खट्याळ श्रीकृष्णाने,
लावला लळा !
जसा मथुरेला,
तसा दुनियेला!
सगुण रूपात येऊन,
अंतरंग हेलावून गेला !
बाललीलात रंगून,
गोपीना लोभवून ,
दूर गेला मथुरेला,
राधेची धून घेऊन !
दुष्ट कंसाचा वध करून,
न्याय दिला प्रजेला,
मनुष्यत्वात राहून,
देवत्व गुण प्रगट गेला !
पांडवांचा सखा बनून,
कुरुक्षेत्री अवतरला !
असत्य, दुर्गुणांचे,
निर्दालन करून,
भगवद्गीता तो वदला !