दूध उकळायला ठेवून ती तिथेच उभी होती. विचारात गुरफटली होती. मैत्रिणीचे बोल तीला आठवत होते, “तूझ्या प्रत्येक गोष्टीत जर नवरा दोष काढत असेल तर समजून जा..तो बाहेर कुठे तरी गुंतलाय !”
असं खरंच असेल का..आपलं ध्यान खरंच असं असेल ? या विचारानं तीला हसू देखील आलं.
अन् ती समोर असताना दूध ऊतू गेलं.
समोर दूध ऊतू जात असताना हीच्या चेह-यावर हसू पाहून नवरा जोरात ओरडला. त्या ओरड्यानं तीचा संशय बळावला तर तीच्या हसण्यानं याचा !
कारण याला सुद्धा कुणीतरी बायकोच्या उगाचच हसण्याचं भलतंच कारण सांगितलं होतं.

अप्रतीम