शुभ सौभाग्याची खाण, मागते दान
सदा सुखकारी
ओवाळुनी मंगलगौरी।।
श्रावणमासी मंगळवारी
एका घरी जमुनी आम्ही नारी
धूपदीप पूजेचा आगळा थाट
मांडिले पाट..मंगलगौरी
ओवाळुनी मंगलगौरी..।।१।।
नाना परी सुमने पत्री या
आणिल्या देवी तुज अर्पाया
हे कमळ फूलं ही छान
केवडा पान..प्रिय तुज गौरी
ओवाळुनी मंगलगौरी।।२।।
सोळापाने वरी सुपारी या
हा विडा देवी तुज वाहूया
नैवेद्द्याचे वाढले पान
ओटी सामान..आरतीचे ताट करी
ओवाळुनी मंगलगौरी।।३।।
या जीवन क्रीडा नौकेला
पैलतीरी क्रीडन न्यायाला
निवडिला जोडीदार
खरा आधार..प्रिय सहकारी
ओवाळुनी मंगलगौरी।।४।।
दे उदंड आयु मम पतीला
सौभाग्य दान दे देवी मला
ही विनंती चरणाला
देवी तुजला..मंगलगौरी
ओवाळुनी मंगलगौरी।।५।।