हिरव्या देठानं कितीही जरी सावरलं,
तरीही वय सरतं..
किती मिळालं कितीही कमवलं,
तरी मन कुठे भरतं..
न भरलेल्या मनाला
एका क्षणीं थांबवायला हवं
थकलेल्या शरीराची जागा
तेव्हाच घेईल कुणी नवं
येणं-जाणं, चालणं-थांबणं
कालानुरूप सारं होईल
अडूनच रहायचं म्हटलं
तर जगण्याची मजा जाईल
म्हणूनच म्हणतात जीवनपटीं
आपली भूमिका साकारावीं
हसत-हसत अचानकच
रंगमंचावरून ‘एक्झिट’ घ्यावी…