सिंधुताई,माय माऊली,
कष्टमय आयुष्य जगली!
झुंजत झुंजत आयुष्याशी,
निरपेक्ष,निरामय जीवन जगली!
जन्म जाहला जिथे तिच्या,
आयुष्याला मोलचं नव्हते!
वाढत होती जणू बेवारशी,
प्रेम, जिव्हाळा तिथे न भेटे!
ज्यांनी द्यावा तिला आसरा,
असे सासर तिला पारखे!
माय माऊली टाकून दिली,
जग अवघे वागे शत्रू सारखे!
स्मशानातच तिला लाभले,
सुख कसे ते अनोळखी!
प्रेताची आगच बनली ,
ठेवी न तिला रोज भूखी!
हाल अपेष्टांचे डोंगर लंघुनी,
जाहलीस तू प्रेममयी!
अनाथांची माय बनुनी,
प्रेमभाव ओतलास जगी!
जरी तुझे अस्तित्व लोपले,
तेज तुझे राहील जगी!
त्या तेजाच्या प्रकाशात ,
नित्य चमकशील तू नभी!