चालले होते विश्वासावर,
साथ आहे कायमची !
कधी मनात आले नाही,
वेळ येईल ताटातुटीची !
सप्तपदी ची गाठ आपली,
शेल्याची अन् शालूची!
रेशीम धागे मुलायम त्यांचे,
भीती नव्हती तुटण्याची!
आज अचानक सोडून गेलात,
राहिले एकटी मी या जगी !
राहील का हो तुमचा आधार,
अद्रुष्य पणे माझ्या पाठी !
विश्वास आहे पुनर्जन्मावर,
गाठ पडेल पुढील जन्मी!
त्या क्षणाची वाट मी पाहीन,
सात जन्माची साथी मी !