तूच दुर्गा, तूच लक्ष्मी,
तूच रूप सरस्वतीचे!
त्या तिरंग्यास पेलण्याचे,
अतुल्य आहे सामर्थ्य तुझे!
कोणतेही क्षेत्र नाही,
वर्ज्य तुजला या जगी!
जाऊ दे तुझ्या यशाची,
पताका ती उंच नभी!
तूच आहेस सरितेपरी,
साथ देण्या राष्ट्रासही !
ओघ तुझा अखंड वाहे,
कोमल असुनी सामर्थ्यशाली!
कर्तृत्व तुझे अनमोल,
आहेस तू नारी अजोड!
असशी माता, कन्या,जाया,
नाही तुझ्या कर्तृत्वास तोड!
वा,खूप छान गौरव स्त्री शक्तीचा.