरीता. आणि म्हणूनच बहुदा सगळे मृत्यूला घाबरतात.
चित्रपट “नमक हराम”. (1973) मुख्य भूमिकेत “ राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि रेखा”. या गाण्याचे बोल – आनंद बक्षी, संगीतकार – आर. डी. बर्मन आणि गायक – किशोर कुमार. हे एक सुंदर पण एक उदास गीत. माझ्या मते या गाण्यात जीवनातलं एक कटू सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मेरे घर से तुमको, कुछ सामान मिलेगा
दीवाने शायर का, इक दीवान मिलेगा
और एक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम
मैं चला…
आयुष्य भर आपण किती संघर्ष करतो किती तरी गोष्टीं साठी. काही भौतिकवादी तर काही भावनिक असतात. आपल्या स्वप्नांच्या पुरती करता आयुष्याशी झगडत असतो. श्रीमंती, राग, लोभ, अहंकार, अपेक्षा, प्रेम अश्या सगळ्या गोष्टीच्या अवती भवती भटकत असतो. आयुष्यभर सगळ्यात स्वतःला गुंतवून ठेवतो. पण शेवटी काय सगळ्या गोष्टी जागच्या जागीच राहतात आणि आपण आयुष्यच्या पलीकडे निघून जातो, एकटेच, यातली कुठलीही गोष्ट आपल्या बरोबर न घेता. शेवटच्या क्षणी या सगळ्या गोष्टीचा विचार सुद्धा येत नाही. काही लोकांचे स्वप्न तर दूर आयुष्य सुद्धा अर्धवट राहतं.
शोलों पे चलना था, काँटों पे सोना था
और अभी जी भर के, किस्मत पे रोना था
जाने ऐसे कितने, बाकी छोड़ के काम
मैं चला….
काही लोकांच्या आयुष्यात फक्त दुःख च असत का? आयुष्यभर त्यांना संघर्षच करावा लागतो का? कुठे ही आराम नाही, एका नंतर एक संघर्ष, आयुष्यभर तडजोडी. सतत निराशा. कितीही positive विचार केला तरीही निराशाच हाती येते. अश्यात मनुष्य आशावादी न होता निराशावादीच होत जातो. म्हणून बहुकेत काही लोक आपलं आयुष्य स्वतः च संपवतात किंवा तसा प्रयत्न तरी करतात. किती विचित्र मनःस्थिती असेल या लोकांची.
रास्ता रोक रही है, थोडी जान है बाकी
जाने टूटे दिल में, क्या अरमान है बाकी
जाने भी दे ऐ दिल, सबको मेरा सलाम,
मैं चला
हे कडवं खरंतर फक्त आणि फक्त त्या १ टक्के लोकांसाठी आहे ज्यांना हे समजल असत की आता आपला शेवटचा क्षण आला आहे. आणि आता सगळं संपणार. पण काय करू शकतो तो त्यावेळेस? जास्तजास्त त्याच्या काही अपुऱ्या इच्छा- अपेक्षा सांगेल, काही राहून गेलेलं गुपित share करेल, थोडं आपल्या माणसांना जवळ घेईल, थोडं त्यांच्या समोर रडून घेईल. थोडं त्यांना सांगेल सांभाळा स्वतःला आता मी राहणार नाही तुम्हाला सांभाळायला. बस अजून काय करू शकणार तो……. आणि त्या शेवटच्या क्षणाची वाट बघेल. खूप कठीण असत हे सगळं अनुभवण. सतत त्रास होत असतो पण करू काहीच शकत नाही.
(हे सगळे विचार झाले माझ्या सारख्या एका सामान्य व्यक्तीचे. कारण काही लोकं या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करू शकतात किंबहुना विचार करतात. त्यांना मृत्यूची अजिबात भीती नसते. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात काही ध्येय प्राप्त करायचे असतात ज्यात त्यांना मृत्यूच्या भीती पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. अश्या व्यक्तींचे सुध्दा दोन प्रकार असतात एक वाईट प्रवृत्तीचे लोक तर दुसरे चागल्या प्रवृत्तीचे. दुसऱ्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आपल्या देशातल्या शूर आणि वीर सेनानी येतात, जे आपल्या देशासाठी त्यांच्या प्राणाची आहुती देतात आणि स्वःताला अमर करून जातात. आणि या उलट जे वाईट वृते चे. या लोकांना स्वतः च्याच काय पण दुसऱ्यानंच्या जिवाची सुद्धा पर्वा नसते, स्वतःच्या स्वार्थासाठी ते कोणाला ही मारू शकतात किंवा कोणाचाही जीव घेऊ शकतात.
खरंतर प्रत्येकाची मृत्यूची वेळ आधीच ठरली असते. कारण ज्याची वेळ आली नसेल तो किती ही मोठ्या आजारातून किंवा अपघातातून बाहेर पडतो, तेव्हा आपण हे म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती आली. या उलट एक छोटीशी गोष्ट सुद्धा कोणाच्या मृत्यू च कारण बनू शकतं. तेव्हा बहुतेक काळही आला असतो आणि वेळही.
covid ची परिस्तिथी तर खूपच वाईट होती, हजारो – लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. मग काय इतक्या सगळ्या लोकांचा एकत्र च काळ ही आणि वेळ ही आली असेल का? हा एक विचार करण्यासारखा विषय आहे.)