परतीच्या प्रवासात गावाबाहेरच्या घनदाट अश्या रान- सदृश रस्त्यावर येताच गाडी अचानक बंद पडली आणि काळजात धस्स झालं.
वेळ आणि रात्र दोन्ही पुढे सरकत असतानाच त्या थंड वातावरणात धडधड, भीती आणि सर्वांगी घर्म-ओघळ अश्या सगळ्यांनीच परिसीमा गाठली.
अचानक पोटाला अन्न मिळेल ह्या आशेने एक अत्यंत भुकेला जीव नजरेत अगतिकता आणि लाचारी घेऊन समोर आला.
नकळत आमच्याकडे असलेले खाद्यपदार्थ याचकाच्या झोळीत पडताच त्याच भुकेल्या अवस्थेत त्याच्या ओठांवर आशीर्वाद उमटला …
दुसऱ्याच मिनिटाला गाडी सुरु झाली होती…