नको हारतुरे नको मानसन्मान,
माणुस म्हणुन वागव तिला हीच फक्त तुझ्याकडुन अपेक्षा
करतेच तडजोडी ती क्षणोक्षणी,
वात्सल्य मांगल्याच्या बेडीत अडकवुन नको करुस तिला शिक्षा
शरीरबल कमी तरी नाही ती अबला,
कणखर ती, अभेद्य ती, अमुल्य ती
संकटी सर्व चराचरा घेऊन पदराखाली करतेच ना ती रक्षा
महानतेचा तिच्या जागर
फक्त एक दिवस??
बुद्धीचा न मिरवता कधीच तोरा, नजरेत ठेवते ती प्रत्येक लक्षा
प्रेमळ ती, कोमल ती,
गृहीत नको धरु
दुखावते ती, संतापते ती,
लावशील ठेच तिच्या आत्मसन्मानाला तर होईल ती सर्वभक्षा
चाणाक्ष ती, समंजस ती
बुद्धिमान ती
सोडुन सगळा अहंकार रे समाजपुरुषा, घे तिच्याकडुन माणुसकीची दिक्षा
नको हारतुरे नको मानसन्मान
माणुस म्हणुन वागव तिला हीच फक्त तुझ्याकडुन अपेक्षा……